मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजचा दिवस महत्वाचा.

                        आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.आज संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.सोबत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानही बोलणार आहेत.जेंव्हापासून भारताने काश्मीरमधुन कलम ३७० हटवले आहे तेंव्हापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे.जगाचे लक्ष काश्मीर मुद्दयाकडे वळवण्यासाठी आणि या प्रश्नावर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाने मध्यस्थी करावी म्हणून पाकिस्तानने सर्व आघाडयांवर प्रयत्न करून पाहिले मात्र त्याला तोंडघशी पडावे लागले आहे.भारताने हा आपला अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून हा मुद्दा ईथे मांडण्यास विरोध दर्शवला आहे तर दूसरीकडे पाकिस्तानने हा मुद्दा मांडण्याचे साफ संकेत दिले आहेत.पाकिस्तान काश्मीर मुद्दयाबाबतीत संयुक्त राष्ट्र महासभेच्या सदस्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करेल तर भारताचा भर नेहमीप्रमाणे दहशतदावाचा मुद्दा सर्वोपरी करण्यावर असेल.पाकिस्तान दहशतवादाचा आधार घेवून काश्मीरमधील वातावरण खराब करण्याचा नेहमी प्रयत्न करत आला आहे.कलम ३७० हटवल्यानंतर तर पाकव्याप्त काश्मीर मधुन मोठया प्...

सावधान!आपण कॅमेराच्या नजरेखाली आहात..

लोकांना वाटते की,देशात सकारात्मक बदल कोणी नेता वा अधिकारी घडवून आणेल.मात्र वास्तविकता ही आहे की,ही क्रांती व्हिडिओ आणि कॅमेरा घडवून आणेल.कॅमेरा हे एक अद्भुत माध्यम आहे.याचा दृक आणि श्राव्य दोन्ही माध्यम म्हणून हवा तसा वापर करता येतो,म्हणजे याला डोळेही आहेत आणि वाचाही.आता हेच बघा ना,नेता असो वा अधिकारी,पोलिस असो वा पत्रकार,सज्ज्न असो वा दुर्जन सगळे कॅमेराच्या नजरेखाली आहेत.आपण सोशल मीडियावर काय करत आहात,कसे नाचत आहात,आपलं करिअर बनवण्यासाठी किती जणांपुढे नतमस्तक होत आहात,फिरायला कुठे गेला आहात अथवा अमक्या कडून पाचशे रुपयांची लाच घेतली सर्व काही पुराव्यासह ऑनलाईन आहे ते केवळ या कॅमेराच्या जादुमुळे. अगोदर वर्तमानपत्र अथवा चॅनलवाले पत्रकार होते,आता सामान्य जनताही पत्रकार आहे.हातात मोबाईल फोन घेवून लोक आता कुणाचाही समाचार घेतात,मग त्यातुन नविन मोटार वाहतुक नियमानूसार दंड आकारणारे पोलिसही सुटले नाहीत.सर्व जण कॅमे-यामुळे स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची अनुभूती करतायत.हेच काय पोलिस सुद्धा आता हातात बंदुक अथवा लाठी घेण्याऐवजी कॅमेराचा आधार घेत आहेत.राजकिय सभा असो वा मिरवणुक त्यावर ड्रोन कॅमेराच...

भारतीय युवकांमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण

म नुष्याच्या आयुष्यात अनेक वेळा अशा स्थिती निर्माण होतात जेंव्हा तो हतबल होवून जातो , परिस्थितीशी दोन हात करू शकत नाही. जेंव्हा त्याला कोणताच मार्ग दिसत नाही तेंव्हा एकच मार्ग त्याच्या पूढे शिल्लक राहतो तो म्हणजे आत्महत्येचा. आत्महत्या हा आत्मघाती निर्णय आहे. आत्महत्या कोणीही करू शकतो. उच्च शिक्षित , अभिनेता , राजकिय नेता , वैज्ञानिक , महिला , युवक वा सामान्य माणुस. आत्महत्येचे प्रमाण सुशिक्षित लोकात कमी आहे किंवा ते आत्महत्या करत नाहीत असा गैरसमज लोकात आहे. भारतात अशी कितीतरी उदाहरणे आहेत ज्यात आपल्या आयुष्यात यशस्वी असलेल्या लोकांनी जीवनाला कंटाळून आत्महत्या केली आहे. अशी उदाहरणे जेंव्हा समोर येतात तेंव्हा सामान्य माणुस हा विचारही करू शकत नाही की , संबंधीत व्यक्ती अशा प्रकारचा निर्णयही घेवू शकते. देशात कित्येक आयपीएस , आएएस , राजकिय नेते , उद्योगपती आणि चित्रपट नायक-नायिकांनी नैराश्यात येवून आत्महत्या केल्या आहेत. मागे राष्ट्रसंत भैय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. आत्महत्या करण्यापासून व्यक्ती स्वत:ला वेळीच रोखू शकतो मात्र त्याची व...