मुख्य सामग्रीवर वगळा

देश विकासासाठी गरज ‘युवाशक्तीची’


देश हा जेवढा व्यापक शब्द आहेत्यापेक्षाही एक व्यापक प्रश्न असा आहे कीदेश कोण बनवितो ?नेतासरकारी कर्मचारीशिक्षकमजुरवरिष्ठ नागरिक की आणखीन कोण खरं तर हे सगळे मिळून देश बनवत असतीलमग तरी इथे एक महत्वाचा प्रश्न असा पडतो कीदेशाच्या विकासात सर्वात मोठी भागीदारी कुणाची आहे नक्कीच या पैकी कुणाची नाही. देशाच्या विकासात सिंहाचा वाटा त्या वर्गाचा आहे ज्या वर्गाचा वर उल्लेख झालेला नाहीतो म्हणजे युवक वर्ग. कोणत्याही देशाची खरी संपत्ती व शक्तीस्थान हे त्या देशाचे युवक असतात. देशातील युवकांच्या दर्जावरुन त्या देशाचे भवितव्य कसे असेल हे ठरत असते. म्हणून आपल्याला देशाचे भवितव्य उज्वल हवे असेल तर प्रथम आपल्या युवकांना अधिक सक्षमविधायक व सामर्थ्यवान बनवणे गरजेचे आहे.
युवक हा असा वर्ग आहे जो शारीरिक आणि मानसिक रुपाने सर्वात बलवान आहेजो देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी सर्वात जास्त प्रयत्न करु शकतो. सुदैवाने आपल्या भारतीय लोकसंख्येच्या ३४ टक्के इतकी लोकसंख्या युवकांची म्हणजेच २४ ते ४० वर्षे वयोगटाची आहे. हा युवक वर्ग नेहमीच सामाजिकआर्थिकशारीरिकमानसिक सगळ्या रुपाने सदैव सर्वात जास्त सक्रीय असतो आणि रहायलाही हवा. मात्र कोणत्याही देशाच्या बांधणीत महत्वपूर्ण भूमिका बजावणा-या या युवक वर्गाची आजची स्थिती बघितली तर ती निश्चितच चिंताजनक आहे. भारतीय युवकांची स्थिती चिंताजनक आहे असे म्हटल्यावर याचे देशावर काय परिणाम होतील हे वेगळे सांगायला नको. आजचा युवक व्यसनांच्या आहारी गेलेला,भ्रष्ट राजकारणी व चित्रपटातील अभिनेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा,गुन्हेगारी प्रवृती व दहशतवादाकडे वळलेला दिसतो. या स्थितीला फक्त युवकच जबाबदर आहे असे म्हणून आपल्याला आपली जबाबदारी झटकून मोकळे होता येणार नाही. का कधी युवकांच्या या अवस्थेकडे लक्षपूर्वक बघितलं कोणी कधी त्यांच्या भाव-भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय स्पष्टपणे म्हटलं तर नाही. मग आजची युवक पिढी इतकी बेजबाबदारमनमानी करणारी का आहे जेंव्हा आपण भारतीय युवकांच्या वर्तमानकालीन स्थितीबद्दल भळभळून बोलतोत्यांच्या भविष्याच्या बाबतीत चिंता व्यक्त करतो तेंव्हा आपण भूतकाळात डोकावून बघितले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंगराजगुरुचंद्रशेखर आजादसुखदेव हे युवक त्या काळच्या युवकांचे आदर्श आणि प्रेरणास्थान होते. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. प्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले. देशासाठी हसत-हसत फासावर चढणा-या या देशवेडया तरुणांना पाहून समकालिन युवकांच्या रक्तात एक वेगळा उत्साह संचारत होता. ते युवक या तरुणांना आपला आदर्श मानत मात्र त्यांनी कधी याची जाहीरातबाजी केली नाहीभूतकाळ जेवढा खराब तसा वर्तमान त्याची सावली आणि भविष्य तर आणखीनच खराब. ऐकायला-वाचायला या गोष्टी नक्कीच