मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Bussiness लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उद्योग जगतातला तारा निखळला

ब जाज उद्योग समूहाला पाच दशकांहून अधिक काळ आघाडीवर ठेवण्यात मोलाचा वाटा असणारे बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे नुकतेच वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. भारतीय वाहन उद्योग क्षेत्रातील एक आघाडीचं नाव म्हणून राहुल बजाज यांचं नाव घेतलं जातं. ऑटोमोटिव्ह उद्योगात बजाजचा विकास करण्यात राहुल बजाज यांचा मोलाचा वाटा आहे. राहुल  हे स्वातंत्र्यसेनानी व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू होते. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समुहाचे वैयक्तिक नुकसान तर झाले आहेच सोबत भारतीय उद्योग समुहात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते तरुण उद्योजकांसाठी एक प्रेरणास्रोत होते. राहुल यांनी उद्योग व वाणिज्य क्षेत्रात केलेली महत्वाची कामगिरी नेहमीच सर्वांच्या लक्षात राहिल. त्यांच्या जाण्याने देशाने एक महान उद्योजक गमावला आहे.    बजाज उद्योगाचा इतिहास राहुल बजाज यांच्या नावाला वगळून लिहिताच येणार नाही. पश्चिम बंगालमधील मारवाडी कुटुंबात १० जून १९३८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कमलनयन बजाज यांच्याकडून उद्योगाचा वारसा त्यांना मिळाला. सेंट स्टिफन्स कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त...