मुख्य सामग्रीवर वगळा

मोदी सरकारची तीन वर्षे

                   
 येत्या २६ मे ला मोदी सरकारची तीन वर्ष पूर्ण होत आहेत.२०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील हे सर्वांचेच अनुमान होते.मात्र १४ मे २०१४ ला लोकसभा निवडणूकीचा निकाल हाती आल्यानंतर मोठ-मोठे राजकिय पंडीतही आश्चर्यचकीत झाले.काँग्रेसला ५० जागांचा आकडाही पार करता येणार नाही याची कोणी कल्पनाही केली नव्हती.भाजपाला न-भूतो-न-भविष्यती असे सर्वाधिक बहुमत मिळाले होते.नरेंद्र मोदी मोठया थाटामाटात पंतप्रधान पदी विराजमान झाले आणि आजही मोठया लोकप्रियतेसोबत ते आपल्या खुर्चीवर कायम आहेत.गेल्या ३ वर्षात ‘मेक इन इंडिया’,‘डिजीटल इंडिया’,‘स्वच्छ भारत अभियान’,‘जन-धन-योजना’,सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंतर भ्रष्टाचार रोखण्यासाठी नोटाबंदीची केलेली सर्जिकल स्ट्राईक यामुळे त्यांचे कामकाज आणि त्यांची धोरणे पाहून त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते आणि पक्षाबाहेरील समर्थक त्यांच्या कार्यपद्धतीचे अभूतपूर्व असे वर्णन करीत आहेत तर त्यांचे विरोधक त्यांची कार्यपद्धती ही एकाधिकारशाहीची असल्याचे सांगून प्रश्नचिन्ह उभा करित आहेत.मोदींच्या पंतप्रधानपदाच्या गेल्या ३ वर्षाच्या कार्यकाळाचा हा घेतलेला आढावा.

            नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सुरवातीला जवळपास सर्व राजकिय अभ्यासकांनी त्यांचे कौतुक केले होते.आता मात्र अनेक राजकिय अभ्यासक त्यांच्या धोरणांवर टिका करित आहेत.सरकारने जनतेला कोणती वचने दिली होती,ती कितपत पूर्ण केली आणि याबाबतीत पूढे काय करीत आहे?सरकारने कोणत्या क्षेत्रात काय यश संपादन केले,ती कुठे यशस्वी झाली,कुठे नाही?या प्रश्नांना आधार बनवून मोदी सरकारचे जर मूल्यांकन केले तर मिळणा-या निष्कर्षावरून मतभेद होवू शकतात.मोदींनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाच्या सुरवातीलाच सप्टेंबर २०१४ मध्ये ‘मेक इन इंडिया’ ही म्हत्वाकांक्षी योजना आणली.भारतात परकिय गुंतवणूक वाढवणे आणि परकिय उदयोगांना भारतात मोठया प्रमाणात आकर्षित करणेहा या योजने मागील हेतू होता.या योजनेमुळे भारत हा जगातील प्रमुख उत्पादक देश बनेल अशी अपेक्षा होती.मात्र या योजनेने आतापर्यंत जेवढी उंची गाठायला हवी होती ती गाठलेली दिसत नाही.या योजनेत सरळ-सरळ कमतरता दिसत आहे.त्याचप्रमाणे मोदींच्या कार्यकाळात रोजगारात वाढ होईल अशी अपेक्षा होती पण जीडीपीचा दर ज्या प्रमाणात वाढला त्याप्रमाणात देशात नविन रोजगारांची निर्मिती झालेली नाही.तसेच स्विस बँकेतील काळा पैसा भारतात आणल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यात लाखो रुपये जमा होतील हे मोदींनी दाखविलेले स्वप्न ठरले आहे.
मोदी सरकारची आणखीन एक म्हत्वाकांक्षी योजना आहे,ती म्हणजे २०२२ पर्यंत सर्वांना स्वत:चे हक्काचे घर मिळवून देण्याची.या स्वप्नपूर्तीसाठी गत ३ वर्षात जेवढे काम व्हायला हवे होते तेवढे झालेले दिसत नाही.मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाविषयी बोलायचे झाल्यास या अभियानाला एका लोकअभियानाचे स्वरूप देण्याचा पूर्ण प्रयत्न मोदी सरकारने केलेला दिसून येतो.या अभियानामुळे लोकांमध्ये नक्कीच स्वच्छतेच्या बाबतीत नक्कीच जाणिव-जागृती झाली आहे,मात्र हे अभियानही म्हणावे तेवढे उंची गाठू शकले नाही.आजही भारतातील अनेक मोठया शहरात स्वच्छतेच्या बाबतीत असणारा निष्काळजीपणा आपल्याला दिसून येईल.मोदींनी गेल्या ३ वर्षात राबविलेल्या अशा अनेक योजनांची यशस्विता आणि यशस्वितेचे मूल्यांकन आपल्याला उपलब्ध आकडेवारीवरून करता येवू शकते.मात्र नरेंद मोदींच्या बाबतीत लोकांमध्ये नकारात्मकतेची भावना आजही ‘न’ च्याबराबर असलेली आपल्याला दिसून येते.मोदी आजही तेवढेच लोकप्रिय आहेत जेवढेकी पुर्वी होते.ब-याच दिवसांनी भारताला असा पंतप्रधान मिळाला आहे ज्याच्यासाठी देश हेच सर्वस्व आहे,जो देशातील गरिब जनतेसाठी काहीतरी करू इच्छितो,ज्यांनी नोटबंदी करून भ्रष्टाचा-यांच्या छातीत धडकी भरली,ज्यांच्यामुळे भारताची मान संपूर्ण जगात उंचावली आहे.एकुण देशातील जनतेची अपेक्षा कायम आहे की,२०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी आणि त्यानंतर मोदींनी जनतेला जी आश्वासने दिली होती,ते ती नक्कीच पूर्ण करतील.खरं तर आजकालच्या राजकीय वातावरणात पंतप्रधान पदी ३ वर्षे असताना पंतप्रधनांबद्दल एवढी सकारात्मक भावना राहणे हे असाधारण आहे.
भाजपाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळात त्यांना पक्षाबाहेरील विरोधकांचाच नाही तर राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि त्याअंतर्गत येणा-या किसान संघ,स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय मजदूर संघ यांचा विरोध झाला होता.वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी सोबत संघ परिवाराचे जमेनासे झाले होते.नरेंद्र मोदींच्याप्रती मात्र संघ,पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
राज्यांच्या निवडणूका असो किंवा स्थानिक निवडणुका प्रत्येक जागी मोदी हेच नाव आहे.मोदींच्या नावावर भाजपाला मतं मिळत आहेत.नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सुरवातीला दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणूकीत भाजपाला धक्का बसला.यानंतर मात्र जिथे-जिथे लोकांचा भाजपाला पाठिंबा आहे तिथे भाजपा निवडणूका जिंकत आहे किंवा पक्षाला पूर्वीपेक्षा जास्त मत मिळत आहेत.ही सर्व मोदी या नावाची जादू आहे.विरोधी पक्षांनाही हे कळेनासे झाले आहे की,शेवटी मोदी एवढे लोकप्रिय झाले तरी कसे?सरकारच्या प्रत्येक चांगल्या कार्याचे श्रेय मोदींनाच दिले जाते.एवढेच नाही तर भाजपा शासित प्रत्येक राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या सरकारने केलेल्या चांगल्या कार्याचे श्रेय मोदींनाच देतात. मोदी म्हणजे भाजपा हे सूत्र बनले आहे.खरे म्हणजे एखादया व्यक्तीला एवढे महत्व प्राप्त होणे हे लोकशाहीला घातक आहे मात्र आपल्या लोकशाहीत नेतेच सर्वोप्तरी असतात म्हणून यात आश्चर्य मानण्यासारखे काही नाही.
एक वर्ग आज ही असा आहे ज्याची आजही मोदी आणि त्यांचे सरकार यांच्या बाबतीत नकारात्मक भावना कायम आहे,तो म्हणजे मुस्लिम वर्ग.भाजपाला आपल्या हिंदुत्ववादाचा पगडा आजही काढता आला नाही हे यामागील कारण आहे.गेल्या महिन्यात भुवनेश्वर येथे झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत नरेंद्र मोदींनी असे आव्हान केले की,भाजपा कार्यकर्त्यांनी मुस्लिम लोकांची जागोजागी सम्मेलने आयोजीत करावीत.अशा प्रकारची सम्मेलने आता मुस्लिम लोकांसाठी आयोजितही केली जात आहेत.मात्र यामुळे मुस्लिमांची मोदी आणि त्यांच्या सरकारबद्दल धारणा बदलेल यात शंका आहे.केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मान्य केले आहे की, मुस्लिमांची मते त्यांच्या पक्षाला मिळत नाहीत,मात्र ते सत्तेत असताना कसलाही भेदभाव करणार नाहीत.त्यांच्या पक्षाबद्दल गैरप्रचार झाल्याने हे होत आहे.भाजपा सरकार या गैरप्रचाराचे उत्तर आपल्या कार्यातून देईल.मोदी सरकार मुस्लिमांची त्यांच्या बाबतची नकारात्मक भावना मुस्लिमांना सोबत घेवून बदलते की नाही हे पूढे कळेलच.
सुरेश मंत्री,धारूर
मो.नं-9403650722

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...