मुख्य सामग्रीवर वगळा

यंत्र आणि मानव


हे सर्व तर ठिक आहे पण तु नेमक काय काम करतोस? मुलीचे वडिल आपल्या मुलीच्या मित्राला विचारत आहेत.त्यांच्या प्रश्नात शक्यतेच्या शोधासोबत मोठ्या प्रमाणावर सांशकता आहे.सर्जनशिलता तर ठिक आहे मात्र यात पैसा कुठे आहेत?हे दृश्य आजचे नाही तर भावी काळाचे आहे कारण त्या काळात सर्जनशिलता माणसाची नाही तर दुस-याच कुणाची तरी होवून जाईल.आज यंत्र मानवी जीवनाचा अविभाज्य अंग होवून राहिली आहेत.या यंत्रांमुळेच मी-आपण एवढे बदलले आहोत की हे दृश्य जर एखादा १५ व्या शतकापूर्वीच्या मानवाने बघितले असते तर तो हे बघून बेशुद्ध झाला असता किंवा आपल्या डोळ्यावरच विश्वास ठेवू शकला नसता.आपल जीवन यंत्रांच्या साह्याने अधिक सुखकारक करण्याच्या प्रयत्नात आज मानवाचीच यंत्र बनण्याची वेळ आली आहे एवढच नाही तर भविष्यात त्याच अस्तित्वच धोक्यात येणार आहे.
यंत्रांचा पहिला संबंध माणसाच्या बेरोजगारीशी आहे.यंत्र आली,त्यांनी मानवाच्या पेक्षाही अधिक कुशलतेने आणि वेगाने कामे केली तर माणस कुठ जातील?ती आपल पोट कस भरतील?त्यांच्या कुटुंबाच काय होईल?हा प्रश्न जवळपास २०० वर्षांपूर्वी मानवाला पडला होता.हा प्रश्न आणि त्याला जोडून असलेल्या समस्यांना लडाइट फैलेसी अस नाव देण्यात आल आहे.या प्रश्नामुळेच यांत्रिकीकरणाच्या विरोधात लढ्याला सुरूवात करणारे पहिले कामगार इंग्लंडचे लडाइट कामगार होते कारण औद्योगीकरणाला सुरूवात इंग्लंडमधुनच झाली होती.यंत्र जर माणसाची काम करू लागली तर आपल्या अस्तित्वाला धोका आहे,आपल्याला बेरोजगार व्हावे लागेल म्हणून या कामगारांनी कापसावर प्रक्रिया करणा-या उद्योगातील यंत्र नष्ट केली होती.त्यांच म्हणन होत की,यंत्र हटवा ज्यामुळे माणसाच्या हाताला काम राहिल.हाताला काम असेल तेंव्हाच तो जगू शकेल अन्यथा कामाशिवाय माणुस आपले जीवन कसे व्यतीत करेल?
मात्र यंत्रांचे ते युग माणसासाठी नवी कामं घेवून आले.यंत्र मानवालाच तर बनवायची होती आणि त्यांची दुरूस्ती करणारा ही मानवच करणार होता.माणसाच काम यंत्र करणार होती मात्र त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी मानवाचीच गरज होती त्यामुळे त्या काळात कामगार नष्ट झाले नाहीत.हो,त्यांची कामांची स्वरूपं बदलली एवढ मात्र झाल.जी काम अगोदर मानव करायचा ती काम यंत्रांनी करायला सुरूवात केली.मानवाच काम आता या यंत्रांची देखरेख करणे.अशा प्रकारे लडाइट कामगारांची भिती आणि सांशकता दोन्ही चूकीच्या सिद्ध झाल्या ज्याला लडाइट फैलेसी या नावाने ओळखल जात.
यंत्रांमुळे मानव भावनाशून्य बनत चालला आहे.तो जितका यंत्रांसोबत जुडत चालला आहे तितकाच आपले मित्र,नातेवाईक,सहकारी आणि निसर्गापासून दूर होत चालला आहे.अशात माणसातील मानवता आणि नैतीक मूल्ये नष्ट होत चालली आहेत यामुळे यांत्रिकीकरणाची ही क्रांती घातक आहे.ही क्रांती फक्त मानवाच्या जागी फक्त यंत्र आणत नाही तर त्याच्यापासून त्याची मानवता हिरावून घेत आहे.एकीकडे यांत्रिकीकरणामुळे त्याच्यावर बेरोजगारीची कु-हाड आहे तर दूसरीकडे त्याच्या संवेदना हरवत चालल्या आहेत.अशात प्रश्न हा निर्माण होतो की,तो बिचारा कुठे जाईल.
