भा रत आता द्विधा अवस्थेत आहे. एकीकडे अनलॉक प्रक्रीयेअंतर्गत रेल्वे, मेट्रो, हवाई वाहतूक, कार्यालये, बाजार आणि कंपन्या सर्व काही सुरू झाले आहेत तर दूसरीकडे कोरोनाची महामारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. स्वत: भारताची महामारीपासून महत्तम महामारीकडे घोडदौड सुरू आहे. या घोडदौडीत त्याने जगातील अधिकतर देशांवर मात केली आहे. एक काय तो अमेरिका पूढे आहे. ब्राझील आणि भारतात कोरोना संक्रमित रूग्णांचा आकडा ४१ लाखांच्या जवळपास बरोबरीत पहुंचला, नंतर मात्र भारताची बुलेट ट्रेन एवढी सुसाट धावू लागली की, ब्राझील खूप मागे पडला. रूग्ण वाढीचा हा वेग असाच राहिला तर भारत लवकरच अमेरिकेलाही मागे टाकेल. सध्या भारतात दररोज कोरोनाने संक्रमित होणा-या रूग्णांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे. यात शंका नाही की या महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारं जीव तोडून प्रयत्न करित आहेत. दररोज १० लाखाच्या आसपास कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. आत्तापर्यंत जवळपास ५ कोटी लोकांची तपासणी करण्यात आली आहे मात्र १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात तपासणीचा वेग असाच राहिला तर सर्वांची तपासणी करण्यात वर्षे लागतील...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.