निराशाजनक वाटतील परंतु थंड डोक्याने आपण जर विचार केलास्वत:लाच जर प्रश्न विचारला कीआजच्या युवक पिढीला मागच्या पिढी ने काय ‘वारसा’ दिलायकसले संस्कार आणि कसला समाज दिलाय तर आजच्या युवकांच्या या अवस्थेचे उत्तर आपल्याला निश्चित मिळेल. मी भूतकाळाबद्दल बोलतोय म्हणजे निश्चितच स्वातंत्र्यपूर्व काळाबद्दल बोलत नाही. मी बोलतोय ते स्वातंत्र्योत्तर काळाबद्दल म्हणजे गेल्या ७६ वर्षांबद्दल. या काळातील पिढीने देश बांधणीचे काम केले आहे. काय बघितल आपण या ७६ वर्षात वाढत चाललेली गुन्हेगारीराजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा असेही म्हणता येईल की गुन्हेगारांचे राजकीकरणवाढत चाललेला भ्रष्टाचारवाढता जातीयवाद आणि बेरोजगारी. जेवढ काही वाईट होवू शकत ते मागील पिढीने केल. अर्थात सगळ्याच गोष्टी वाईट केल्या असं नाही. प्रत्येक समाजात काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी असतातच मात्र भूतकाळात वाईट गोष्टींनाच जास्त खत-पाणी दिल गेल हे सत्य आहे. जर असा समाज युवकांच्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून असेल तर आजच्या युवक पिढीला दोष देवून काय उपयोग ? आमचे आदर्श म्हणजे आजचे वृध्द राजकीय नेते ज्यांचे मोठे-मोठे होर्डींग्ज आदर्श म्हणून आजचे युवक लावताना दिसतात. हे सगळेच नेते वाईट आहेत असेही नाही. काही अपवादात्मक राजकीय नेते सोडले तर इतर सर्वांवर कसला न कसला भ्रष्टाचाराचा आरोप आहे.
भारतीय युवक एक नवक्रांती करायला तयार आहेमात्र त्याला कुणीतरी रोखू पाहतयं ते म्हणजे राजकीय क्षेत्र आणि त्यातील भ्रष्ट राजकारणी. राजकारणात देशप्रेमाची जागा घराणेशाहीजातीयवादसत्तेच्या हव्यासाने घेतली आहे. राजकीय क्षेत्रात फक्त वयस्कर लोकांचाच बोलबाला आहे आणि फक्त बोटावर मोजण्याइतकेच युवक आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्राचे वातावरण दिवंसेदिवस गढुळ होत चालले आहे. ख-या प्रामाणिक राजकारण्यांची जागा सत्ता आणि धनाच्या लालची लोकांनी घेतली आहे. आता भारताच्या राजकारणात सुभाषचंद्र बोसभगतसिंगलोकमान्य टिळक या सारखे युवक नेते नाहीत जे युवक वर्गात एक नवा उत्साह भरतील. जे नेते आज स्व:ताचे रक्षण करु शकत नाहीत ते आजच्या युवक पिढीला देशभक्ती किंवा क्रांतीचे धडे काय देणार ?
आपण कल्पना करु कीकाही काळासाठी ( ५ वर्षाचा कालावधी तसा देश विकासासाठी खूप कमी असतो हे आजच्या राजकारण्यांनी सिध्द केलयं ) राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले नसते तर या देशाचे काय झाले असतेआजही आपण कदाचित बैलगाडीने प्रवास केला असता व कंदीलाच्या प्रकाशात राहिलो असतो. देशाच्या या एकमेव पंतप्रधानाने देशाच्या विचारात एक नवा उत्साह निर्माण करण्याचे काम केले. त्याच्या फलस्वरुप देशाने प्रगतीचे शिखर गाठले. ज्या वेळी या तरुण नेतृत्वाने भारतात सर्वप्रथम संगणक आणला त्यावेळी तत्कालिन वृध्द नेत्यांनी याचे हसे केले होतेसर्वत्र बेरोजगारी वाढेल अशी बोंब उठवली होती. दिल्लीहून निघालेला एक रुपया खालपर्यंत पोहचेपर्यंत पंधरा पैसे राहून जातो हे वाक्य याच नेत्याने प्रामाणिकपणे बोलून युवक वर्गाला भ्रष्टाचाराच्या धोक्याची जाणीव करून दिली होती. मात्र या युवक नेतृत्वाच्या अकाली मृत्यूने देश म्हणावा तेवढा प्रगती करु शकला नाही.
