मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे पुस्तक : शाळा एके शाळा

  द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड येथे कार्यरत असणारे सहशिक्षक श्री. माधव अरूणराव डाके लिखित 'शाळा एके शाळा' ही लघुकादंबरी. पुस्तकाच्या शिर्षकावरूनच हे पुस्तक शिक्षणक्षेत्राशी संबंधित असल्याचे लक्षात येते. माधव डाके हे स्वत: शिक्षक म्हणून एका शाळेत काम करत असल्याने शिक्षण संस्था, संस्थाचालकांचा शाळेच्या प्रगतीबद्दलचा दृष्टीकोन, मुख्याध्यापकाला संस्था व शिक्षक यामधील दुवा म्हणून काम करीत असताना प्रशासन चालवताना करावी लागणारी कसरत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे मनोभाव यांचे त्यांनी जवळून निरीक्षण केलेले असल्याने ही कादंबरी लिहीताना त्यांनी शिक्षणक्षेत्राच्या वास्तविकतेशी सांगड घातली आहे.  पुस्तकास पत्रकार, साहित्यिक स्वर्गीय प्रा. एकनाथ आबुज यांची प्रस्तावना लाभलेली असून ह.भ.प. मोहन महाराज खरमाटे यांचा शुभेच्छा संदेश आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आणि बोलके आहे. एक चांगला मुख्याध्यापक उत्तम शिक्षक असतोच असे नाही तसेच एक चांगला शिक्षक चांगला मुख्याध्यापक बनु शकतोच असे नाही असे म्हटले जाते. एक चांगला मुख्याध्यापक शाळेला केवळ एक इमारत नाही, तर एक समुदाय ...