मुख्य सामग्रीवर वगळा

बालमजूरी थांबणार कधी ?

बालपण आयुष्यातील सर्वात सुंदर काळ. बालपण ही माणसाला मिळालेली ईश्वराची सर्वात अमूल्य देणगी आहे असे म्हणतात. कोणत्याही गोष्टीची न काही जबाबदारी न काही चिंता. फक्त खेळण-बागडण, दंगा मस्ती करणं आणि अभ्यास. मात्र अशा प्रकारचे बालपण प्रत्येकाच्याच वाटयाला येत असं नाही. एखाद्या हॉटेल मध्येघरामध्येदुकानात किंवा विटभट्टीवर एखादा बालक ज्याच्या हातात पुस्तके असण्याऐवजी साफसफाई करण्यासाठी झाडू, फडके किंवा अवजारे असलेली दिसतात ज्याला आपण बालमजूर असे म्हणतो.

जर कोणी १४ वर्षे वयाखालील बालक उपजिविकेसाठी काम करित असेल तर त्याला बालमजूर असे म्हणतात. आज जगात २१५ दशलक्ष बालमजूर आहेत. भारताच्या बाबतीत तर बालमजूरीचा प्रश्न खूप भयानक आहे. जगात सर्वात जास्त बालमजूर भारतात आहेत. १९९७ च्या जनगणनेनूसार भारतात ११.३ दशलक्ष बालमजूर होते तर २००१ च्या जनगणनेत यात आणखीन वाढ होवून बालमजुरांची संख्या १२.७ दशलक्ष झाली. २०१५ मध्ये यात आणखीन वाढ होवून २५ दशलक्ष झाली म्हणजेच बालमजूरांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. हा एक चिंतेचा विषय आहे.

मोठया शहरातच काय एखाद्या छोट्या शहरात ही प्रत्येक गल्ली-बोळात तुम्हाला चिंटूपिंटूबबली दिसतील जे परिस्थिती मुळे हतबल होवून बालमजूरीच्या जाळ्यात अडकले आहेत. यांना बालमजूर म्हणून फक्त शारीरिक कष्टाचीच कामे करावी लागत नाहीत तर कधी-कधी या पैकी अनेक बालकांचा भावनिकशारीरिक व लैंगिक छळ केला जातो. त्यांना मालकाकडून सिगारेटचे चटके देणे, मारहाण करणे असे प्रकार केले जातात. हे सर्व त्यांना मुकाट्याने सहन करावे लागते. अशी अनेक प्रकरणे प्रसार माध्यमांतून समोर आली आहेत. इथे बालपण कोमेजले जात आहे.

बालमजूरीचे सर्वात मोठे कारण आहे दारिद्रय व त्यामुळे निर्माण झालेली निरक्षरता. आज देशात करोडो लोक अशी आहेत ज्यांना दोन वेळेची भाकरही दिवसभर कष्ट केल्यानंतरही सहजरित्या मिळत नाही. यातील बहुतांश लोक मोल-मजूरीची कामे करतात. त्यांच्या निरक्षरतेमुळे त्यांचे कुटुंब ही मोठे असते. अशा परिस्थितीत जिथे स्वत:चे पोट भरणे मुश्किल आहे तिथे ते स्वत:च्या मुलांचे संगोपन निट करु शकत नाहीतत्यांना योग्य शिक्षण देवू शकत नाहीत. परिस्थिती ज्या वेळेस खूप कठीण होते तेंव्हा त्यांना आपल्या लहान मुलांना काही ना काही रोजगारात लावावे लागते.  अशाप्रकारे बाल्यावस्थेतच या मुलांना शारीरिक कष्टाच्या कामाला जुंपल्याने त्यांचा जो नैसर्गिक विकास व्हायला हवा तो होत नाही उलट त्यांच्या मध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो.

बालमजूरी करणा-यांमध्ये वय वर्षे ५ ते १४ वर्षा पर्यंतची बालके आहेत. यात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. उत्तर प्रदेशप.बंगालमध्य प्रदेशओरिसामेघालय या राज्यात बालमजुरीचे प्रमाण जास्त असलेले दिसून येते. अनेक सामाजिक संस्था समाजात पसरलेल्या या वाईट गोष्टीला नष्ट करण्याचा प्रयत्न करित आहेत. देशातील बालमजूरी नष्ट करण्यासाठी काम करणा-या सत्यार्थ प्रकाश यांना नोबेल पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यासाठी काम करणा-या सामाजिक संस्था अनूसार देशातील बालमजूरांपैकी ५३.२२ टक्के बालके लैंगिक अत्याचाराची बळी पडतात. ५०.२२ टक्के बालके अशी आहेत की आठवड्यातील सात ही दिवस काम करतात. तर ५० टक्के बालमजुर शारीरिक अत्याचाराला बळी पडतात.

