मुख्य सामग्रीवर वगळा

सावधान!आपण कॅमेराच्या नजरेखाली आहात..

लोकांना वाटते की,देशात सकारात्मक बदल कोणी नेता वा अधिकारी घडवून आणेल.मात्र वास्तविकता ही आहे की,ही क्रांती व्हिडिओ आणि कॅमेरा घडवून आणेल.कॅमेरा हे एक अद्भुत माध्यम आहे.याचा दृक आणि श्राव्य दोन्ही माध्यम म्हणून हवा तसा वापर करता येतो,म्हणजे याला डोळेही आहेत आणि वाचाही.आता हेच बघा ना,नेता असो वा अधिकारी,पोलिस असो वा पत्रकार,सज्ज्न असो वा दुर्जन सगळे कॅमेराच्या नजरेखाली आहेत.आपण सोशल मीडियावर काय करत आहात,कसे नाचत आहात,आपलं करिअर बनवण्यासाठी किती जणांपुढे नतमस्तक होत आहात,फिरायला कुठे गेला आहात अथवा अमक्या कडून पाचशे रुपयांची लाच घेतली सर्व काही पुराव्यासह ऑनलाईन आहे ते केवळ या कॅमेराच्या जादुमुळे.
अगोदर वर्तमानपत्र अथवा चॅनलवाले पत्रकार होते,आता सामान्य जनताही पत्रकार आहे.हातात मोबाईल फोन घेवून लोक आता कुणाचाही समाचार घेतात,मग त्यातुन नविन मोटार वाहतुक नियमानूसार दंड आकारणारे पोलिसही सुटले नाहीत.सर्व जण कॅमे-यामुळे स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची अनुभूती करतायत.हेच काय पोलिस सुद्धा आता हातात बंदुक अथवा लाठी घेण्याऐवजी कॅमेराचा आधार घेत आहेत.राजकिय सभा असो वा मिरवणुक त्यावर ड्रोन कॅमेराच्या साहयाने पोलिसांची नजर होतीच.नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.यात तीन महिला पोलिस कर्मचारी भर रस्त्यावर एका कथित पत्रकाराची कानउघाडणी करताना दिसत आहेत.या पत्रकाराने रात्री दारू पिऊन त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर काही तरी उलट-सुलट लिहिले होते म्हणून त्याची त्या भर रस्त्यात हजेरी घेत होत्या.हा पत्रकार बिचारा खाली मान घालून उभा होता.याचा व्हिडिओ या महिला पोलिसांनीच स्वत: सोशल मीडियावर व्हायरल केला.खरंतर कॅमेरा आणि व्हिडिओच्या वापराबाबतीत आता संक्रमणाचा काळ आहे.
                       नुकतेच एका जिल्हयाच्या जिल्हाधिका-यांनी पत्रकारांना पत्रकारिता कशी करायची ते शिकवले.शाळेमध्ये विदयार्थ्यांना निकृष्ट आहार दिल्याची बातमी प्रसारित झाल्याने ते दु:खी झाले होते.त्यांच्या मते,जर पत्रकाराला बातमी बनवायची आहे तर त्याने फोटो काढावा परंतु व्हिडिओ बनवू नये.त्यांचे विधान ऐकल्यानंतर असे वाटते की,एक कार्यशाळा सरकारी अधिका‌-यांसाठी सुद्धा आयोजित केली पाहिजे.त्यांना आता हे समजावल पाहिजे की,आता हातात मोबाईल फोन सोबत घेवून फिरणारा पत्रकार एकाचवेळी अनेक कामे करत आहे.आता तो वर्तमानपत्रासाठी लिहित आहे,न्युज चैनलसाठी व्हिडिओही बनवत आहे,सोबत वेबसाईटवर तात्काळ तो व्हिडिओ अपलोड करून अपडेटही होत आहे.या जिल्हाधिका-यांच्या अज्ञानामुळे आपले काम व्यवस्थित करूनही संबंधित पत्रकारावर एफआयआर दाखल झाला.खरंतर ही कार्यशाळा नेते,सरकारी अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,गुत्तेदार,पोलिस,सुशिक्षित सर्वांसाठी घेणे आवश्यक आहे.
कॅमेरा फक्त मोबाईल मध्येच असतो असे नाही,तो कोणत्या वस्तुत गुप्तरित्या बसवलेला असेल सांगता येत नाही.अनेक स्टिंग ऑपरेशन गुप्त कॅमेराच्या रितीने करून पत्रकार राजकिय वर्तुळात खळबळ उडवुन देतात.एका माजी केंद्रीय मंत्र्यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे ज्यात ते आपत्तीजनक स्थितीत दिसत आहेत.मागे केजरीवाल सरकार मधील एका मंत्र्याला अशाच एका व्हिडिओमुळे राजिनामा दयावा लागला होता.लोकसभेत कामकाज सुरू असताना काही खासदार मोबाईलवर कसले व्हिडिओ बघण्यात गुंग असतात,महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना डुलक्या कशा मारतात,आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचे भाषण सुरू असताना एकमेकात त्याची खिल्ली कशी उडवतात हे जनतेसमोर आणले ते या कॅमे-यानेच.
ईश्वर सर्वव्यापी आहे तसा कॅमेराही सर्वव्यापी आहे,तो कुठेही बसवलेला असू शकतो.ईश्वराच्या लाठीत आवाज असत नाही मात्र कॅमेराची मार खूप जबर असते.नुकतेच एका युवकाला त्याच्या मुलांसमोर पोलिसांनी बेदम मारहाण केली.याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि ते पोलिस निलंबीत.आपल्या समोर आता दोनच पर्याय आहेत.एक तर सावध रहा की,आपल्यावर कोणत्याही कॅमे-याची नजर तर नाही ना आणि दुसरा म्हणजे अशी कर्मच करू नका जेणेकरून ते सार्वजनिक होण्याची भीती वाटेल.जे करायचे ते उघडपणे करा,ज्यात आपली प्रतिमा मलिन होण्याची भीती नसेल.रानू मंडल ही पश्चिम बंगाल मध्ये रेल्वे स्थानकावर लता मंगेशकरांची गिते गावून प्रवाशांकडून मिळणा-या चार पैशांवर आपला कसा-बसा उदरनिर्वाह करणारी.अतींद्र चक्रवर्ती या तरूणाने राणाघाट स्टेशनवर ती गात असताना तिचा व्हिडिओ तयार करून आपल्या फेसबुकवर अपलोड केला.तिचे गायन खूप आवडल्याने लोकांमध्ये हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.पूढे काय झाले हे आपल्याला माहित आहेच.रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली.म्हणजे कर नाही त्याला भीती कसली.मात्र जर आपण काही चूकीचे करत आहात तर हे लक्षात ठेवा की,आपण कॅमेराच्या नजरेखाली आहात.कॅमेरा ईश्वर तर नाही मात्र सर्वव्यापी झाला आहे.तो आपले जीवन बनवूही शकतो अथवा बिघाडुही शकतो.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...