मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक सर्वात कमी सुरक्षित


 ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर होणा-या अत्याचारात गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. २०२० मध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीचा आलेख ढासळला होता. पण कोरोनानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर आले आहे. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर होणा-या आत्याचारात वाढ झाली आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्रात ६१९० ज्येष्ठ नागरिकांसंबधित गुन्ह्याची नोंद झाली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. तर या यादीत मध्य प्रदेश दुस-या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये मध्य प्रदेशमध्ये ५२७३ गुन्हे घडले ज्यात पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजेच मध्य प्रदेशात दररोज १४ वृद्ध गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. तेलंगणामध्ये २०२१ मध्ये १९५२ प्रकरणांसह तिस-या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये २०२१ मध्ये १८४१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. दरम्यान, या बहुतांश घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

  ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात तामिळनाडू आघाडीवर असून महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे. तर मध्य प्रदेश तिस-या क्रमांकावर आहे. तामिळनाडूमध्ये १९१, महाराष्ट्रात १८१, मध्य प्रदेशमध्ये १२१ आणि उत्तर प्रदेशमध्ये १०१ ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येची नोंद झाली आहे. मध्य प्रदेशात ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, असे एनसीआरबीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांविरोधातील ६,१९० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. आघाडीवर असणा-या या चार राज्यांमध्ये अनुक्रमे २०१९, २०२०, २०२१ या काळात जेष्ठ नागरिकांविरोधात झालेल्या अत्याचारांची संख्या -  महाराष्ट्र ६१६३, ४९०९, ६१९०, मध्य प्रदेश ४१८४, ४६०२, ५२७३, तेलंगणा १५२३, १५७५, १९५२, तामिळनाडू २५०९, १५८१, १८४१ अशी आहे. 

संपूर्ण जगामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला खूप प्राधान्य दिले जाते. भारत देशदेखील त्याला अपवाद नाही. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात जवळपास १०४ दशलक्ष (१०.४ कोटी) ज्येष्ठ नागरिक आहेत. ही यूके आणि कॅनडाची एकूण लोकसंख्या आहे. ही संख्या २०२६ पर्यंत १७३ दशलक्ष (१७.३ कोटी) आणि २०५० पर्यंत ३०० दशलक्ष पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसंबंधी सरकारतर्फे आणि पोलीस खात्यातर्फे विशेष उपाययोजना केल्या जातात आणि त्या अनुषंगाने विशेष उपक्रमदेखील राबविले जातात. परंतु या सर्व उपाययोजनांना अपेक्षित प्रसिद्धी दिली जात नाही. त्यामुळे सर्वसाधारण नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. पोलिसांतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी उपाययोजना केलेल्या आहेत. जे ज्येष्ठ नागरिक आपल्या घरामध्ये एकटेच राहत आहेत त्यांनी त्याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याला कळविले तर स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या घरी येऊन त्याची प्राथमिक आणि आवश्यक माहिती गोळा करतात. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या घरी बिट अधिकारी/ अंमलदार नियमितपणे भेट देतात. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये साधारणपणे चार भाग केले जातात व त्या भागांना बिट असे संबोधले जाते. त्या प्रत्येक भागासाठी बिट अधिकारी नेमलेला असतो. तो बिट अधिकारी त्याच्या विभागातील ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करतो. त्यासंबंधी एक नोंदवही तयार केली जाते आणि त्यामध्ये संबंधित ज्येष्ठ नागरिकाची व त्याच्या जवळच्या नातेवाईकाची माहिती संकलित केली जाते. याशिवाय पोलिसांतर्फे हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिका-यांना त्या सोसायटीमध्ये राहणा-या ज्येष्ठ नागरिकांची माहिती पोलिसांना कळविण्याबाबत लेखी सूचना दिल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबई पोलसिांनी विशेष टेलिफोन सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचे नंबर १०९०, २०३, १०० इत्यादी आहेत. याशिवाय जे ज्येष्ठ नागरिक सोशल मीडियाचा वापर करतात ते मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडलवर देखील संपर्क साधू शकतात. काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप आहेत. त्या ठिकाणीदेखील स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधतात. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडूनच परस्पर पेंशन उचलून घेणे, मारहाण  करणे किंवा इतर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूकीचे प्रकार घडतात. अशावेळी  ज्येष्ठ नागरिक पोलीस विभागाची मदत घेवू शकतात. 

- सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...