मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

२०२३ चे स्वागत करताना...

बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच निसर्ग नियमानुसार २०२२ ला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. भारत शकांचा, मन्वन्तरांचा, तसेच इसवींचाही सन मोठय़ा उत्साहाने साजरा करतो. प्रारंभ म्हणजे सुरुवात! मागील चांगल्या-वाईट गोष्टींना मागे सारून नवीन होणा-या सूर्योदयासोबत नवसंकल्पांचे अवलंब करणे, आपल्यासाठी नक्की काय चांगले हे पडताळणे, सत्याची कास धरणे, हे माझ्याकडून सुटणारच नाही ह्यापेक्षा खरंच याने माझी किती हानी होते ह्याचा विचार करायला हवा. आपण नवीन वर्षात नव्या उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत. नवे वर्ष आले म्हटल्यावर त्याचे स्वागत आणि त्यानिमित्ताने संकल्प करणे देखील ओघाने आलेच. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी काहीना काही तरी प्लॅन्स केले असतील आणि त्याच्या बरोबरीने नवीन वर्षामध्ये काय करायचे याचा संकल्पही केला असेल.. तसे पाहता प्रत्येकाचा नववर्षाचे स्वागत करण्याचा दृष्टीकोन वेग-वेगळा असतो..पद्धती वेगळ्या असतात..हा ज्याच्या त्याच्या संतोषाचा आणि समाधानाचा भाग आहे. नववर्षाचे...

भारतीय परिचारिकांना जगभरात मागणी

एक उदात्त व्यवसाय म्हणून जगभरात ओळखला जाणारा व्यवसाय म्हणजे परिचारीकेचा व्यवसाय. हा व्यवसाय संयमाने सेवेत समर्पण करण्याची मागणी करतो. परिचारिकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या कामाचे वातावरण आणि पात्रता पातळीनुसार बदलतात. प्राथमिक स्तरावर रुग्णांची काळजी घेणे परिचारिकांना आवश्यक असते, तर वरिष्ठ स्तरावर परिचारिकांना मनोरुग्ण, मुले, आयसीयू रुग्ण अशा विशेष गटांची काळजी घ्यावी लागते. यासाठी विशेष कौशल्ये आवश्यक आहेत. याशिवाय, नर्सिंग कर्मचारी औषधे वाटप करणे, रुग्णांचे अहवाल अद्ययावत ठेवणे, वैद्यकीय उपकरणे बसवणे, प्रशासकीय आणि इतर अनेक कामे देखील करतात. जीवन-मृत्यूशी लढा देणा-या रुग्णाची २४ तास सेवा फक्त परिचारकाच करते. भारतातही परिचारिका न थकता, न थांबता रात्रंदिवस अनेक तास रुग्णांची सेवा करतात, पण त्यांना खूप कमी पगार मिळतो. देशात प्रत्येक परिचारिकेवर ६-८ रुग्णांची जबाबदारी असते. न्याहारी, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण वेळेवर करायला कधीच वेळ मिळत नाही. इमर्जन्सी केस असेल तर वॉशरूममध्येही जाता येत नाही. परिचारिकांना पाठदुखी, कंबरदुखी आणि पाय सुजणे हे सामान्य आहे. पण त्यांच्या पगाराबद्दल बोला...

मानवी स्थलांतराची समस्या

विविध कारणास्तव आपले राहाते घर किंवा प्रदेश किंवा अगदी आपला स्वदेश सोडून इतर परक्या प्रदेशामध्ये वास्तव्यास जाणे हा प्रकार मनुष्यप्राण्यांमध्ये अगदी इतिहासपूर्व काळापासून होत आला आहे. शास्त्रीय परिभाषेमध्ये या प्रकारास ‘स्थलांतर करणे’ असे म्हणण्यात येते. स्थलांतर’ हा माणसाच्या आजवरच्या इतिहासात कायमच महत्त्वाचा घटक राहिला आहे. अवघ्या मानव जातीचा इतिहास हा स्थलांतराचा इतिहास राहिलेला आहे. म्हणजे, दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आपला पूर्वज असलेल्या आदिमानवाने अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या इर्षेपायी गुहेबाहेर पाऊल टाकलं, ते आजही थांबलेले नाही. स्थलांतराची ही प्रक्रिया मानवाच्या जन्मापासून अव्याहत सुरूच आहे. आजवरच्या इतिहासात स्थलांतराच्या या अव्याहत प्रक्रियेला चालना देणारे, रोखणारे अनेक टप्पे येऊन गेले आहेत. म्हणजेच, साधारण दहा-एक हजार वर्षांपूर्वी जेव्हा भटके जगणे टाळून माणूस शेती करू लागला तेव्हा, टोळ्यांनी स्थलांतर करणारा माणूस काही काळापुरता स्थिरावला. मग दळणवळणाची साधने विकसित होत गेली, महासाथी, युद्धे, महापूरासारख्या आपत्ती कोसळत गेल्या तशी स्थलांतराची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत गेली. युरो...

