मुख्य सामग्रीवर वगळा

काँग्रेसला मजबुत नेतृत्वाची गरज

काँग्रेसच्या महत्वपूर्ण २३ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक विशेष संयुक्त पत्र लिहून पक्ष संघटनेच्या विविध समित्यांच्या निवडणूका घेऊन निवडणूकीद्वारे पक्षाचा अध्यक्ष निवडण्याची मागणी केल्याची अभूतपूर्व घटना मागच्या सप्ताहात घडली. यावर राहुल गांधी यांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या २३ जणांच्या मागणीला बंडखोरी ठरवून या नेत्यांचे पक्षातुन खच्चीकरण करून त्यांचे राजकारण अप्रत्यक्षरित्या संपविल्या जाण्याची शक्यता जास्त आहे. मागील दोन लोकसभा निवडणूकींचा निकाल पाहिला असता काँग्रेसची मोठया प्रमाणात घसरण झाली आहे. काँग्रेस मध्ये पक्ष नेतृत्वाची सुत्रे काही अपवाद सोडता नेहमी गांधी घराण्याच्या भोवती फिरत आली आहेत. काँग्रेसला नवसंजिवनी द्यायची असेल तर आत्ता मात्र मजबुत नेतृत्वाची गरज आहे.

प्रादेशिक पक्षांचे तसं बर आहे. यांच्यात अध्यक्षाला घेवून भांडणे होत नाहीत. ज्याचा पक्ष तोच अध्यक्ष. पक्ष सुद्धा तो बनवतो ज्याच्याकडे वोट बँक आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये नेतृत्वावरून भांडण झाल तर हा वाद कौटुंबिकच असतो तोही तेंव्हा जेंव्हा  राजकिय वारसा सांभाळण्याचा प्रश्न निर्माण होतो. उत्तर प्रदेश मध्ये मुलायम सिंह यांचा राजकिय वारसा सांभाळण्यासाठी त्यांचा मुलगा आणि भाऊ यांच्यात वाद झाला. हरियाणा मध्ये चौधरी देविलाल यांचे कुटुंब सुद्धा याच मुद्दयावर विभागले गेले. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या कुटुंबात सुद्धा याच मुद्दयावरून नाही म्हटलं तरी ओढाताण असलेली दिसुन येते. तामिळनाडु मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या मैत्रिण शशिकला आणि पक्षाच्या दूस-या नेत्यांमध्ये पक्ष नेतृत्वावरून वाद निर्माण झाला होता. कर्नाटक मध्ये एच.डी. देवगौडा यांच्या हयातीतच त्यांचा मुलगा कुमार स्वामी याला राजकिय वारसदार म्हणून मान्यता मिळाली आहे.

तमिळनाडु मध्ये डीएमके प्रमुख करूणानिधी यांच्यानंतर त्यांचा मुलगा स्टालिनला घेवून कौटुंबिक वाद झाला नाही. पंजाब मध्ये अकाली दलात सुद्धा हिच स्थिती राहिली. बिहार मध्ये राम बिलास पासवान यांच्या मुलाने पक्ष नेतृत्वाची सुत्रे आपल्या हाती घेतली. राष्ट्रीय पक्षांची स्थिती मात्र वेगळी असते. त्यांना वेगवेगळे राज्य आणि जातींमध्ये समन्वय ठेवावा लागतो. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा चेह-याची गरज ज्याला निवडणूकीच्या वेळी पंतप्रधानांच्या रूपात जनतेसमोर सादर करता येईल. कित्येक वेळा ‘रबर स्टॅम्प’ वाला अध्यक्ष तर चालतो मात्र पंतप्रधान पदाचा उमेदवार प्रभावशाली असणे गरजेचे असते.

जस मोठया बहुराष्ट्रीय कंपन्या दर्जेदार उत्पादने तयार करण्यासाठी मानल्या जातात. त्यांच्याकडे मोठ-मोठे शोरूम तर असतात मात्र या शोरूम पर्यंत ग्राहकांना खेचून आणण्यासाठी एका नामांकित मॉडेलची गरज असते. कित्येक वेळा असं होत की, उत्पादन तर दर्जेदार असत मात्र योग्य पद्धतीने मार्केटिंग न झाल्याने ते बाजारात अयशस्वी ठरत. राजकारण सुद्धा मार्केटिंगच्या फंडयावर आधारलेले आहे. १९७७ हे ते वर्ष होते जेंव्हा काँग्रेस सर्वप्रथम सत्तेच्या बाहेर गेली होती आणि देशात गैर काँग्रेसी सरकार सत्तेत आले होते. विरोधी पक्षांना जयप्रकाश नारायण यांच्या रूपाने एक चमत्कारी चेहरा मिळाला होता, ज्याने स्वतंत्र भारतात दूस-या स्वातंत्र्याची कथा लिहिली. त्यावेळी लोकांनी हे नाही बघितले की, जनता पक्षाचा अध्यक्ष कोण आहे वा त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे. जयप्रकाश नारायण पक्षाचा पर्याय बनले होते.

