मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लिहिणं-वाचणंच विसरलेली मुलं

  सं युक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, संपूर्ण जगातील सुमारे १६० कोटी विद्यार्थ्यांवर कोरोनाच्या संकटाचा परिणाम झाला आहे. हा आकडा संपूर्ण जगभरातील विद्यार्थ्यांच्या ९४ टक्के एवढा आहे. त्यातही ९९ टक्के विद्यार्थी अल्पविकसित आणि विकसनशील देशांमधील आहेत. भारतात कोरोनाचा परिणाम सुमारे ३२ कोटी विद्यार्थ्यांवर झाला आहे. हा परिणाम प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणावरही एकसारखाच झाला आहे. प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे मुलांच्या बाराखडीवर परिणाम होत आहे. बाराखडी म्हणजे शिक्षणाची सुरुवात. त्यांना बाराखडी ओळखणेसुद्धा अवघड झाले आहे. आता साधे बेरीज, वजाबाकीसुद्धा चौथी, पाचवीच्या मुलांना जमत नाही. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे. एका अंदाजानुसार, सुमारे २.५ कोटी पूर्व प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांना कोरोना महामारीमुळे शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात पुन्हा प्रवेशच करता येणार नाही किंवा ते शिक्षण प्रवाहाच्या बाहेरच फेकले जातील. या समस्येवर कोणता तोडगा आहे किंवा असू शकतो? सर्वांनीच चिंतन करावे, असा हा विषय आहे. संपूर्ण देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाला आळा ...

शाळा बंद असल्यामुळे मुलांचं दिर्घकालीन नुकसान

    शा लेय शिक्षण विभागाने १७ ऑगस्ट २०२१ पासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता. कोरोना संसर्ग पसरण्याची भीती आणि तिसऱ्या लाटेची शक्यतेमुळे कोव्हिड टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना शाळा घाईने न सुरू करण्याबाबत सूचना केली होती. यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय तूर्तास लांबणीवर टाकला. शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत जीआर काढल्यानंतर दोन दिवसातच हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. त्यामुळे सरकारमध्ये समन्वय नाही हे स्पष्ट झालं. शाळा सुरू होणार का नाही, याबाबत अनिश्चितता असू नये. सरकारने याबाबत स्पष्ट निर्णय घ्यायला हवा. यूनिसेफच्या मते शाळा बंद असल्याने देशभरातील जवळपास २५ कोटी मुलांवर याचा परिणाम झाला आहे. शाळा बंद असल्यामुळे मुलांचं दिर्घकालीन नुकसान होणार आहे.                  शहरी भागात महापालिका आयुक्त आणि ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. राज्यातील शाळा सुरू कराव्यात का नाही यासाठी शिक्षण विभ...

महिलांच्या अधिकारांबाबत तालिबानचा मुखवटा ?

 आता अफगाणिस्तान मध्ये तालिबानची सत्ता आहे. तालिबान ही कट्टर इस्लामिक संघटना म्हणून ओळखली जाते. २० वर्षांपूर्वी तालिबान राजवटीत अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी अत्यंत कठोर कायदे होते. पण, आता तालिबानने महिलांचे हक्क अबाधित राहतील, असा दावा केला आहे. तरीही या सरकारमध्ये २० वर्षांपूर्वी महिलांची स्थिती काय होती आणि आताही ती तशीच राहणार का? याबाबत भीती व्यक्त केली जात आहे. आता तालिबान महिला स्वातंत्र्याबाबत खरंच उदार होणार की हा फक्त एक मुखवटा आहे? गेले काही दिवस सोशल मिडियावरून मिळेल त्या वाहनानं अफगाणिस्तानमधून पलायन करणा-या हजारोंचे फोटो व्हायरल होत आहेत. आश्चर्याची गोष्ट ही की यात स्त्री मात्र दिसत नाही. जवळपास सगळ्या फोटोत अफगाणी पुरूष दिसत आहेत. याचा अर्थ आता मागे जी जनसंख्या उरेल त्या बहुतांश स्त्रियाच असतील. शिक्षण नसणा-या, बाहेरच्या जगाचा गंधही नसणा-या, सतत पुरुषी वर्चस्वाखाली राहून दबलेल्या, पिचलेल्या अशा बहुसंख्य लोकसंख्येचं नवीन अफगाण सरकार काय करेल? हा खरा प्रश्न आहे. आधीच्या सरकारचे महिलांविषयीचे जे कायदे होते ते अबाधित राहणार असल्याचा दावा तालिबान्यांकडून करण्यात येत आहे. म...

