मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

SCIENCE & TECHNOLOGY लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चंद्रावर संसार थाटण्यासाठी चीनची लगीनघाई

कवींच्या कल्पना विश्वास आणि मुलांच्या परीकथांमध्ये चंद्राला विशेष स्थान आहे. चंद्रावर राहण्याचे मानवाचे स्वप्न लवकरच पूर्ण आहे. कारण येत्या पाच वर्षात चीन चंद्रावर घर बांधणार आहे. विशेष म्हणजे यासाठी चंद्रावरची माती वापरुन विटा बनवल्या जाणार आहेत. चंद्रावर सातत्याने संशोधन सुरु आहे. यामुळे दीर्घकालीन चंद्र संशोधनासाठी येथे लूनर बेस उभारणे गरजेचे आहे. चंद्रावर लूनर बेस बनवण्याची चीनची योजना आहे. चंद्राच्या मातीपासून विटा बनवण्यासाठी एक टीम 'चायनीज सुपर मेसन्स' नावाचा रोबोट तयार करत आहे. चंद्रावर पाणी नाही. तसेत येथे गुरुत्वाकर्षण देखील काम करत नाही. चंद्रावर वारंवार भूकंप आणि भयंकर वैश्विक किरणोत्सर्ग होत असतात. अशा परिस्थितीत चंद्रावर लूनर बेस विकसीत करताना संशोधकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. चीन अशा विशिष्ट मोहिमेवर काम करत आहे, जी यशस्वी ठरल्यास हा देश अंतराळ संशोधनात अग्रस्थानी असेल. येत्या दशकात चीनची अंतराळ संशोधनातील कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण असेल.  चंद्रावरील मानवी तळ कसा असेल याची कल्पना कितीही केली असली तरी वस्तुस्थिती मात्र अगदी पायाभूत आहे. चंद्रापर्यं...

भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम

भारत २०२३ मध्ये पहिली मानवी अंतराळ मोहीम राबवणार आहे. भारत अंतराळात मानवी मोहीम आणि पहिली मानवी सागरी मोहीम समांतरपणे ' गगनयान ' या नावाने राबवणार असल्याची माहिती आहे. भारतीयांना अंतराळात पाठवण्याचा संकल्प करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१८ च्या स्वातंत्र्यदिनी   लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात या मोहिमेची घोषणा केली होती. २०२२ पर्यंत देशातील एखाद्या तरुणाला अथवा तरुणीला अंतराळात पाठवण्यात येईल   असं मोदींनी म्हटलं होतं. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अवकाशवीर आहेत. त्यांनी २ एप्रिल १९८४ रोजी रशियाच्या सोयूझ टी-२ या यानातून अवकाशात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत रशियाचे दोन अवकाशवीर होते. राकेश शर्मा भारतीय हवाई दलात वैमानिक होते. त्यावेळी राकेश शर्मा यांनी अवकाशातून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संवाद साधला होता. अंतराळातून भारत कसा दिसतो या इंदिरा गांधी यांच्या प्रश्नावर , ‘ सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ असे उत्तर राकेश शर्मा यांनी दिले होते. राकेश शर्मा यांना पुढे अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. इस्रो ही संस्था तमाम भारतीयांसाठी अभि...

वणव्याची मिळेल पूर्वकल्पना

   पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्पांमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतेय. तर यात आता जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होतंय आणि यातून पर्यावरणाचा -हास होण्याचा धोका अधिक असतो. यातून आपला ऑक्सिजनचा एक महत्त्वाचा स्रोतही गमावला जात आहे. जंगल आगीमुळे पर्यावरणाची हानी तर होतेच आहे. पण कार्बन डायऑक्साईडही वातावरणात वाढतो आहे. हा हरितगृह वायू आहे व त्याचा प्रतिकूल परिणाम पृथ्वीचे तापमान वाढीमध्ये दिसून येत असल्याचे संशोधनात पुढे आल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात. जागतिक पर्यावरण बदलामुळे आधीच खराब झालेली पर्यावरणीय परिस्थिती जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे अधिकच बिकट होत चालली आहे असेही पर्यावरणवादी वेळोवेळी आठवण करून देत आहेत. ज्या वेळी जंगलामध्ये आगी लागतात तेव्हा लहान किटकांपासून ते मोठ्या वन्यप्राण्यांपर्यंत सर्वांच्या अधिवासावर त्याचा आघात होतो. या वन्यप्राण्यांना उपलब्ध असलेलं खाद्य हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहत नाही. आग लागल्यानंतर पाऊस पडल्यानंतर तिथल्या जंगलांच पूर्वीसारखं जीवन होत नाही. त्यामुळे अन्नसाठा  कमी झाल्यामुळे आणि त्यां...

प्लास्टिकपासून रस्ते निर्मिती

  र स्ते डांबरापासून ,  सिमेंट काँक्रिटपासून तयार केले जातात.   डांबर ,  जो प्रत्येकाला परिचित आहे ,  त्यात शेल ,  कोळसा आणि तेल यांसारख्या खनिजांपासून मिळवलेल्या रेव ,  वाळू आणि बिटुमन यांचा समावेश होतो.   ही सर्व संसाधने वर्षानुवर्षे अधिकाधिक कमी होत आहेत ,  अधिकाधिक महाग होत आहेत.   त्यामुळेच डांबर ,  सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्यासाठी येणारा खर्च अधिक असतो. हे रस्ते दीर्घकाळ टिकतही   नाहीत.   मात्र लवकरच देशात टायर आणि प्लास्टिकचे रस्ते दिसू लागतील.   त्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात दोन-तीन स्क्रॅपिंग सेंटर उघडण्याची सरकारची योजना   आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण होत असतो. गेल्या काही वर्षांत प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. भारतात दररोज २५ , ९४० टन प्लास्टिक कचरा तयार होतो. हा कचरा ४ , ३०० हत्तींच्या वजनाएवढा आहे.   त्यापैकी सुमारे ४० टक्के कचरा जमवलाही जात नाही अथवा त्यावर पुनर्वापरासाठी प्रक्रियाही केली जात नाही ,  त...

भारताची शुक्र मोहिम

  भारताच्या चंद्रयान २ मोहिमेची जगात सगळीकडे चर्चा झाली. ऑर्बिटरच्या मदतीने विक्रम लॅन्डरचा ठावठिकाणा तर लागला पण त्याच्याशी अजून संपर्क जोडणे शक्य झाले नाही. जरी विक्रम लॅन्डरचे काम ठप्प असले तरीही ऑर्बिटरचे काम सुरळीत सुरु असल्यामुळे चंद्राचा अभ्यास करणे आपल्या अवकाश संशोधकांना शक्य होणार आहे. पण चंद्रयान २ नंतर पुढे काय असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला होता . प्रयोग करताना अपयश आले तरी शास्त्रज्ञ आणि संशोधक त्यांचे काम थांबवत नाहीत. ते लगेच मागच्या प्रयोगात काय चूक झाली हे शोधून काढतात आणि पुढच्या अभ्यासाला लागतात. चंद्र आणि मंगळ मोहीम यशस्वीपणे राबवल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो  शुक्रावर यान पाठवण्याच्या तयारीत आहे. हे मिशन २०२३-२५ दरम्यान पार पाडले जाण्याची शक्यता आहे. या मोहिमेला शुक्रयान असे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मानव पृथ्वीच्या बाहेर जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. जें व्हा असा विषय येतो तेव्हा शुक्र ग्रहाचे सर्वात आधी नाव घेतलं जातं. शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात रहस्यमय ग्रह आहे. शुक्र हा ग्रह आपल्यापेक्षा सू...