भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. वहिदा रहमान यांनी ६०–७० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. इतकंच नाही तर, वहिदा यांनी १९६४ ते १९६९ या काळात हिंदी सिनेसृष्टीती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असा त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडिने बघतात. अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री वहीदा रहमान असून, त्यांनी अनेक चित्रपटात बिग बींच्या आईची भूमिका साकारली आहे. वहिदा रहमान आणि देव आनंद यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘सीआयडी’ पासून ‘गाईड’ पर्यंत या दोघांनी अनेक उत्तम चित्रपट एकत्र केले आहेत. नेमकं देव आनंद यांच्या वाढदिवशी वहिदा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा झाली याचा आनंद स्वतः वहिदा यांनी व्यक्त केला. वहिदा यांचा जन्म जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट गावात एका उच्चविभूषीत मुस्लीम कुटुंबा...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.