मुख्य सामग्रीवर वगळा

रोखूया अन्न आणि पाण्याची नासाडी

         
                 रोखूया अन्न आणि पाण्याची नासाडी
काही दिवसांपूर्वी मी एका लग्न सभारंभात गेलो होतो.पाहुण्यांच्या जेवणासाठी बुफे पध्दतीची व्यवस्था करण्यात आली होती.तेथे मोठया प्रमाणावर ताटात अन्न उष्टे टाकण्यात आले होते तर दूसरीकडे पाण्याच्या बाटल्यातील पाणी संपलेले नसतानाच त्यांची विल्हेवाट लावण्यात येत होती.अन्न आणि पाणी या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत आणि याप्रती आपण एवढे संवेदनशिल नसू तर साहजिकच आपले आपल्या निष्काळजिपणावर लक्ष वेधायला हवे.आपण अन्नाच्या प्रति किती असंवेदनशिल आहोत हे आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येईल.आकडेवारी असे सांगते की, जगात जेवढे अन्न बनते त्यापैकी एक तृतीयांश म्हणजे १ अरब ३० कोटी टन अन्न वाया जाते.एकीकडे संपन्नता वाढत असताना आपण अन्नाचा काळजीपूर्वक वापर करणे विसरत चाललो आहोत.
विश्व खादय संघटनेनूसार जगात दररोज २० हजार मुले उपाशी पोटी राहतात मात्र ही आकडेवारी यापेक्षाही अधिक असू शकते.भारताच्या बाबतीत म्हणायचे झाले तर भारतात अनेक लोक उपाशी पोटी दिवस काढतात.आपल्याकडे एखादा लग्न सभारंभ असेल किंवा आपण आपल्या मित्रांसाठी पार्टी ठेवून त्यांना जेवणासाठी बोलवितो तेंव्हा पाहुण्यांसाठी मोठया प्रमाणावर अनेक प्रकारचे खादय पदार्थ बनविले जातात.एक तर अशा कार्यक्रमात नक्की किती पाहुणे येतील याचा निश्चित अंदाज आपल्याला नसतो त्यामुळे मोठया प्रमाणावर अन्न शिजवले जाते.प्रत्यक्ष पंगतीला सुरुवात झाल्यानंतर काही अतिउत्साही वाढक-यांकडून आग्रहाणे अनावश्यक अन्न  ताटात वाढले जाते परिणामी मोठया प्रमाणावर अन्न हे उष्टे टाकले जाते तर दूसरीकडे शिल्लक राहते.मग हे अन्न उकिरडयावर फेकावे लागते.आपण योग्य नियोजन आणि काळजी घेतली तर ही नासाडी थांबवू शकत नाही का?
इंडियन इंस्टीटयुट ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशनच्या एका अहवालानूसार,भारतात प्रत्येक वर्षी २३ कोटी टन डाळ,१२ कोटी टन फळं आणि २१ कोटी टन भाजीपाला वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे खराब होतात.ही आकडेवारी ऐकुण आपल्या रागही आला असेल.आपल्याला या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण व्यक्तीगत स्तरावर अन्न नासाडी रोखण्यासाठी काय करू शकतो? आपल्या संस्कृतीत अन्नाला देवता मानण्यात आल आहे त्यामुळे अन्नाची पूजा केली जाते.अन्न उष्टे टाकणे हे पाप समजले जाते.ही बाब एका दिवसाची किंवा एका घराची नाही तर हळू-हळू ही वाईट सवय आपल्या जीवनाचा भाग बनत चालली आहे.संपन्न वर्गात तर जणू अन्न वाया घालवणे हा जन्मसिद्ध अधिकार समजला जातो,तर दूसरीकडे देशात एक वर्ग असा आहे जो उपासमारीने बेहाल आहे.भारतहा असा देश आहे जिथे सण,उत्सव,लग्न सभारंभ सतत सुरू असतात आणि अशा ठिकाणी मोठया प्रमाणावर लोक जमा होतात.मग या लोकांकडून अन्न वाया घातले जाते.एका सर्व्हेनूसार एकटया बैंगलोर शहरात प्रतिवर्ष लग्न सभारंभात ९४३ टन शिजविलेले अन्न वाया जाते,या अन्नातून जवळपास २.६ कोटी लोकांना एका वेळेसचे जेवण मिळू शकते.
