मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उदारमतवादी अमेरिका पुराणमतवादाकडे ?

 अमेरिकेत कोणत्याही महिलेला कायद्याच्या चौकटीत राहून गर्भपात करण्याचा घटनात्मक अधिकार होता आणि कोणतंही सरकार त्यावर बंदी घालू शकत नव्हतं. अमेरिकेतील एका खटल्यात सुप्रीम कोर्टाने ५० वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात देण्यात आलेला निकाल रद्द केला आहे. यामुळे अमेरिकेत आता महिलांना गर्भपात करण्याचा घटनात्मक अधिकार राहणार नाही. मेरिकी सर्वोच्च न्यायालयात रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य असल्यामुळे ६ विरुद्ध ३ अशा बहुमताने गर्भपाताचा अधिकार रद्द ठरवण्यात आला. या नव्या निर्णयात कोर्टाने स्पष्ट केलं की आता हा अधिकार घटनात्मक नाही, तसंच तो केंद्रीय (फेडरल) ही नाही. म्हणजेच आता अमेरिकेतली वेगवेगळी राज्य गर्भपातावर बंदी घालू शकतात. अमेरिकेत स्त्री म्हणून एका महिलेच्या मूलभूत अधिकाराबाबत काय सुरू आहे ? आपल्या शरीरासंदर्भातले, लैंगिक परिमाण आणि परिणामासंदर्भातले निर्णय ती का घेऊ शकत नाही ? स्त्री-पुरूष समानतेच्या आयामात आज अमेरिकन स्त्री कुठे आहे ? आपल्या शरीराविषयी निर्णय घेण्याचे अधिकार फक्त महिलांना असावेत. यात समाज, शासन किंवा धर्म यापैकी कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. गर्भपाताला कायदेशीर प...

'अग्निपथ' योजना अभिनव पण...

  भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी केंद्र सरकारने ‘अग्निपथ’  योजना सुरु केली आहे. सरकारच्या प्रस्तावित अग्निपथ योजनेत सुमारे ४०,००० जवानांची भरती करण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी तिन्ही सैन्य दलात देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. या योद्ध्यांना अग्नीवीर बोलले जाणार आहे. अग्निपथ योजनेतील जवानांसह कमांडिंग अधिकारी पूर्वीप्रमाणेच ऑपरेशनल कार्ये करत राहतील. नियंत्रण रेषेवर जवान तैनात करताना बॅट कारवायांविरुद्ध मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता असेल. नियंत्रण रेषेवर गस्त आणि प्रतिकार करून घुसखोरीचे डाव उधळले जातील. सीओ किंवा सब-युनिट कमांडरसाठी अग्नीवीर आणि कायमस्वरूपी जवानांमध्ये कोणताही फरक नसेल. दोघांनाही अखंडपणे आणि एकत्रितपणे कार्य करावे लागेल. सशस्त्र दल हे अनेक तरुणांसाठी पहिल्या पसंतीचे करिअर असते. लष्करातील  ६०,००० हून अधिक रिक्त पदांसाठी इच्छुक असलेले लाखो लोक दरवर्षीच्या भरती शिबिरांना हजेरी लावतात. ते जवान पेन्शन आणि सन्मानाचे इतर लाभ मिळवण्यासाठी १५, १७ किंवा १९ वर्षे सेवा करतात. हे जवान १५ ते १९ वर्षांऐवजी फक्त चार वर्षे सेवा देतील. १८ वर्षांच...