जीवघेणी सेल्फी

से ल्फी काढण्यात जेवढी मजा आहे तेवढेच त्याचे चांगले-वाईट परिणामही आहेत. याचा प्रत्यय वारंवार होणाऱ्या घटनांमुळे येत असतो. वैयक्तिक जीवनात अनेकांनी सेल्फीमुळे आपला जीव गमावला आहे. मागे सेल्फी काढण्याच्या नादात गोसेखुर्द धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून दोन सख्ख्या भावंडांचा करुण अंत झाला. हे दोघे भाऊ स्वातंत्र्य दिनानिमित्त धरणावर फिरायला आले होते. सेल्फी काढताना पाय घसरलेल्या एका भावाला वाचवताना दुसऱ्यालाही प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे. सेल्फीच्या वेडापायी जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण सर्व वयोगटांमध्ये असले तरी ते तरुणांमध्ये   अधिक प्रमाणात आहे. सेल्फीचा धोका सरकारनेही ओळखला आहे , ही यातील सकारात्मक बाब म्हणावयास हवी. खुद्द वैद्यकीय क्षेत्रानेच या वेडाला मानसिक आजार म्हटले आहे त्यामुळे या संदर्भात शाळा , महाविद्यालयांच्या पातळीवर प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत आपसुकच अशा काही नकारात्मक गोष्टींची आव्हाने समोर येत राहतील , त्यांना सामोरे जाण्याची तयारीही ठेवलीच पाहिजे. भारतातील सव्वाशे कोटी लोकांपैकी ८० कोटी लोकांकडे मोबाईल फोन आहे आणि मोबाईलचा वापर कॅमेर...

धगधगते अफगाणिस्तान

 गौतम बुद्धांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला होता. मात्र आज जग या मार्गावर चालताना दिसत नाही. जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जगाची संपूर्ण शक्ती काही निवडक देशांच्या हाती एकवटली आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यात संयुक्त राष्ट्र संघटना कुचकामी ठरली आहे. आपला शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानात अस्थिरतेचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात लोक आपला जीव वाचवण्यासाठी काबुलकडे पलायन करत आहेत. इथे मोठ्या प्रमाणात मानवी अधिकारांच हनन होत आहे. जग मात्र या युद्धाकडे शांत राहुन पाहत आहे. तालिबानी बंडखोरांनी एकप्रकारे शक्तीशाली देशांना आव्हान दिले आहे. गटातटात विभागलेले देश याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. आपला शेजारी पाकिस्तान या तालिबान्यांना सहकार्य करित आहे. अनेक वर्षे धुमसत असलेल्या अफगाणिस्तानात शांती कधी बहाल होईल? हा खरा प्रश्न आहे.  अमेरिकेच्या लष्करानं २० वर्षांपूर्वी तालिबानला पायउतार केलं होतं. आता अमेरिकेनं माघार घेतल्यानंतर तालिबाननं पुन्हा अफगाणिस्तानात इस्लामी सरकार लागू करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेत असताना या प...

शेतक-याच्या पोरानं इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकवला !

भा रताचा  भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे , यापूर्वी नेमबाजपटू अभिनंव बिंद्राने २००८ मध्ये   नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले होते. त्यानंतर अशी कामगिरी कोणालाही करता आली नव्हती. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६४ व १९८४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोड्याश्या फरकानं ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. पण , अॅथलेटिक्समधील इतिहास आज नीरज चोप्रानं बदलला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अॅथलेटिक्समधील १२५ वर्षांचा भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. नीरजच्या या सुवर्णपदकामुळे टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताच्या पदकांची संख्या ७ इतकी झाली आहे. यामुळे ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद झाली आहे. भारताने याआधी २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये ६ पदक जिंकली होती. ती कामगिरी भारताने मागे टाकली आहे. भारताचा नीरज चोप्रा हा भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात दाखल झाला होता आणि त्याच्याकडून आज सुवर्णपदकाची अपेक्षा होती....

