भारतीय अंतराळ कर्यक्रमाची क्षमता वाढवणे, अवकाश विज्ञान आणि पृथ्वी निरीक्षण माहिती संच वाढवणे, ग्राउंड स्टेशन नेटवर्कची व्याप्ती वाढवणे, संयुक्त प्रयोगांद्वारे उत्पादने आणि सेवा सुधारणे आणि तज्ञांच्या उपलब्धतेसाठी मंच तयार करणे या उद्दिष्टांसह सरकार परदेशी अवकाश संशोधन संस्थांसोबत सहयोगी प्रकल्प राबवत आहे. याअंतर्गत बहुतेक पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेने एकत्र येत पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त उपग्रह मोहिम हाती घेतली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासा आणि भारताची इस्रो यांनी संयुक्तरित्या निसार या कृत्रिम उपग्रहाची निर्मिती केली आहे. पुढील वर्षी सुरुवातीच्या काही महिन्यात या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटाहून केलं जाणार आहे. यानिमित्ताने नासाबरोबर संयुक्त उपग्रह निर्मिती, वापर आणि अभ्यास करण्याची संधी इस्त्रोला नव्याने मिळाली आहे. या उपग्रहाच्या निर्मितीबाबत आणि संशोधनाबाबत भारत आणि अमेरिका दरम्यान २०१४ मध्ये करार करण्यात आला होता. या उपग्रहाचे वजन हे सुमारे २७०० किलो एवढे असून पृथ्वीपासून सुमारे ७४७ किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केला जाणार आहे. विशि...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.