भविष्यात आपण ज्या जगात प्रवेश करणार आहोत तिथे बेरोजगारांची संख्या वाढलेली असेल.पहिली वेळ त्यांच्यावर येईल जे केवळ एकाच प्रकारच काम करतात.भविष्यात आपल्याला चालकाची गरज लागणार नाही,न प्लंबर,न वाहतूक नियंत्रकाची.ही सर्व काम रोबोट करतील किंवा असे जीव जे खास तयार केलेले असतील.मी जीव यासाठी म्हणतोय कारण यांच्यात तुमच्या-माझ्या सारखी निर्णय घेण्याची क्षमता असेल आणि कित्येक वेळा ते आपल्या पेक्षाही बुद्धीमान असतील.नंतर हळू-हळू ही यंत्र पांढर पेशा कामांनाही सांभाळतील.
मानव अशात जर विचार करत असेल की,तो कथा-कविता,संगीत-नृत्य करेल तर ही स्थिती सुद्धा जास्त काळ राहणार नाही.ही कृत्रीम बुद्धीमत्तेने संपन्न बुद्धीजीवी या कामातही मानवाला मागे टाकतील.त्यांच्या कविता आपल्या कवितांपेक्षा सरस असतील,त्यांच्या कला आपल्या कलांपेक्षाही अद्भूत असतील.अशात प्रश्न हा निर्माण होतो की त्या वेळी मानव प्रजातीसाठी कोणते काम करण्याचा पर्याय राहिल?
आपले काम केवळ पैसाच मिळवून देत नाही तर आपल्याला ओळख आणि स्वाभिमान सुद्धा मिळवून देते आपण या गोष्टीशी जरूर सहमत असाल.आपल्या कामामुळे आपल्याला समाजात स्थान मिळते.हे खरं आहे की भावी काळात पैसा कमवणारे लोक कमीत-कमी काम करतील आणि त्यांच्याकडे सर्जनशील कामांसाठी खूप वेळ असेल मात्र प्रत्येक माणसांकडे सर्जनशिलता असू शकत नाही.मग काम यंत्रांनी हिरावून घेतल्यामुळे  त्यांच्यात एक वेगळ्याच प्रकारच नैराश्य निर्माण होईल.मानवाच्या जवळ वेळच वेळ असेल यामुळे अनेक प्रश्न आ वासून उभा राहतील.तो आपल्या रिकाम्या वेळेचा केवळ रिकाम बसून किती उपभोग घईल?तो आपली ओळख कशा प्रकारे बनवेल?तो स्वत:ला समाजासाठी कशा प्रकारे आवश्यक सिद्ध करेल?
आपण आता अशा स्थितीत पोहचत आहोत जिथ मानवाची भौतिक प्रगती खूप वेगाने होत आहे.इथ लडाईट फैलैसीच्या आधारे असं म्हणता येणार नाही की नविन यंत्र मानवासाठी नविन काम घेवून येतील कारण २०० वर्षांपूर्वी सुरू झालेले यांत्रिकीकरण आत्तापर्यंत खूप सावकाश होत होते त्यामुळे मानवाला स्वत:ला सावरण्यासाठी वेळ मिळत होता.आता तर वर्ष दर वर्ष ही यंत्र अत्याधिक विकसीत होवून मनुष्याची बरोबरी करतील आणि काहीतर त्याच्यापूढे सुद्धा निघून जातील.तेंव्हा त्यांच्यानूसार बदलण्यासाठी मानवाला वेळ मिळणार नाही.त्यावेळी मानवाला यंत्रांच्या पावलांसोबत पाऊल मिळवणे अवघड होवून बसेल.सरळ शब्दात म्हटल तर यंत्रांपेक्षा मागासलेल्या मानवांची लोकसंख्या वाढत जाईल.संयम राखा बायनर-कुसुमाग्रज-मांडगुळकरांच्या पेक्षाही सरस कविता करणारी,रफेल-पिकासा पेक्षाही सरस चित्र काढणारी ,सिकंदर-समुद्रगुप्तापेक्षाही सरस युद्ध नायक यंत्रांच्या रूपान आपल्यात येणार आहेत.आपणच त्यांना बनवणार आहोत मात्र ते आपल्यापेक्षाही सरस असतील.त्यांच्यात आपले सर्व गुण असतील मात्र ते मानवनिर्मीत असतील निसर्गनिर्मीत नाही.अशात मणुष्याला भावी काळातील आपली भूमिका आणि प्रासंगिकता यावर गांभिर्याने विचार करायला हवा.
शंकराने भस्मासुराला वरदान दिले त्याने दिलेल्या वरदानाचा दूरूपयोग केला.अनेक बुद्धीजीवींनी विज्ञानाच्या भस्मासुरी दुरुपयोगाबद्दल चेतावनी दिली आहे मात्र या स्वरांना कृत्रीम बुद्धीजीवीचा तीव्र स्वर जेंव्हा दाबून टाकेल आणि मनुष्यच मनुष्याची गोष्ट ऐकणार नाही तेंव्हा काय आणि कोण शिल्लक राहिल.
-सुरेश मंत्री.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...