सेक्सटॉर्शन पासुन सावध राहणे गरजेचे

  रा ज्यात सेक्सटॉर्शनच्या नावाखाली फसवणूक किंवा खंडणी गोळा करण्याचा प्रकार वाढला असून, या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात सेक्सटॉर्शनच्या सुमारे २२९ प्रकरणांची नोंद झाली आहे. तसेच २००२ लेखी तक्रारी पोलिसांच्या ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. अशा फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी एकूण १७२ जणांना अटक केली आहे. बहुतेक आरोपी हे परराज्यातील आहेत. सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात वाढ होऊ लागल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पीडित व्यक्तींना आता मदतीचा हात देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सेक्सटॉर्शन खंडणीचा फोन आल्यास घाबरून जाऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. तसेच पोलिस सेक्सटॉर्शन पीडितांचे समुपदेशनही करणार आहेत. सेक्सटॉर्शनच्या या प्रकाराला तरुणच नाही तर वयस्कर व्यक्तीही सध्या बळी पडत आहेत. लैंगिक आकर्षणामुळे सेक्सटॉर्शनसारख्या गुन्ह्यात अडकणाऱ्या तरुणांची संख्या ही सगळ्यात जास्त असून यात १९ ते २७ वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. कामाचा ताण, एकटेपणा आणि सोशल मीडियावरून होणारी घुसमट यातून मार्ग काढण्यासाठी अनेक तरुण अशा प्रकारच्या जाळ्यात आपसूक ओढले जातात. तसेच, लैंगिक आकर्षणामुळे मुलींसोबत...

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल

सै न्य, नौदल आणि वायूसेना असे भारतीय लष्कराचे तीन भाग पडतात. लष्कराचे हे तीनही भाग अत्यंत शूर आणि बलवान सैनिक तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनले आहेत. यापैकी कोणत्याही दलात प्रवेश घेण्यासाठी अत्यंत कठोर निवड चाचणी आदींचा सामना करावा लागतो. भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही शाखांत महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत एकेक निर्णय घेत आता देशाचे सैन्य दल घातक युद्धकौशल्य असणाऱ्या महिलांना आणखी एक आव्हान खुणावणार आहे. भारतीय नौदलाच्या मार्कोस आणि हवाई दलाच्या गरुडा या विशेष कमांडो पथकात महिला कमांडोंचा लवकरच समावेश केला जाणार आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये असणा-या कमांडोंना कठोर प्रशिक्षण दिले जाते. या कमांडोंवर विशेष आणि गुप्त ऑपरेशन्स करण्याची जबाबदारी असते. या कामामध्ये स्पेशल फोर्स कमांडो निपूण असतात. या कमांडोसाठी आतापर्यंत फक्त पुरुषांना परवानगी होती. पण आता भारतीय नौदल महिलांनाही कमांडो होण्याची संधी देणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना अतिशय कठोर समजल्या जाणाऱ्या चाचण्यांतून यशस्वीपणे जावे लागणार आहे. भारतीय नौदलातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि दुरगामी निर्णय आहे. हा ऐतिहासिक निर्णय...

आळशी लोकांचा देश : भारत

आ ळस हा माणसाचा शत्रू आहे असे म्हणतात. एखादे काम केले नाही तर अनेकांना तुम्ही किती आळशी आहात असे म्हणताना ऐकले असेल. प्रत्येकाच्या घरात असा एकतरी आळशी धोंडा असतोच. मात्र अनेकांना जगातील सर्वात जास्त आळशी लोकं कोणत्या देशात आहेत असा प्रश्न पडतो. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनात जगातील आळशी देशांबाबत भाष्य केले आहे. जगभरातील स्मार्टफोन धारकांच्या फोनवरील विशिष्ट डेटा गोळा करून शास्त्रज्ञांनी एका सर्वेक्षणाच्या आधाराने मोठा विचित्र शोध लावला आहे. या संशोधनात सर्वात आळशी देश आणि सर्वात सक्रीय देशांची नावे सांगितली आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने ४६ देशांतील ७ लाख लोकांवर हे संशोधन केले आहे. भारतीय लोक सध्या अनेक बाबतीत प्रगतिपथावर आहेत. प्रत्येक क्षेत्रात जगावर भारतीयांच्या बुद्धिमत्तेची छाप पडत आहे. परंतु तरीही भारताची म्हणावी तशी प्रगती होत नाही. प्रचंड लोकसंख्या हा देशावरचा बोजा ठरत आहे, प्रचंड मनुष्यबळ म्हणून त्याची गणती करणे अद्यापही भारताला शक्य झालेले नाही. भारत हा काही वर्षामध्येच सर्वाधिक तरुणांचा देश होणार असला तरी या तरुणांच्या ऊर्जेचा, क्रयशक्तीचा व...

