मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यंत्र आणि मानव

हे सर्व तर ठिक आहे पण तु नेमक काय काम करतोस ? मुलीचे वडिल आपल्या मुलीच्या मित्राला विचारत आहेत.त्यांच्या प्रश्नात शक्यतेच्या शोधासोबत मोठ्या प्रमाणावर सांशकता आहे.सर्जनशिलता तर ठिक आहे मात्र यात पैसा कुठे आहेत ? हे दृश्य आजचे नाही तर भावी काळाचे आहे कारण त्या काळात सर्जनशिलता माणसाची नाही तर दुस-याच कुणाची तरी होवून जाईल.आज यंत्र मानवी जीवनाचा अविभाज्य अंग होवून राहिली आहेत.या यंत्रांमुळेच मी-आपण एवढे बदलले आहोत की हे दृश्य जर एखादा १५ व्या शतकापूर्वीच्या मानवाने बघितले असते तर तो हे बघून बेशुद्ध झाला असता किंवा आपल्या डोळ्यावरच विश्वास ठेवू शकला नसता.आपल जीवन यंत्रांच्या साह्याने अधिक सुखकारक करण्याच्या प्रयत्नात आज मानवाचीच यंत्र बनण्याची वेळ आली आहे एवढच नाही तर भविष्यात त्याच अस्तित्वच धोक्यात येणार आहे. यंत्रांचा पहिला संबंध माणसाच्या बेरोजगारीशी आहे.यंत्र आली , त्यांनी मानवाच्या पेक्षाही अधिक कुशलतेने आणि वेगाने कामे केली तर माणस कुठ जातील ? ती आपल पोट कस भरतील ? त्यांच्या कुटुंबाच काय होईल ? हा प्रश्न जवळपास २०० वर्षांपूर्वी मानवाला पडला होता.हा प्रश्न आणि त्याला जोडून अ...