न विन शैक्षणिक वर्षाची सुरुवात नुकतीच झाली होती. मी शाळेत नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करुन घेत होतो. प्रत्येक जण आपली ओळख करुन देत होता. एका विद्यार्थीनीने आपले नाव ‘ नकोशी’ असल्याचे सांगितले. हे नाव ऐकताच माझ्या मनावर एकप्रकारे आघातचं झाला. व दिवसभर माझ्या मनात विचार येवू लागला , व “का बरे तिचे नाव नकोशी ठेवले असेल ? इतर दूसरे चांगले नाव तिच्या पालकांना का नाही सुचले ?” दुस-या दिवशी मी तिला बोलावून तिची कौटुंबीक माहिती जाणून घेतली. तिला दोन मोठ्या बहिणी होत्या , तिचा क्रमांक तिसरा होता. तिसरीही मुलगीच झाल्याने तिच्या घरातील काहींनी तिचे नामकरण संस्कार करण्याअगोदरच तिला ‘नकोशी’ म्हणुन हाक मारायला सुरुवात केली होती. तिच्या आई-वडिलांची परवानगी न घेता घरातील एका वडिलधा-याने तिचे नाव शाळेत प्रवेश देताना नकोशी असेच टाकले होते. मी विचार केला ‘ आता हि लहान आहे म्ह्णून तिला या नावा मागचा हेतू कळत नाही मात्र हि मोठी झाल्यावर हिच्या मनावर किती आघात होईल ? आपण ...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.