एकीकडे बालकांचा मोठा समुह पंचतारांकीत हॉटेल मधील दर्जेदार पंचपक्वानाचा आनंद घेतो तर दूसरीकडे अनाथ व गरीब बालके अशी आहेत की त्यांना उपासमारीला तोंड दयावे लागतेदोन वेळेसचे पोटभर अन्न मिळत नसल्यामूळे दूस-यांनी टाकून दिलेल्या उष्ट्या अन्नावर त्यांना आपली उपजिविका भागवावी लागते. हा समाजातला विरोधा भास आहे. बालमजूरी करणारी मुले आर्थिक विवंचने अभावी शिक्षण घेवू शकत नाहीत. बालमजूरी करणा-या बालकांचे भविष्य अंधकारमय आहे, त्यांचे सर्वात जास्त शोषण होत आहे.

बालमजूरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने १९८६ मध्ये बालमजूरी प्रतीबंधक कायदा केला. या अंतर्गत एखाद्या बालकाकडून बालमजूरी करुन घेणे हे मानव अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ३० जुलै २०१६ ला सरकारने या कायद्यात आणखीन काही सुधारणा केल्या आहेत. यात बालमजूरी करून घेणा-यास कमीत कमी ६ महिन्यांची शिक्षा व २०,००० ते ५०,००० दंड ठोठावण्याची तरतूद आहे. सरकारने शिक्षणाच्या बाल हक्क कायद्याअंतर्गत इ. ८ वी पर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे करुनही अनेक मुले शाळाबाह्य आढळुन आली आहेत. ही शाळाबाह्य मुले दूसरी तिसरी कोणी नसून  बालमजूर आहेत. हे स्वत: अशिक्षीत राहिल्याने त्यांच्या पूढील पिढयान-पिढया बालमजूरच तयार होतील. देशातील वाढत्या बालमजूरांच्या संख्येवर वेळेवर जर नियंत्रण मिळवले नाही तर याचे खूप दूरगामी वाईट परिणाम देशावर होतील.

सरकारने बालमजूरी रोखण्यासाठी कायदा केला आहे. त्यामुळे जर कोणी बालकाने आपले पोट भरण्यासाठी रोजगारी मागण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायद्याचा हवाला देवून कोणी काम देत नाही. मग या मुलांनी करायचे तरी काय ? कुणाकडे जावे जेणे करुन त्यांच्या या समस्येचे समाधान मिळू शकेल. सरकारने बालमजूरी रोखण्यासाठी कायदा तर केला पण यांच्या समस्येकडे कधी गंभीरतेने बघितलयं ? बालमजूरीला मुळापासून नष्ट करण्यासाठी अगोदर गरीबीला नष्ट करावे लागेल. सरकारने अशा काही योजना राबवायला पाहिजेत जेणेकरून लोकांचा आर्थिक स्तर उंचावेल व त्यांना आपल्या मुलांना बालमजूरी करण्यासाठी विवश करावे लागणार नाही. या बालकांना दोन वेळेसचे अन्न मिळण्याची सोय झाली पाहिजे. या कामी प्रशासकीय, सामाजिक व व्यक्तीगत सर्व स्तरांवर प्रयत्न झाले पाहिजेत. व्यक्तीगत स्तरावर बालमजूरीचा विरोध करणे हा आपल्या नैतिकतेचा भाग आहे. आपण याचा विरोध करण्यासाठी सतत पुढे आले पाहिजे.

आशा आहे कीदेशातील या संबंधीत कायदे आणखीन कडक होतील, राष्ट्रीय स्तरावर अशी व्यवस्था जन्म घेईल ज्यामुळे पुन्हा कोणत्याही बालकाला बालमजूरी करावी लागणार नाही. त्यांचे बालपण हरवणार नाही. ते चांगल्या प्रकारे शिक्षण घेवून देशाला गौरव प्राप्त करून देतील. त्यांच्या भविष्यावर पुन्हा प्रश्न चिन्ह उभा टाकणार नाही.

-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...