आजचा युवक निराशेच्या गर्तेत आहेतो बेरोजगारीची मार खातो आहे. भारतीय नेतृत्व त्याला योग्य संधी देण्यात अपयशी ठरल आहे. इथे योग्य संधी मिळत नाही म्हणून बरचशे उच्चशिक्षित युवक विदेशात जावून काम करित आहेत. भारतातील ७५ टक्के युवक साक्षर असताना त्यांच्या हाताला काम नाही. त्यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जातो नंतर मात्र त्यांना धान्यातून खडे वेचून बाजुला करावे तसे केले जाते. युवकांनी राजकारण्यांच्या पाठीमागे लागूनत्यांच्या भूलथापांना बळी पडून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वत:च्या मेहनीतीने स्वत:चे करिअर बनवण्याचाउद्योजक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर उद्योजक झालात तर हेच राजकारणी आपल्याला शोधत फिरतील. ‘आजचे युवक भरकटलेले आहेत’ असे म्हणण्याचा हक्क आजच्या पिढीला बिलकुल नाही. दुस‌-यांकडे बोट दाखविणा-यांनी स्वत:कडे उठणा-या चार बोटांकडेही बघितले पाहिजे. युवकांना नावे ठेवणा-या पिढीने त्यांच्या समोर कोणता आदर्श निर्माण केलाय अनिंयत्रीत लोकसंख्या वाढीने अनेक समस्या निर्माण करणा-या पिढीने बेरोजगारभरकटलेल्या युवकांना बघून फक्त चिंता व्यक्त करुन चालणार नाही. भ्रष्टाचाराला यंत्रणा बनवणारी पिढी युवकांना ईमानदार राहण्याचा सल्ला देत आहे. देश असा बनत नाही.
आता वेळ आली आहे क्रांतीकारी पाऊल उचलण्याची. हा रोग एवढा मोठा झालाय कि आता याच्यावर ‘बायपास सर्जरी’ करावीच लागेल. परदेशात जाणा-या सॉफ्टवेअरआय.आय.टीइंजिनिअरआय.आय.एम तरुणांना रोखण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. ते भारतात तेंव्हाच परत येतील जेंव्हा त्यांना इथे योग्य संधी उपलब्ध होतील. आपल्याला देशातीलखेडया-पाडयातील युवकांवर भर द्यावा लागेल. या युवकांमुळेच देश घडेल. त्यांना बेरोजगारी भत्ताआश्वासनेराजकीय प्रचार सभाकायद्यापेक्षा वरचढ होण्याची शिकवण देवून चालणार नाही. जर या युवक शक्तीचा योग्य वापर केला नाही तर तिचा चूकीचा वापर होवू शकतो. हिच युवक शक्ती देशासाठी विध्वंसक व घातक ठरु शकते.
भारतीय युवकांचा उत्साहत्यांची सर्जनशिलताअष्टपैलुत्व आश्चर्यकरक आहे. त्यांना अधिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. त्यांच्या समोर आपण काहीतरी आदर्श निर्माण केला पाहिजे. आपल्याला पुर्ण संधी मिळूनही आपण देशाला चांगले बनवू शकलो नाहीत. आता देशाला चालवण्याची संधी युवकांना द्या. देशाची बांधणी युवकच करतात आणि करतीलहीगरज आहे ती त्यांना पोषक वातावरण व योग्य प्रोत्साहनाची.
        
  -सुरेश मंत्री.   

टिप्पण्या

  1. मंत्री सरांनी लिहलेले सर्वच लेख खूप छान आहेत.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...