ज्येष्ठांनो बक्षीस पत्र करताना काळजी घ्या

मुलांच्या नावे संपत्ती करताना मुलांकडून म्हातारपणी काळजी घ्यावी अशी अट लिखित स्वरुपात लिहून घ्यावी, असं महत्वाच निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. अन्यथा मुलांनी त्यांच्या वृद्ध पालकांकडे दुर्लक्ष केल्यास पालकांनी केलेलं बक्षीस पत्र (गिफ्ट डिड) रद्द होऊ शकत नाही. न्यायमूर्ती संजय के. कौल आणि ए. एस. ओका यांच्या खंडपीठाने मंगळवारी जेष्ठ नागरिकांना हा सल्ला दिला आहे. गुरुग्राममधील एका आईने तिच्या मुलांना काही मालमत्ता भेट दिल्या होत्या. त्यानंतर मुले तिची काळजी घेत नसल्याचा आरोप करून तिने नंतर बक्षीस पत्र रद्द करण्यासाठी मेंटेनन्स ट्रिब्युनलकडे धाव घेतली. न्यायाधिकरणाने आरोप खरे ठरल्यानंतर मे २०१८ मध्ये बक्षीस पत्र रद्द केले. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने न्यायाधिकरणाच्या निर्णयाशी सहमती दर्शवली आहे. मात्र, न्यायमूर्ती कौल आणि ओका यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. बक्षीस पत्रामध्ये वृद्ध महिलेने तिची तीन मुले, दोन मुली आणि एक मुलगा यांना मालमत्ता भेट म्हणून देताना तिच्या देखभालीसाठी स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे बक्षीस पत्र रद्द करता येऊ शकणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे...

मीराबाई चानूची चमकदार कामगिरी

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. मीराबाईने ४९ किलो गटात २०० किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे. कोलंबियातील बोगोटा येथे बुधवारी ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे तिची प्रतिस्पर्धी खेळाडू झिहुई ही ४९ किलो वजनी गटातील ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. मीराबाईने या स्पर्धेत झिहूईचा पराभव केला आणि रौप्य पदक पटकावले. झिहुईला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, मीराबाई चानूला या वर्षी सप्टेंबरमध्ये ट्रेनिंदरम्यान दुखापत झाली होती. ती मनगटाच्या दुखापतीशी झुंज देत आहे. तिने क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलले. मात्र, स्नॅच प्रकारात वजन उचलत असताना तिचा तोल गेला पण अशा परिस्थितीतही तिने स्वत:चा शानदार बचाव केला. मीराबाईने स्नॅचमध्ये ८७ किलो वजन उचलले. अशा प्रकारे तिने एकूण २०० किलो वजन उचलून इतिहास रचला. यापूर्वी ऑक्टोंबरमध्ये झालेल्या नॅशनल गेम्समध्येही ती दुखापतीसह सहभागी झाली होती.  मीराबाईचा जन्म इंफाळपासून २२ किमी दूर असणाऱ्या नोंगपोक काकचिंग गावात गरीब कुटुंबात झा...

भारतीय तरूणांमध्ये ऑनलाईन गेम्सचे वाढते वेड

 भारतात दिवसेंदिवस तरुणाई ऑनलाईन गेममध्ये अडकत चालली असून, ऑनलाईन गेम्सच्या व्यवसायात भारत जगात चौथा देश ठरला आहे. २०२२ मध्ये भारतात १५०० कोटी वेळा गेम्स डाऊनलोड केले आहेत. हे चीन, अमेरिका आणि जपाननंतर जगात सर्वात जास्त प्रमाण आहे. याचे सर्वात मोठे कारण भारतातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आणि स्वस्त मोबाइल डेटा आहे. गेमिंग कॅपिटल फंड लुमीकाईनुसार भारतात २०२२ मध्ये ऑनलाईन गेम्सचा व्यवसाय सुमारे ८९६७ कोटी रुपयांचा आहे. यावरून भारतातील तरूणाईमध्ये ऑनलाईन गेमचे वेड किती वाढले आहे, याचा अंदाज येतो. कोरोना लॉकडाउनच्या काळात सुरक्षित सामाजिक वावराचं बंधन पाळण्यासाठी घरच्या घरी ऑनलाईन गेम्सचा पर्याय स्वीकारला गेला. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग करणाऱ्यांची संख्या वाढली. घरबसल्या नातेवाईकांबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर ऑनलाइन गेम्सचे डाव मोठ्या प्रमाणावर रंगताना दिसले. मध्यंतरीच्या काळात पबजी या गेमचं वेड वाढल्यामुळे तो खेळण्यावर या गेमच्या कंपनीकडून काही निर्बंध घालून देण्यात आले होते. मात्र ल्युडो, सापशिडी, बुद्धिबळ, पत्ते यांसारख्या ग्रुपनं खेळल्या गेम्सवर कोणतेच निर्बंध नसल्यामुळे हे गेम खेळण्याकडे...

