मुख्य सामग्रीवर वगळा

नैसर्गिक आपत्तींपासून वाचवणारे उपग्रह : निसार

भारतीय अंतराळ कर्यक्रमाची क्षमता वाढवणे, अवकाश विज्ञान आणि पृथ्वी निरीक्षण माहिती संच वाढवणे, ग्राउंड स्टेशन नेटवर्कची व्याप्ती वाढवणे, संयुक्त प्रयोगांद्वारे उत्पादने आणि सेवा सुधारणे आणि तज्ञांच्या उपलब्धतेसाठी मंच तयार करणे या उद्दिष्टांसह सरकार परदेशी अवकाश संशोधन संस्थांसोबत सहयोगी प्रकल्प राबवत आहे. याअंतर्गत बहुतेक पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेने एकत्र येत पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त उपग्रह मोहिम हाती घेतली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासा आणि भारताची इस्रो यांनी संयुक्तरित्या निसार या कृत्रिम उपग्रहाची निर्मिती केली आहे. पुढील वर्षी सुरुवातीच्या काही महिन्यात या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटाहून केलं जाणार आहे. यानिमित्ताने नासाबरोबर संयुक्त उपग्रह निर्मिती, वापर आणि अभ्यास करण्याची संधी इस्त्रोला नव्याने मिळाली आहे.

या उपग्रहाच्या निर्मितीबाबत आणि संशोधनाबाबत भारत आणि अमेरिका दरम्यान २०१४ मध्ये करार करण्यात आला होता. या उपग्रहाचे वजन हे सुमारे २७०० किलो एवढे असून पृथ्वीपासून सुमारे ७४७ किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केला जाणार आहे. विशिष्ट उंची आणि शक्तीशाली रडार यामुळे अवघ्या १२ दिवसांत दिवसांत अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रांसह संपूर्ण पृथ्वीचा नकाशा-जमिनीची मोजदाद करणे या उपग्रहामुळे शक्य होणार आहे. या उपग्रहाचा कार्यकाल हा ३ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. हा उपग्रह लॉन्च झाल्यानंतर, ज्वालामुखी, भूकंप, ग्लेशियर्स वितळणे, वादळ, जंगलातील आग, समुद्र पातळी किंवा त्याहून अधिक घट, मान्सून म्हणजे आपण ज्या प्रकारच्या आपत्तींची कल्पना करू शकतो, त्या सर्वांची माहिती देईल. निसार' उपग्रह प्रगत रडार इमेजिंगचा वापर करून जमीन आणि बर्फाच्या उंचवट्यांचे पाच ते १० मीटर पृथक्करण करून महिन्यातून चार ते सहा वेळा पाहणी करेल. पृथ्वीवरील सर्वाधिक गुंतागुंतीच्या काही नैसर्गिक प्रक्रियांचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या मोजमापासाठी या उपग्रहाची रचना केली आहे. यामध्ये परिसंस्थांना होणारे त्रास, हिमनग कोसळणे आणि भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक धोक्यांचा अभ्यास होणार आहे. 'निसार'कडून सर्व माहिती निरीक्षणानंतर एक किंवा दोन दिवसांनी उपलब्ध होईल, तसेच नैसर्गिक आपत्तींसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तो काही तासांतच उपलब्ध होईल.

भूपृष्ठाचा काही भाग जेव्हा काही कारणांमुळे भंग पावतो किंवा कोसळतो, तेव्हा जे छिद्र तयार होते, त्याला विलयछिद्र किंवा भूछिद्र म्हणतात. भूछिद्रे तयार होण्याची बरीच कारणे आहेत. अनेक वेगवेगळ्या संभाव्य यंत्रणांमुळे भूपृष्ठावरील गुहांमध्ये पृष्ठभाग कोसळू शकतो. गुहा लहान किंवा खूप मोठ्या असू शकतात आणि पृष्ठभागाच्या खाली उथळ किंवा खोल असू शकतात. कोसळणे ही प्रक्रिया अचानक, म्हणजे काही सेकंदामध्ये घडू शकते, तर काहींना अनेक दशके लागू शकतात. सध्या आपल्याकडे 'कडे' कोसळणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. जमीन संकुचित होण्याच्या काही दिवस आधी हालचाली सुरू झालेल्या असतात, ज्या आपल्याला 'निसार' इमेजिंगमुळे बरेच दिवस आधी समजण्यास मदत होईल आणि कदाचित मोठी आपत्ती टाळता येईल. बऱ्याच परिसंस्था वणवे आणि आगींमध्ये बेचिराख होतात. वणवे किंवा आगीच्या धोक्याचे वर्गीकरण करणे, शोधणे, होरपळलेले क्षेत्र ओळखणे आणि आगीची तीव्रता मोजणे, हे आगीचे परिणाम कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. हे कार्य 'निसार' करणार आहे. दरवर्षी, तेल आणि रासायनिक गळतीमुळे शेकडो लोकांना आणि पर्यावरणाला हानी पोहोचत असते. महासागर आणि खाडीच्या विस्तीर्ण मोकळ्या पाण्यात सांडलेले तेल जलद ओळखणे हे नुकसान कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि 'निसार' यासाठी आवश्यक माहिती देऊ शकते. 'निसार' भविष्यात भूजल वाचविण्यासाठी आणि इतर अनेक आपत्तींपासून आपल्याला वाचवण्यात यशस्वी होईल. यासह, हे वेळोवेळी अवकाशात जमा होणारा कचरा आणि अंतराळातून पृथ्वीवर येणा-या धोक्यांविषयी देखील माहिती देईल. इस्रो व नासा यांचा निसार हा उपग्रह पृथ्वीच्या अभ्यासासाठी पाठवला जाणारा पहिला उपग्रह नाही. पृथ्वीचा अभ्यास करणारे किमान १३० उपग्रह सध्या अवकाशात फिरत असून ते पृथ्वीचा अभ्यास करीत आहेत. फक्त या संशोधनात कुठलाच समन्वय नाही त्यामुळे एवढे उपग्रह सोडूनही ठोस काही हाती आलेले नाही. ख-या अर्थाने, जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठी लोकशाही असलेले हे दोन देश यानिमित्ताने एकत्र येऊन काम करत आहेत. भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचं हे आणखी एक उदाहरण आहे.

-सुरेश मंत्री 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...