मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

JOURNALISM लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मराठी पत्रकारितेचे बदलते जग

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते. १८३२ चा काळ, अर्थातच इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता. राष्ट्रभक्तीसाठी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन, परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे, असे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना वाटले. त्यानुसार आचार्य जांभेकरांनी केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या या महत कार्याची आठवण आपणास रहावी म्हणून प्रतिवर्षी ६ जानेवारी रोजी राज्यात दर्पण दिन साजरा केला जातो. १८३२ ते २०२२ हा पावणे दोनशे पेक्षा जास्त वर्षांचा काळ. मराठी पत्रकारितेनं या काळात अनेक स्थित्यंतरं अनुभवली...