मनुष्याच्या आयुष्यात अनेक वेळा अशा स्थिती निर्माण होतात
जेंव्हा तो हतबल होवून जातो, परिस्थितीशी दोन हात करू
शकत नाही. जेंव्हा
त्याला कोणताच मार्ग दिसत नाही तेंव्हा एकच मार्ग त्याच्या पूढे शिल्लक राहतो तो
म्हणजे आत्महत्येचा. आत्महत्या हा आत्मघाती निर्णय आहे. आत्महत्या कोणीही करू
शकतो. उच्च
शिक्षित, अभिनेता, राजकिय नेता, वैज्ञानिक, महिला, युवक वा सामान्य माणुस. आत्महत्येचे प्रमाण
सुशिक्षित लोकात कमी आहे किंवा ते आत्महत्या करत नाहीत असा गैरसमज लोकात आहे. भारतात अशी कितीतरी
उदाहरणे आहेत ज्यात आपल्या आयुष्यात यशस्वी असलेल्या लोकांनी जीवनाला कंटाळून
आत्महत्या केली आहे. अशी उदाहरणे जेंव्हा समोर येतात तेंव्हा सामान्य माणुस हा विचारही
करू शकत नाही की, संबंधीत व्यक्ती अशा प्रकारचा निर्णयही घेवू शकते. देशात कित्येक आयपीएस, आएएस, राजकिय नेते, उद्योगपती आणि चित्रपट
नायक-नायिकांनी नैराश्यात येवून आत्महत्या केल्या आहेत. मागे राष्ट्रसंत भैय्यू
महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. आत्महत्या करण्यापासून
व्यक्ती स्वत:ला वेळीच रोखू शकतो मात्र त्याची विचारक्षमता त्यावेळी खुंटलेली
असते. आधुनिक
जीवनशैली खूप स्पर्धात्मक झाली आहे. व्यक्ती प्रत्येक गोष्टीला यश आणि अपयशाशी जोडण्याचा
प्रयत्न करतो त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. दरवर्षी संपूर्ण जगात १०
लाख लोक आत्महत्या करतात. जगात होणा-या आत्महत्यांपैकी २१ टक्के आत्महत्या भारतात
होतात. सामाजिक
जागरूकतेमुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी करता येवू शकते असे मानसोपचारतज्ञ मानतात.
जगभरात जीवघेणी स्पर्धा आणि कामाचा ताण वाढत चालला आहे. आयुष्याच्या यशस्वितेचा
संबंध अर्थार्जनाशी जोडला गेला आहे. त्यामुळे युवकांत आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. विदेशात वयस्कर लोकांचे
आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे तर भारतात परिस्थिती या उलट आहे. भारतात आत्महत्या
करणा-यांमध्ये युवक आणि स्त्रीयांचे प्रमाण अधिक आहे. लोकांना आत्महत्या
करण्यापासून परावृत्त करण्यासाठी नविन नारा देण्यात आला आहे, ‘आत्महत्या वाचवण्यासाठी आपण सर्व मिळून काम करू या’. भारतात एक लाखामागे ११
लोक आत्महत्या करतात तर जापानमध्ये हा आकडा २० चा आहे. भारतात आत्महत्यांमध्ये
आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर तमिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्यप्रदेश
येतात. भारतात
होणा-या एकूण आत्महत्यांमध्ये ५१ टक्के वाटा याच राज्यांचा आहे. पांडेचरी मध्ये
आत्महत्येचा दर सर्वाधिक आहे. इथे १० लाखांमागे ४३२ व्यक्ती आत्महत्या करतात तर सिक्कीम
मध्ये हा दर ३७५ चा आहे. एका सर्व्हेनुसार भारतात पुरुषांपेक्षा चार पटीने अधिक महिला
आत्महत्या करतात. दक्षिण
भारतात दुस-या राज्यांच्या तुलनेने साक्षरतेचे प्रमाण अधिक आणि लिंगभेद कमी
असताना सुद्धा इथे महिलांच्या आत्महत्येचा दर अधिक आहे. संपूर्ण जगात मृत्यूच्या
कारणांमध्ये दहावे कारण आत्महत्या म्हणजेच आत्मघात आहे.
