नेतागिरीसाठी वापर ‘सोशल मीडियाचा’
आता तो काळ राहिला नाही की,निवडणूका आल्या की प्रत्येक
मतदाराच्या दारासमोर जावून आपले कार्य समजावून सांगावं,स्वत:ची बाजू पटवून सांगावी व मतदाराला स्वत:ला
मत देण्यासाठी तयार करावं.आता काळ खूप बदलला आहे.आजकाल लोकांचा दिवसाचा बहुतेक वेळ
हा फेसबुक,टविटर सारख्या सोशल वेबसाईट वर जातो,खास करुन युवक वर्गाचा.म्हणून या सोशल मीडियाचा
पुरेपूर वापर करुन राजकिय क्षेत्रात करिअर बनवू पाहणा-या नेत्यांना सहज नेतागिरी
करता येवू शकते.
आजकाल जवळपास प्रत्येकाकडे एंड्रॉईड मोबाईल व जोडीला इंटरनेट ची सोय उपलब्ध
आहे.त्यामुळे लोक २४ तास सोशल वेबसाईटच्या संपर्कात राहणार हे सुनिश्चित आहे.आता
खेडे गाव असो वा शहर प्रत्येक ठिकाणचे लोक फेसबुक,टविटर,ब्लॉग सारख्या सोशल वेबसाईटला जुडलेले असतात.एका
ठिकाणी काडी पेटवलेली असते आणि आग मात्र सगळ्या ठिकाणी लागते. याचा राजकिय अर्थ
विचारात घेतला तर आपल्याला असे दिसून येते की,एखादा नेता त्याच्या
फेसबुक,टविटर, किंवा ब्लॉगवर
ठराविक विधान करतो आणि संपूर्ण देशात त्यामुळे वादळ माजत. एवढी ताकद या सोशल
मीडियात आहे.अशात तुम्हाला जर लोकांपर्यंत पोहचायचं असेल,यशस्वी नेतागिरी करायची असेल तर सोशल मीडिया
पेक्षा चांगला पर्याय आणखीनं कोणता असू शकतो?
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच उदाहरण घ्या,ते सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात.त्यांनी या बाबतीत अमेरीकेचे माजी
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना तोडीसतोड टक्कर दिली आहे. नरेंद्र मोदी यांचे
सोशल मीडिया प्रेम कोणाला माहित नाही.राजकारणात नव्या
बदलत्या जमाण्याच्या पावलासोबत पाऊल मिळवण्याची आवश्यकता सर्वप्रथम जर कुणी ओळखली
असेल तर त्यांनीच.२०१४ मध्ये झालेल्या सार्वत्रीक लोकसभा निवडणुकीत भा.ज.पा. चा
प्रचार करण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया चा पूरेपूर वापर केला होता. नरेंद्र मोदी
नावाचे वादळ देशात निर्माण झाले. भा.ज.पा. ला जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सोशल
मीडियाने केले.त्यावेळी काँग्रेस व इतर मित्र पक्ष या बाबतीत खूप मागे राहिले.अनेक
काँग्रेस नेत्यांवर झालेले भ्रष्ट्राचाराचे आरोप लोकांपर्यंत अगोदरच पोहचले होते,मात्र
त्यांनी केलेले कार्य हव्या त्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचले नाही. इथेच काँग्रेस कमी पडली त्यामुळे काँग्रेस व इतर मित्र
पक्षांना दारुण पराभव स्विकारावा लागला. भा.ज.पा. व इतर मित्र पक्षांच्या हाती
सत्ता येवून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले.
सत्तेत आल्यानंतर सोशल मीडियाची ताकद ओळखूनच त्यांनी ‘डिजीटल इंडिया’ ही योजना आणली आहे. भा.ज.पा. व संघाने ७०
पेक्षा जास्त वय असणा-या नेत्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात न घेण्यावर
वेळोवेळी भर दिला आहे.याचे कटाक्षाने केलेले पालन मागील लोकसभा निवडणुकात तिकीट
वाटपाच्या वेळी व त्या नंतर केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देताना दिसून आले.तरिही
काही वृध्द पक्ष नेत्यांना खुर्चीचा मोह आवरता आला नाही,ते बळजबरीने का होईना चिकटलेच.या परिस्थितीत
नरेंद्र मोदींचा आपल्या जुन्या पिढीतील नेत्यांना नेहमी आग्रह असतो की, त्यांनी नव्या पिढी पर्यंत पोहचण्यासाठी
जास्तीत-जास्त सोशल मीडियाचा वापर करावा तोही प्रगत तंत्रज्ञानचा आधार घेवून
नाहीतर जे प्रश्नचिन्ह मागील सरकारवर उठवले गेले ते त्यांच्यावरही उठतील.खर म्हटलं
तर जे जुन्या पिढीतील राजकिय नेते आहेत ते फेसबुक,टविटर,वाटसअॅप सोबत एवढे जुळवून घेवू शकत नाहीत जेवढेकी सध्याच्या पिढीतील
नेते.मग ब्लॉग लिहिणे तर दूरच.खर तर अशा नेत्यांकडे त्यांच्या सोशल मीडिया
खात्यावर लिहिण्यासाठी अनेक व्यक्ती असू शकतात मात्र त्यांना लिहिण्यासाठी या
नेत्यांचे योग्य मार्गदर्शन असावे लागते.