समाधानी पिढी आता आपल्याला सोडून जातेय

  जुनी पिढी म्हणजे अशी माणसं ज्यांच वय साधारणतः ८० ते ९० च्या घरात आहे. आम्ही म्हटलं तर मधल्या पिढीतले ज्यांनी मागच्या पिढीतलं बरच काही जवळून बघितलय आणि नव्या पिढीला अनुभवतोय. अत्यंत समाधानी असणाऱ्या या मागच्या पिढीबद्दल नव्या पिढीला फारसं काही माहिती नाही. येत्या १० ते १५ वर्षांमध्ये ही जुनी पिढी जिचा काळच वेगळा होता ती आपल्याला सोडून जाणार आहे. नव्या पिढीला या जुन्या पिढीतील कळाव म्हणून हा लेख प्रपंच.                 उद्याची चिंता नसणारी, अत्यंत समाधानी जगणारी ही पिढी. जी कमी पैशातही आनंदी असायची. लवकर झोपणारी व सकाळी लवकर उठणारी ही पिढी. जिची दिवसाची सुरुवात प्रसन्न पहाटेने व्हायची. भूपाळी ऐकायला मिळायची. सकाळ होताच पक्षांचा किलबिलाट ऐकू यायचा. कोंबडा आरवायचा. दंड-बैठकांना सुरुवात व्हायची. सगळे पुजा-पाठाला लागायचे. आजच्या सारखी धावपळ नव्हती. कुठे जायची घाई नसायची. मोठे ताजी पोळीभाजी घेऊन कामाला जायचे तर लहान हुंदडत शाळेत. स्कुटर, कारचा जमाना नव्हता, दोन पायावर मात्र विश्वास होता. आजच्या सारखी वाहनं न मोठ्यांना लागायची न लहानांना शाळेत जाण्...

जगावर मंदीचे सावट

कोरोनाच्या संकटाच्या झळा संपूर्ण जगभर बसल्या आहेत. त्यातून आता जग सावरत असतानाच जागतिक मंदीचे सावट घोंगावताना दिसत आहे. एक तर बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यात अनेक ठिकाणी नोकर कपातीवर भर दिला जात आहे. त्यात मोठ-मोठ्या कंपन्याही मागे नाहीत. त्याचा जबर फटका सहन करण्याची वेळ लोकांवर आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात मंदीचे सावट घोंगावण्याची भीती व्यक्त होत आहे. जगभरातल्या विविध देशातल्या केंद्रीय बँका वेगाने व्याजदर वाढवत आहेत. हे पाहता २०२३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाऊ शकते. मंदीच्या भीतीने नोकरदार वर्गामधली भीती आणखीनच वाढली आहे. कारण कोरोना काळात ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर काढून टाकण्यात आलं, पगार कमी करण्यात आले हे सगळं त्यांच्या डोक्यातून गेलेलं नाही. आर्थिक पॅकेजच्या नावावर प्रचंड उधळपट्टी, चीनमध्ये कोव्हिड प्रतिबंधामुळे सप्लाय चेन व्यवस्थेवर झालेला परिणाम, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती यामुळे खाद्यान्नाच्या किमती दशकातील सर्वाधिक इतक्या झाल्या आहेत. परिणामी अमेरिकेची केंद्रीय फेडरल बँक, बँक ऑफ इंग्लंड, जपानची केंद्रीय...