कुस्तीत रवीकुमारने घडवला इतिहास

भा रताचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने गुरूवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे. याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य, बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोरगोहेन हिने कांस्य पदक जिंकून दिले होते. तर याच दिवशी  सकाळी भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते. कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने भारताच्या रवीकुमारचा पराभव केला. पहिल्या फेरीनंतर रवीकुमार ४-२ असा पिछाडीवर होता. झावूरने प्रत्येकी एक असे दोन गुण मिळवले. त्यानंतर रवीकुमारने दोन गुण मिळून बरोबरी केली. तर झावूरने पुन्हा दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर झावूरने आणखी ३ गुण मिळवत ७-२ अशी आघाडी केली. अखेर झावूरने रवी कुमारवर ७-४ असा विजय मिळवला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणाऱ्या रविकुमार दहियावर सध्या देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रौप्य पदक विजेत्या या आपल्या खेळाडूसाठी हरियाणा सरकारने राज्याच्या तिजोरीच...

चक दे इंडिया

भा रताच्या  पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील ४१ वर्षापासूनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला. कांस्य पदकासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारताने जर्मनीचा ५-४ ने पराभव करून ऐतिहासिक असा विजय मिळवला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. यावेळी कर्णधार मनप्रीत सिंगने आणखी एक वाखाणण्याजोगी कृती करत हे पदक कोविड योद्ध्यांना समर्पित केल्याची प्रतिक्रिया केली. आनंदाच्या , जल्लोषाच्या वातावरणातही संवदेनशीलता जपत सिंगने ही प्रतिक्रिया दिली हे विशेष. एकेकाळी ऑलिम्पिक खेळांच्या हॉकी स्पर्धांवर भारतीय पुरुषांचे एकहाती वर्चस्व होते. सलग काही वर्षे सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय संघाला १९८० नंतर मात्र एकही पदक पटकावता आले नाही. सेमीफायनलपर्यंत देखील धडक न मारता आल्याने भारतीय हॉकी संघ गेल्या ४१ वर्षांपासून पदकाची वाट पाहत होता. पण यंदा भारतीय संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये थोडक्यात पराभव झालेल्या भारतीयांनी तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात कोणतीच चूक न करता जर्मनीला नमवत कांस्य पदक जिंकलं.   या पदकासाठी संपूर्ण स...

लवलीनाने कांस्य पदकावर कोरलं नाव

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये २३ वर्षीय भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनने महिला बॉक्सिंगमध्ये इतिहास रचला आहे. सेमिफायनलमध्ये भलेही तिचा पराभव झाला मात्र तिनं देशासाठी कांस्यपदक पदक जिंकलं आहे. तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेनेलीनं लवलीनाचा पराभव केला. लवलीनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं होतं. बुधवारी ती पदकाचं रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र तिला पदकाचा रंग बदलण्यात यश मिळाल नाही. तुर्कीच्या खेळाडू बुसेनाझने लवलीनावर पहिल्यापासूनच वर्चस्व राखले होते. लवलीनापेक्षा अनुभवी आणि चपळ असलेल्या बुसेनाझने प्रत्येक संधीचा फायदा घेत बाजी मारली. बुसेनाझने तिन्ही राउंड जिंकत एकहाती सामना जिंकला. लवलीना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. लवलीनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लवलीना तिसरी भारतीय बॉक्सर बनली आहे. याआधी...

पी.व्ही.सिंधूने रचला इतिहास

भा रताची फुलराणी स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून दिलं आहे. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात तिने चीनच्या खेळाडूचा फडशा पाडत कांस्यपदक पटकावले आणि भारताच्या बॅडमिंटन विश्वामध्ये इतिहास घडवला. बॅडमिंटनमध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली असून वैयक्तिक दोन पदके जिंकणारीही ती पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आत्तापर्यंत एक रौप्य आणि एक कांस्य अशी दोन पदके जमा झाली आहेत.        शनिवारी पी.व्ही.सिंधू उपांत्य फेरीचा सामना जिंकू शकली नाही, यामुळे तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. मात्र उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर कांस्यपदक जिंकण्याची तिला संधी होती. या संधीचं तिने सोनं केलं. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात तिने आक्रमक खेळ केला. ५२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने चीनच्या बिंग जिआओला २-० असे नमवले. सिंधूने पहिला सेट २१-१३ तर दुसरा सेट २१-१५ असा जिंकला. या आधी उपांत्य फेरीत झालेल्या लढतीत सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते.  पी.व्ही.सिं...