खर पाहिल तर नरेंद्र
मोदींनी आपल्या खासदार,मंत्र्यांना आणि पक्ष नेत्यांना सोशल
मीडियावर सतत सक्रिय राहण्याचा आग्रह करणे यात काही चूकीचे नसून अनेक बाजूंनी
फायदेशिर आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सोशल मीडिया प्रेम सगळ्यांना माहित आहे. फेसबुक,टविटर चा ते खूप वापर करतात.त्यांची सोशल मीडियावरची सक्रियता
पाहण्यालायक असते.मग ते एखादया देशाच्या राष्ट्राध्यक्षाचा वाढदिवस असो,देश-विदेशातील यात्रा,एखादी घडलेली दुर्देवी घटना
किंवा नैसर्गिक आपत्ती वा नविन आणलेली सरकारी योजना अगदी छोटया-मोठया गोष्टीची
माहिती त्यांच्या कार्यालयीन संकेत स्थळावर किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर
मिळून जाते.त्यांच्या टविटर अकांउटचे पावने दोन करोड फॉलोअर्स आहेत त्यामुळे
टविटरवर ते जगातील दुस-या क्रमांकाचे लोकप्रिय व्यक्ती आहेत.फेसबुकच्या बाबतीत
बघितल तर रोज २.८ करोड लोक त्यांच्या फेसबुक पेजला लाईक करतात.या वरुन त्यांची
फक्त सोशल मीडियावरची सक्रियताच दिसून येत नाही तर लोकप्रियताही दिसून येते. नरेंद्र
मोदी हे आधुनिक विचारांचे नेते आहेत.त्यांना हे चांगल माहित आहे की,जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचायच असेल,त्यांच्या
पर्यंत आपले विचार पोहचवायचे असतील तर सोशल मीडियाच्या वापराने हे काम सहज होवू
शकत.
येत्या २०१७ पर्यंत
भारतात फेसबुकचा वापर करणा-यांची संख्या जगात सर्वात जास्त असेल अशी आकडेवारी
सांगते.अशात नरेंद्र मोदींचा पूरेपूर प्रयत्न असेल की त्यांच्या सरकारने केलेले
काम पक्षातील नेत्यांमार्फत लोकांपर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहचाव. नरेंद्र मोदी
आपल्या पक्ष नेत्यांना फक्त सल्लाच देत नाहीत तर त्याची कुठपर्यंत अंमलबजावणी केली
आहे याचे पृथकरण ही करतात.याचसाठी भा.ज.पा. च्या डिजीटल सेल ने
एम.आई.एस.(मॅनेजमेंट इनफर्मेशन सिस्टीम) बनवली आहे.या सेल द्वारे पक्षातील नेते
सोशल मीडियाचा वापर किती करतात,त्यांची त्यावरची सक्रियता
किती आहे,सध्याची अवस्था काय आहे हे पाहिल जात.यासाठी पक्ष
खासदार व आमदारांच्या फेसबुक,टविटर किंवा ब्लॉग वरिल
फॉलोअर्स ची संख्या,टविट केलेल्या विधानांची संख्या आणि
प्रति टविट केलेल्या वाचकांची संख्या याचा हिशोब ठेवला जात आहे.स्पष्ट आहे की, या द्वारे सरकारने केलेले काम लोकांपर्यंत पोहचतय की नाही हे बघितल
जात.एवढ करुनही मिळालेल्या आकडेवारी नूसार पंतप्रधानांच्या हाती निराशाच
आली.पक्षाचे अधिकांक्ष खासदार सोशल मीडियाचा वापरच करित नाहीत असे दिसुन आले
आहे.तर काही पक्ष नेते यात अधिक सक्रिय आहे. यात केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, नितीन गडकरी,माजी जनरल वि.के.सिंग,मनेका गांधी,संतोष गंगवार,राजवर्धन
राठोड यांची नावे पुढे आहेत. सुषमा स्वराज यांच्या टविटर खात्याचे ५० लाख फॉलोअर्स
आहेत तर नितीन गडकरी यांचे ८.५ लाख लोक फॉलोअर्स आहेत.लवकरच उत्तर प्रदेश आणि
गुजरात मधे विधान सभा निवडणुका होणार आहेत.दुर्दैवाची गोष्ट अशी की, पक्षाचे उत्तर प्रदेश आणि गुजरात मधील खासदार सोशल मीडियाचा सर्वात कमी
वापर करतात. उत्तर प्रदेश मधील पक्षाच्या ७१ खासदारांपैकी ४३ खासदारांचे फेसबुक,टविटर वर खातेच नाही.यामुळे पक्षातील खासदारांनी एका मोठया संख्येला
मुकण्याचा धोका पत्करलाय असे म्हणायला वाव आहे.या मुळे पक्षाचे इथे मोठ नुकसान
होवू शकत.
ही गोष्ट नाकारून
चालणार नाहे की, नरेंद्र मोदी,अरविंद
केजरीवाल या नेत्यांना पुढे आणण्यात सोशल मीडियाची महत्वपुर्ण भुमिका राहिली आहे.नेतागिरी
आणि सोशल मीडिया यांचे संबध यापुढे आणखीनच घट्ट होणार आहेत. भविष्यात निवडणुक
प्रचार सभांचे महत्व कमी होवून डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाद्वारे
मतदारांपर्यंत पोहचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल.म्हणून फक्त भा.ज.प.च
नाही तर इतर राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर करण्यावर अधिक भर दिला पाहिजे.नुकत्याच
राज्यात होणा-या जिल्हा परिषद निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर काही उमेदवारांनी
मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठया प्रमाणावर केलेला दिसून येत आहे.याचा फायदा
त्यांना निश्चितच होईल. मग तुमच्या पैकी कुणाला राजकारणात करिअर बनवण्याची ईच्छा
असेल तर आपण अगोदर डिजिटल साक्षर होवून सोशल मीडियाचा वापर करायला शिकायला हवं
नाही का?
- सुरेश मंत्री
Good
उत्तर द्याहटवा