नविन कामगार कायदा

 तब्बल ७३ वर्षानंतर पहिल्यांदा कामगार कायद्यात बदल होणार असून येत्या १ जुलै पासून सुधारित कामगार कायदा अस्तित्वात येईल अशी चर्चा आहे. अद्याप सरकारकडून मात्र याबाबतीत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नव्या कामगार कायद्यात आठवड्याला ४ दिवस काम आणि तीन दिवसांची सुट्टी असणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांना दिवसाला १२ तास काम करावं लागणार आहे. कारण आठवड्याला ४८ तास काम ही मर्यादा तशीच ठेवली आहे. कामाचे तास ९ वरून १२ केल्यास त्याला तीव्र विरोध करण्याची भूमिका कामगार संघटनांनी घेतली आहे. या १२ तासाच्या कामात दर ५ तासानंतर प्रत्येकी अर्ध्या तासाची विश्रांती अथवा ब्रेक दिला जाईल. ओएसएच कोडच्या नियमानुसार १५ ते ३० मिनिटांमधील अतिरिक्त कामकाजाला ३० मिनिटे ग्राह्य धरून त्याचा समावेश अतिरिक्त कामात म्हणजे ओव्हर टाइममध्ये केला जाणार आहे. सध्या ओव्हर टाइम हा ३० मिनिटांपेक्षा कमी कामाला ग्राह्य धरला जात नाही. कर्मचारी आपल्या सुट्ट्या पूढील वर्षी कॅरीफॉरवर्ड करू शकेल. ब-याच ठिकाणी सहा-सहा महिन्यांनी उरलेल्या सुट्ट्या लॅप्स होतात. आता उरलेल्या सुट्ट्यांचे कंपनीकडून पैसे देखील मिळवता येणार आहेत. याचबरोबर रज...

भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम

भारत २०२३ मध्ये पहिली मानवी अंतराळ मोहीम राबवणार आहे. भारत अंतराळात मानवी मोहीम आणि पहिली मानवी सागरी मोहीम समांतरपणे ' गगनयान ' या नावाने राबवणार असल्याची माहिती आहे. भारतीयांना अंतराळात पाठवण्याचा संकल्प करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१८ च्या स्वातंत्र्यदिनी   लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात या मोहिमेची घोषणा केली होती. २०२२ पर्यंत देशातील एखाद्या तरुणाला अथवा तरुणीला अंतराळात पाठवण्यात येईल   असं मोदींनी म्हटलं होतं. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अवकाशवीर आहेत. त्यांनी २ एप्रिल १९८४ रोजी रशियाच्या सोयूझ टी-२ या यानातून अवकाशात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत रशियाचे दोन अवकाशवीर होते. राकेश शर्मा भारतीय हवाई दलात वैमानिक होते. त्यावेळी राकेश शर्मा यांनी अवकाशातून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संवाद साधला होता. अंतराळातून भारत कसा दिसतो या इंदिरा गांधी यांच्या प्रश्नावर , ‘ सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ असे उत्तर राकेश शर्मा यांनी दिले होते. राकेश शर्मा यांना पुढे अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. इस्रो ही संस्था तमाम भारतीयांसाठी अभि...

वणव्याची मिळेल पूर्वकल्पना

   पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्पांमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतेय. तर यात आता जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होतंय आणि यातून पर्यावरणाचा -हास होण्याचा धोका अधिक असतो. यातून आपला ऑक्सिजनचा एक महत्त्वाचा स्रोतही गमावला जात आहे. जंगल आगीमुळे पर्यावरणाची हानी तर होतेच आहे. पण कार्बन डायऑक्साईडही वातावरणात वाढतो आहे. हा हरितगृह वायू आहे व त्याचा प्रतिकूल परिणाम पृथ्वीचे तापमान वाढीमध्ये दिसून येत असल्याचे संशोधनात पुढे आल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात. जागतिक पर्यावरण बदलामुळे आधीच खराब झालेली पर्यावरणीय परिस्थिती जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे अधिकच बिकट होत चालली आहे असेही पर्यावरणवादी वेळोवेळी आठवण करून देत आहेत. ज्या वेळी जंगलामध्ये आगी लागतात तेव्हा लहान किटकांपासून ते मोठ्या वन्यप्राण्यांपर्यंत सर्वांच्या अधिवासावर त्याचा आघात होतो. या वन्यप्राण्यांना उपलब्ध असलेलं खाद्य हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहत नाही. आग लागल्यानंतर पाऊस पडल्यानंतर तिथल्या जंगलांच पूर्वीसारखं जीवन होत नाही. त्यामुळे अन्नसाठा  कमी झाल्यामुळे आणि त्यां...