व्यक्तीच्या जीवनात अपयशामुळे नकारात्मक विचार निर्माण व्हायला
सुरूवात होते. आपल्या करिअर मध्ये अयशस्वी झाल्यानंतर तो आपले मुल्यांकन कमी करू
लागतो. त्यामुळे
तो अशा त-हेचे टोकाचे पाऊल उचलतो. आत्महत्येच्या प्रमुख कारणांमध्ये जीवनाबद्द्ल नकारात्मक
विचार अंर्तभूत आहे. समस्येवर उपाय न दिसल्यामुळे व्यक्ती समाधानी दिसत नाही. ती एकलकोंडी होते, मित्र आणि
नातेवाईकांपासून दुर राहु लागते. व्यसनांच्या आहारी जाते, अत्याधिक जोखमीची कामे
करू लागते. अशा
व्यक्तींच्या विचारात बदल घडवून आपण या प्रवृत्तीला रोखु शकतो. अभियान चालवुन आपण यावर
काही मर्यादेपर्यंत यश प्राप्त करु शकतो. व्यक्तीच्या वागण्यात झालेला बदल वेळीच ओळखुन
त्याच्यामध्ये आपण सकारात्मक विचार निर्माण करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीच्या
जीवनक्रियेत अचानक बदल झाला तर तुम्ही त्याला तो आत्महत्या करण्याचा विचार करतोय
का ? कधी करणार आहे ? हे विचारु शकता. जर तो व्यक्ती अशा वेळेचा उल्लेख करित असेल ज्या वेळेत तो
एकांतात असतो किंवा त्याच्या घरी कोणीच नसत तेव्हा त्याची आत्महत्या करण्याची
शक्यता अधिक असते आणि जर त्याने वेळ आल्यावर बघु म्हटले तर शक्यता कमी असते. जर तो फाशी घेईन, जाळून घेईन, पाण्यात अथवा रेल्वे समोर
उडी मारेन असे सहज उपलब्ध होणारे पर्याय सांगत असेल तर अशा स्थितीत ती व्यक्ती
आत्महत्या करण्याची शक्यता अधिक असते. जर ती व्यक्ती जीवनात निराशावादी असेल, करिअर मध्ये अपयशी अथवा
प्रेमात तिने धोखा खालला असेल तर समजा त्याच्या आत्महत्येची शक्यता अधिक आहे.
आत्महत्येची दहा प्रमुख कारणे आहेत ज्यात नशा आणि जुगाराचे व्यसन, नैराश्य, औषधांचा चूकीचा उपयोग, एड्स, कॅन्सर, ह्रदय रोग यासारखे असाध्य
आजार यांचा समावेश आहे. जीवनात झालेले आर्थिक नुकसान सुद्धा जगण्याची ईच्छा कमी करते. याशिवाय व्यक्तीची
सामाजिक आणि आर्थिक स्थिती, अनुवंशिकता, कौटुंबिक कलह ही प्रमुख
कारणे आहेत. एका
शोधानुसार नैराशामुळे ८.६ टक्के व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करतात. सिजोफ्रेनिया सारख्या
मानसिक आजाराने ग्रस्त १४ टक्के लोक असा प्रयत्न करतात. एका आकडेवारीनुसार जर
पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तर यापैकी २० टक्के लोक दुस-यांदा परत आत्महत्येचा
प्रयत्न करतात. यापैकी
१ टक्का लोक वर्षभरातच मृत्यूला कवटाळतात तर ५ टक्के लोक १० वर्षानंतरही पुन्हा
असा प्रयत्न करतात. जुगार खेळणा-या लोकांपैकी २४ टक्के लोक कधी ना कधी आत्महत्या करतात.
अशा व्यक्तींचे मानसिक समुपदेशन करून त्यांना आपण वाचवु शकतो. यासाठी प्रथम सामाजिक
जागरूकता होणे आवश्यक आहे. नैराश्याने ग्रस्त व्यक्तीच्या प्रती त्याच्या मित्रांचा
आणि कुटुंबीयांचा सकारात्मक दृष्टीकोण असला पाहिजे. भारतात युवकांमध्ये
आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे ही गंभीर बाब आहे. यावर नियंत्रण
मिळवण्यासाठी शासकिय स्तरावर सुद्धा धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. अशा लोकांचे मानसिक
समुपदेशन झाले पाहिजे, वेळोवेळी तपासणी झाली पाहिजे. पुणे येथे connecting
नावाची एक समाजसेवी संस्था आहे. आपण किंवा इतर कोणी
नैराश्याने ग्रस्त असेल तर या संस्थेशी संपर्क करू शकता. ही संस्था मोफत समुपदेशन
व उपचार करते. आत्महत्या
रोखण्यासाठी सहज उपलब्ध होणारे किटकनाशक, विषारी पदार्थ आणि
शस्त्रांवर बंदी आणली पाहिजे. अशा स्थितीत पहुचलेल्या लोकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोण
पुन्हा निर्माण केला पाहिजे. याप्रकारच्या उपायांनी आपण पूर्णपणे नाही परंतु काही
मर्यादेपर्यंत आत्महत्या रोखु शकतो.
मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे. आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

सर आपले लिखाण खुपच छान असतात वैचारिक विचारांची देवाण घेवाण चांगल्या प्रकारे करता.तुमच्या लिखाणाला नमण
उत्तर द्याहटवा