नुकत्याच झालेल्या केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या बैठकीत इ ८ वी पर्यंत नापास न करण्याच्या धोरणाचा आपापल्या राज्यांना अधिकार मिळावा म्हणून शिक्षणाच्या बालहक्क कायद्यात तशी दुरुस्ती करण्यात यावी अशी शिफारस केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने केंद्र सरकार कडे केली आहे. केंद्र सरकार कडून याबद्दल सकारात्मक पाऊल उचलले गेले तर ते निश्चितच शिक्षण क्षेत्राकडून स्वागतार्ह असेल. शिक्षणाचा बाल हक्क कायदा संसदेत ४ आॅगस्ट २००९ रोजी संमत झाला. २६ आॅगस्ट २००९ रोजी राष्ट्रपतींनी यास मंजुरी दिली. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ एप्रिल २०१० पासून जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण देशात करण्यात आली. या कायद्याद्वारे ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे, भयमुक्त - आनंददायी वातावरणात शिक्षण देणे यासह अनेक इतर अनेक उद्दिष्टे यात समाविष्ट आहेत व त्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. याच कायद्यात १ ली ते ८ वी पर्यंत विद्यार्थ्याला नापास न करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा काय...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.