              ही भारतातील एका शहराची आकडेवारी आहे.भारतात एकूण २९ राज्य आहेत.हे स्पष्ट आहे की,असे कितीतरी लग्न आणि उत्सव प्रत्येक राज्यातील शहरात आयोजित केले जातात मग आपणच अंदाज लावा की अन्नाचा अपव्यय किती होत असेल.याशिवाय दररोज स्वंयपाक घरात,शाळेतील लंचबॉक्स आणि ऑफिस कँटीन मध्ये शिल्लक राहणारे अन्न आहेच.एकीकडे देशात लाखो लोक उपाशी पोटी राहत असताना जर आपण अशा पध्दतीने अन्न वाया घालवत असू तर आपल्याला या देशाचा सभ्य नागरिक म्हणवून घेण्याचा अधिकार आहे का? आपल्याला एकदा या गोष्टीचा विचार करावा लागेल की ,लाखो उपाशी लोकांना एक वेळेसची भाकर सहज उपलब्ध होते की नाही?अन्नाच्या प्रति रूची वाढत जाणे आणि  ती बेलगाम होणे हा एक प्रकारचा आजार आहे.अनेक लोकांना वेगवेगळे खादयपदार्थ खाणे आवडते मात्र प्रत्येकाच्या पोटाची एक सीमा आहे हे लक्षात ठेवायला हवे.अनावश्यक जास्तीचा आहार गेणे हे आजाराला निमंत्रण आहे.अनाच्या अपव्ययाचा संबंध आपल्या स्वास्थ्याशी आहे.देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.२०२८ पर्यंत देशाची लोकसंख्या १.४५ अरब होईल त्यामुळे भविष्यात देशात अन्न टंचाईच्या संकटात वाढ होवू शकते असा तज्ञांचा अंदाज आहे.
       देशात एकीकडे अन्नाची नासाडी होत असताना,हे अन्न शिजविण्यासाठी लागणारे २३० क्यूसेक पाणीही वाया जाते.या पाण्याने १० कोटी लोकांची तहान भागवली जावू शकते.तसेच या वाया जाणा-या अन्नाच्या किंमतीतून ५ कोटी लोकांचे जीवन बनवले जावू शकते.यासाठी आपल्याला दैनंदिन सवयीत बदल करावा लागेल.आपल्याला लग्नसभारंभ असो किंवा घर आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घेतले पाहिजे,त्याचप्रमाणे सभारंभाच्या आयोजकांनी अन्न उष्टे टाकून न देण्याची विनंती करणारा फलक दर्शनी भागात लावला पाहिजे.त्याचप्रमाणे हॉटेल मध्ये गेल्यावर तेवढेच अन्न ऑडर केले पाहिजे जेवढे आवश्यक आहे.आपल्या मुलांनाही त्यांच्या टिफीन मध्ये तेवढेच अन्न दिले पाहिजे जेवढे आवश्यक आहे.अन्न वाया न घालवण्याची सूचना देवून आपण त्यांना अन्नाच्या प्रति जागरूक करू शकतो.मुंबईच्या डब्बेवाल्यांनी ‘रोटी बँकेची’स्थापना केली आहे ज्यामर्फत ते शिल्लक राहिलेले अन्न गरजू लोकांपर्यंत पोहचवितात.राजस्थान मध्येही एका स्वयंसेवी संस्थेने एक चांगला उपक्रम सूरू केला आहे.ही संस्था सभारंभात शिल्लक राहिलेल्या अन्नाला प्रिजर्व करते आणि नंतर गरजू लोकांना वाटते.मुंबई आणि राजस्थान सारख आता प्रत्येक शहरात आणि गावात रोटी बँकेची स्थापना व्हायला पाहिजे जेनेकरून गरजू लोकांना अन्न मिळेल.
याबाबतीत आनखीन एक सकारात्मक पाऊल टाटा कन्सलटेंसी सर्विसेसने उचलले आहे.त्यांनी आपल्या कार्यालयिन कर्मचा-यांना एका सूचना फलकावर लिहून अन्नाच्या नासाडी बद्दल जागरूकता केली आहे.त्यावर रोज किती अन्न वाया जाते आणि त्यातून किती लोकांची भूख भागवली जावू शकते हे सांगितल जावू लागल.अशा प्रकारचे सूचना फलक सभारंभ,हॉटेल्स आणि कंपन्यांमध्ये लावण्यात आले तर मोट्या प्रमाणात जागरूकता निर्माण करता येवू शकते.जर आपण वेळीच जागरूक झालो नाहीत तर आज जसा पाण्याच्या बाबतीत हाहाकार आहे तसा भविष्यात अन्नाच्या बाबतीत होवू शकतो.त्यामुळे आपण अन्न आणि पाण्याची नासाडी थांबवली पाहिजे,कारण हा प्रश्न फक्त आपला नाही तर भावी पिढयांचा आहे.आपण हा दृढ संकल्प केला पाहिजे की,कोणत्याही परिस्थितीत अन्न आणि पाण्याची नासाडी करणार नाही आणि करूही देणार नाही.
               -सुरेश मंत्री,धारूर


 

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...