                                                  या नंतर नव्वदच्या दशकात व्हि.पी.सिंग कडून चमत्काराची आशा दिसु लागली. त्यांच्या माध्यमातुन विविध राज्यांच्या प्रादेशिक पक्षांच्या महायुतीतुन जनता दल सत्तेत आली. चंद्रशेखर, देवगौडा आणि इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान बनले मात्र ते जादुई व्यक्तीमत्वामुळे नाही तर तडजोडीच्या तात्कालिक व्यवस्थेमुळे. याच कारणामुळे यापैकी एकालाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. १९८० मध्ये बनलेली भाजप नव्वदच्या दशकात राम मंदिर आंदोलनाद्वारे राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्यप्रवाहात आली. अगोदर १३ दिवस,नंतर १३ महिने व त्यानंतर पाच वर्षे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार चालवण्यात यशस्वी झाली. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भारतीय राजकारणातले सर्वात उंच व्यक्तीमत्व आणि जादुई चेहरा असणारे नेते बनले होते. राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसला असा जादुई चेहरा मिळाला नाही तर दुसरीकडे गैर काँग्रेसी-गैर भाजपा जिला तिसरी आघाडी म्हटल जात तिच्याकडे सुद्धा अटल बिहारी वाजपेयी यांच्यापेक्षा मोठा जादुई चेहरा नव्हता. त्यामुळे भाजपाला पक्षाचा अध्यक्ष कोण असेल याची चिंता नव्हती. बंगारू लक्ष्मण पासुन जना कृष्णमुर्ती आणि वेंकैया नायडू पक्षाचे अध्यक्ष बनवले गेले.

२००४ मध्ये शाइनिंग इंडियाचा नारा देवुन निवडणूकीत उतरलेली अटलजींची सरकार सत्तेत पुनरागमन करू शकली नाही. कारण, तोपर्यंत सोनिया गांधी यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली होती. अशी धारणा होती की, काँग्रेस सत्तेत येताच त्या पंतप्रधान बनतील. मात्र पंतप्रधान बनण्याची वेळ येताच त्या काही पंतप्रधान बनल्या नाहीत मात्र काँग्रेस दोन वेळा सत्तेत आली. पहिल्या निवडणूकीत भलेही मनमोहन सिंह पंतप्रधान पदाचा चेहरा नव्हते मात्र ते दूस-या निवडणूकीत लालकृष्ण अडवाणी यांच्यावर भारी पडले. त्यामुळे भाजप अध्यक्ष बदलत राहिली.

           अडवाणी, राजनाथ सिंह, नितिन गडकरी आणि त्यानंतर पुन्हा राजनाथ सिंह भाजपाचे अध्यक्ष बनले. शेवटी असं लक्षात आल की, पक्षाला जादुई चेह-याला पूढे करण्याची गरज आहे. हा शोध शेवटी नरेंद्र मोदी यांच्यावर येवुन थांबला. नरेंद्र मोदी तो चेहरा बनले जो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचललेला दिसुन येतो. पक्षाने फक्त दोन लोकसभा निवडणूकाच जिंकल्या नाहीत तर विविध राज्यात सुद्धा तिला मोदींच्या नावाखाली विजय मिळत आहे. ईथेच काँग्रेस समोर संकट ऊभा टाकले आहे. पक्षाची पूर्ण पराकाष्ठा राहुल गांधी यांना स्थापित करण्यासाठी आहे. सोनिया गांधी यांना पंतप्रधान बनायचे असते तर त्या २००४ मध्येच बनल्या असत्या. राहुल गांधी यांचा सामना नरेंद्र मोदींशी असल्याने राहुल गांधींची अडचण झाली आहे. त्यांचे नेतृत्व नरेंद्र मोदींची बरोबरी करू शकत नाही. गांधी परिवाराला सोडुन पहायच म्हटलं तर काँग्रेसकडे असा कोणता चेहरा दिसत नाही. हिच गोष्ट भाजपासाठी सकारात्मक आणि काँग्रेससाठी मोठया अडचणीची आहे.

-सुरेश मंत्री 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...