मुख्य सामग्रीवर वगळा

धगधगते अफगाणिस्तान


 गौतम बुद्धांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला होता. मात्र आज जग या मार्गावर चालताना दिसत नाही. जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जगाची संपूर्ण शक्ती काही निवडक देशांच्या हाती एकवटली आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यात संयुक्त राष्ट्र संघटना कुचकामी ठरली आहे. आपला शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानात अस्थिरतेचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात लोक आपला जीव वाचवण्यासाठी काबुलकडे पलायन करत आहेत. इथे मोठ्या प्रमाणात मानवी अधिकारांच हनन होत आहे. जग मात्र या युद्धाकडे शांत राहुन पाहत आहे. तालिबानी बंडखोरांनी एकप्रकारे शक्तीशाली देशांना आव्हान दिले आहे. गटातटात विभागलेले देश याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. आपला शेजारी पाकिस्तान या तालिबान्यांना सहकार्य करित आहे. अनेक वर्षे धुमसत असलेल्या अफगाणिस्तानात शांती कधी बहाल होईल? हा खरा प्रश्न आहे. 

अमेरिकेच्या लष्करानं २० वर्षांपूर्वी तालिबानला पायउतार केलं होतं. आता अमेरिकेनं माघार घेतल्यानंतर तालिबाननं पुन्हा अफगाणिस्तानात इस्लामी सरकार लागू करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेत असताना या परिसरावर तालिबानी बंडखोरांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली होती. मजल दरमजल करत अखेर निमरोज प्रांताच्या राजधानीपर्यंत तालिबान येऊन पोहोचलं. गेल्या काही महिन्यांत देशातील मोठ्या भागावर त्यांनी ताबा मिळवला आहे. तालिबान्यांनी ग्रामीण भागातून सुरुवात करत एकेका मोठ्या शहराच्या दिशेने आक्रमण सुरू केलं आहे. तालिबानने गेल्या शुक्रवारपासून अफगानिस्तानच्या नऊ प्रांतिय राजधान्यांवर कब्जा केला आहे. यामध्ये फैजाबाद, फराह, पुल-ए-खुमरी, सर-ए-पुल, शेबरगान, ऐबक, कुंदुज, तालुकान आणि जरंज ही शहरे आहेत. जवळपास ६५ टक्के अफगानिस्तानवर त्यांनी कब्जा केला आहे. तालिबानच्या या आक्रमणामुळे अफगाणिस्तानातील विविध प्रांत आणि त्यांची सरकारे दबावाखाली आल्याचं दिसून येत आहे. मुख्य सीमा शुल्क चौक्या तालिबानच्या ताब्यात गेल्याने सरकारच्या महसुलात मोठी घट झाली आहे.

गेल्या काही दिवसांत तालिबाननं अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, अधिकारी, न्यायाधीश आणि नेत्यांची हत्या केली आहे. हे सगळे अफगाणिस्तानातील उदारमतवादी मुस्लीम सरकार वाचवण्यासाठी संघर्ष करत होते. तालिबानला त्यांच्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज बंद करायचा आहे, असं म्हटलं जात आहे. गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानात वाढत्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर  यूएनएससी (सुरक्षा परिषद) ची बैठक झाली होती. अफगाणिस्तानचा भूतकाळ त्याचं भविष्य बनू शकत नाही, असं भारतानं या बैठकीत म्हटलं होतं.

या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कंधारमधील भारतीय दूतावास बंद करुन आपल्या सर्व अधिकाऱ्यांना परत बोलावले होते. कंधारनंतर आता मजार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावास बंद करण्याचा भारताने निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानात राहणाऱ्या भारतीयांनी स्वतःच्या सुरक्षेसंबंधी तत्काळ पावलं उचलावी असं काबूलमधील भारतीय दुतावासानं म्हटलं आहे. वाढता हिंसाचार पाहता भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानची विमान सेवा बंद होण्यापूर्वी, तत्काळ परतण्याची तयारी करण्याचं आवाहन एका सार्वजनिक नोटिसद्वारे देण्यात आलं आहे. आपल्या सर्व राजदूत, अधिकारी आणि इतर भारतीयांना परत आणण्यासठी एका विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. हे विमान बुधवारी सर्व भारतीयांना घेऊन परतणार होते.

पाकिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांना खुलेआम लष्करी प्रशिक्षण दिले जात आहे. हे चीन, रशिया आणि अमेरिकेला माहित आहे. पण असे असूनही या तिन्ही महासत्तांनी मौन पाळले आहे. कारण त्यांना दक्षिण आशियात अशांततेचे वातावरण निर्माण व्हावे असे वाटते. पाकिस्तान दहशतवादाची रोपवाटिका तयार करत राहिला आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्यावर काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावत राहिला. दुसरीकडे तालिबानने अफगाणिस्तानात आपले काम सुरूच ठेवेले. जर दक्षिण आशियात शांतता असेल तर महासत्तांना कोण विचारणार? अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीनचा लष्करी व्यवसाय कसा चालेल. त्यांच्या पाणबुड्या, युद्धनौका, रडार, युद्ध विमाने आणि अण्वस्त्रे कोण विकत घेणार? जगातील शक्तींना त्यांची भव्यता प्रस्थापित करण्यासाठी शांततेचे समर्थन करायचे नसते.

भारतानं अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्याचं कायम समर्थन केलं आहे. अफगाणिस्तानातल्या पायाभूत सेवा क्षेत्राच्या उभारणीत आणि संस्थांच्या पुर्नउभारणीमध्ये भारताने आतापर्यंत तीन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तीची गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे. अफगाणिस्तानाची संसद भारताने बांधली आहे आणि अफगाणिस्तानसोबत एक मोठा बंधाराही बांधला आहे. शिक्षण आणि तांत्रिक सहाय्यही भारताने अफगाणिस्तानाला पुरवलं आहे. सोबतच भारताने अफगाणिस्तानातल्या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्येही गुंतवणूक करण्यासही प्रोत्साहन दिलंय. त्यामुळे साहजिकच भारताला अफगाणिस्तानातल्या त्याच्या गुंतवणुकीची काळजी आहे. तालिबान ज्याप्रकारे अफगाणिस्तानात हिंसाचार करतंय ते पाहता, त्यांनी सत्ता काबीज केल्यास ते किती वैध असेल असा भारताने सवाल केलाय. 

तालिबान हा नेहमीच भारताचा शत्रू राहिला आहे. ते कट्टर इस्लामिक संस्कृतीचे समर्थक आहेत. तर सुसंस्कृत इस्लामिक देश याला परवानगी देत ​​नाहीत, ज्यामुळे ते अलिप्त होते. तालिबान्यांनी शांततेचे प्रतीक असलेल्या भगवान बुद्धाचे अगणित पुतळे पाडले आहेत. जर तालिबान अफगाणिस्तानात मजबूत झाला तर चीन पाकिस्तानच्या मदतीने भारताच्या अस्थिरतेचे जाळे विणेल. कारण दक्षिण आशियात चीन फक्त भारताला घाबरतो. पाकिस्तान विरुद्ध आपल्याकडे असणारी युद्धात्मक आघाडी तालिबान आल्यास जाईल, ही भारताची सगळ्यात मोठी चिंता आहे. भारत अफगाणिस्तानात पाय रोवून असल्याचा एक मानसिक आणि धोरणात्मक दबाव पाकिस्तानवर असतो आणि तिथली भारताची पकड कमकुवत झाली तर त्याचा अर्थ पाकिस्तानचा दबदबा वाढला, असा होईल. भारताचे नेपाळबरोबरचे संबंधही अलीकडच्या काळात चांगले राहिलेले नाहीत. तिथे चिनी हस्तक्षेप वाढला आहे. यामुळे भारतासाठी हा सर्वात मोठा धोका आहे.

 अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान मधुन अमेरिकेचे सर्व सैनिक परत येतील, असं म्हटलं आहे. जुलै महिन्यातच अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी अमेरिका अफगाणिस्तान मिशनमध्ये अपयशी ठरल्याचं 'द हिन्दू' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. भारताने नेहमी अहिंसेचा पुरस्कार केला आहे. वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचि माझे घर, ही भारतीय संस्कृती आहे. आता  जगाने एका व्यासपीठावर येऊन अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे.

- सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...