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय दुर्दैवी

शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांना ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत आणि संबंधित शाळा बंद करण्याबाबत कार्यवाही कोणत्या स्तरावर सुरु आहे? याचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. यालाच अनुसरून जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षक असतील, तर त्या शिक्षकांची माहिती द्यावी आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत काय कार्यवाही केली, याबाबत विचारणा केली आहे. त्याचप्रमाणे २८ ऑगस्ट २०१५ च्या निर्णयानुसार जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या; तसेच संच मान्यतेनुसार मंजूर शिक्षक, शिक्षकेतर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांबाबत विचारणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या संख्येवर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र आहे. मिळालेल्या आदेशानुसार ज्या-त्या जिल्ह्याच्या शिक्षण अधिका-यांनी याबाबत माहिती संकलन करण्यास सुरुवात केली असून प्रत्येक जिल्ह्यात अशा शाळांची संख्या मोठी असल्याचे समोर येत आहे. शिक्षण विभागाकडून जरी याबाबत माहिती संकलित करण्यात येत असली तरी या शाळा बंद करण्याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. शिक्षण विभागाच्या आधीच्या निर्णयानुसार प...

महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक सर्वात कमी सुरक्षित

 ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर होणा-या अत्याचारात गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. २०२० मध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीचा आलेख ढासळला होता. पण कोरोनानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर आले आहे. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर होणा-या आत्याचारात वाढ झाली आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्रात ६१९० ज्येष्ठ नागरिकांसंबधित गुन्ह्याची नोंद झाली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. तर या यादीत मध्य प्रदेश दुस-या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये मध्य प्रदेशमध्ये ५२७३ गुन्हे घडले ज्यात पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजेच मध्य प्रदेशात दररोज १४ वृद्ध गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. तेलंगणामध्ये २०२१ मध्ये १९५२ प्रकरणांसह तिस-या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये २०२१ मध्ये १८४१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. दरम्यान, या बहुतांश घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.   ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात तामिळनाडू आघाडीवर ...

हॉकीचे जादूगार : मेजर ध्यानचंद

 आज २९ अॉगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याच दिवशी भारताचे राष्ट्रपती  खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करतात. आज संपूर्ण देश हॉकीच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आठवण काढत आहे. ब्रिटीशांच्या राजवटीत गुलामांचे जीणे जगणाऱ्या भारताला जगज्जेतेपदाच्या सिंहासनावर बसवणारे मेजर ध्यानचंद यांची कर्तबगारी कोणत्याही अव्वल देशभक्तापेक्षा कमी नव्हती. १९२८, ३२ व ३६ या पाठोपाठच्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीतील सुवर्ण पदकांची हॅट्ट्रिक भारताने साजरी केली, त्यात मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता. त्या तीन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या १०१  गोलापैकी ३८ गोल तर चक्क ध्यानचंदने लगावलेले. हॉकीतील या जादूगाराविषयी लिहावं-बोलावं तितकं थोडकच. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे २९ ऑगस्ट १९०५ मध्ये ध्यानचंद यांचा जन्म झाला.त्याचं मूळ नाव “ध्यान सिंग” आहे. परंतु ते रात्री उशीरापर्यंत हॉकीचा सराव करायचे म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना रात्रीच्या चंद्राची उपमा देऊन त्यांचं ध्यानचंद हेच नाव...

भारतात चित्ता पुन्हा धावणार

  चित्ता  पृथ्वीतलावरचा अत्यंत वेगवान समजला जाणारा हा प्राणी आहे . शिकारीमागे  तो  ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने धावतो. त्याचा  वेग थक्क करणारा असाच आहे. जेव्हा  तो  शिकारीचा पाठलाग करतो तेव्हा त्याला कॅमे-यात टिपणं अवघड होवून बसतं. कारण त्याच्या शरीराच्या हलचाली अत्यंत वेगवान असतात. वन्यजीव अभ्यासकांच्या मते चित्यांसाठी गवताळ प्रदेश पोषक मानला जातो. चित्ता हा प्राणी सिंह, वाघ, बिब ट्या या प्राण्यांप्रमाणेच फेलिडो अर्थात मार्जारकुळातील असल्याचं काही वन्यजीव अभ्यासकांच म्हणनं आहे. तर काही वन्यजी व अभ्यासकां ना ते मान्य नाही. ए केकाळी चित्त्याचं वास्तव आफ्रिका आणि भारतीय उपखंडातील सपाट भुभागावर होतं. भारतात मुघलांच्या काळात देखील चित्ते मुबलक प्रमाणात होते. १६ व्या शतकात मुघल बादशाह जहांगीर यांच्या काळात जगात पहिल्यांदाच चित्ता पाळण्यात आला. आपल्या काळात एकूण १० , ००० चित्ते होते आणि त्यापैकी १००० आपल्या दरबारात होते, अशी नोंद जहांगीर यांचे वडील अकबर यांनी केली आहे. तर मुघल सम्राट अकबरकडे ९ , ००० पेक्षा जास्त चित्ते होते. ऐतिहासिक नोंदीनुसार छत...