एकदा एका सहकाऱ्यासोबत सहज गप्पा रंगल्या होत्या. विषय होता – खरा मित्र कोण? मी त्याला विचारले, "तुझा सर्वात विश्वासू मित्र कोण आहे?" तो आत्मविश्वासाने म्हणाला, "अनेक आहेत." मी हसतच म्हणालो, "बरं, त्यापैकी चार जणांची नावे सांग." काही क्षणांत संपेल असे वाटणारे ते उत्तर बराच वेळ येईनाच. अखेर त्याने कसाबसा एकच मित्राचे नाव घेतले. तेही जणू संकोचाने. त्या क्षणी मला जाणवले—मित्रांची संख्या सांगणे सोपे असते; पण मनापासून ज्याच्यावर विश्वास ठेवता येतो, अशी व्यक्ती शोधणे मात्र फार कठीण असते. पुढे त्यानेच मला विचारले, "मग खरा मित्र कोण असतो?" मी शांतपणे उत्तर दिले, "संकटाच्या वेळी सर्वप्रथम ज्याची आठवण येते, तोच खरा मित्र." हे उत्तर ऐकून तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. कदाचित मी त्याच्या मनातीलच एखाद्या न बोललेल्या सत्याला शब्द दिले होते. आज विज्ञानाने जग जवळ आणले आहे. एका क्लिकवर हजारो माणसे जोडली जातात; पण मनांमधील अंतर मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईलच्या संपर्क यादीत शेकडो नावे आहेत, समाजमाध्य...
"जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव..." मराठी माणसाच्या ओठांवर आजही घुमणाऱ्या या ओळी केवळ गीत नाहीत; त्या परिवर्तनाची मशाल आहेत. ही मशाल प्रज्वलित करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यविश्वातील असे तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहे की, ज्यांनी विद्यापीठाच्या पदव्या मिळवल्या नाहीत; पण जीवनाच्या विद्यापीठात त्यांनी वेदना, संघर्ष, श्रम आणि स्वाभिमानाचे सर्वोच्च शिक्षण घेतले. म्हणूनच त्यांच्या लेखणीतील प्रत्येक शब्दाला वास्तवाचा गंध आहे आणि प्रत्येक साहित्यकृतीला माणुसकीचा स्पर्श आहे.मराठी साहित्याच्या इतिहासात अनेक प्रतिभावंत झाले; पण आयुष्याच्या विद्यापीठात घडलेला, समाजाच्या जखमांवर शब्दांचे फुंकर घालणारा आणि अन्यायाविरुद्ध लेखणीला तलवारीची धार देणारा साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अद्वितीय आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म झाला. समाजव्यवस्थेच्या तळागाळात जन्मलेल्या या लेकराला शिक्षणाची संधी मिळाली नाही. परंतु ज्याला शाळा मिळाली नाही, त्याने जीवना ला च गुरू मानले. भूक त्यांचा पहिला शि...