बालपण हे हसण्या-बागडण्याच, तणावापासून संपूर्णत: मूक्त
असल पाहिजे अशा काळात आपण मुलांच्या हाती काय देत आहोत ? ज्या वयात आजोबा, काका, मामा यांच्या खांद्यावर बसून खेळायला हवं अशा वयात दफ्तराच न पेलणार ओझ
त्यांच्याच खांद्यावर आपण लादत आहोत. खरं तर पूर्वी स्वछंदपणे जगण्यासाठी ६
वर्षांचा काळ बालकाला मिळायचा आता हा काळ फक्त ३ वर्षांचा झाला आहे. ३ वर्षे पूर्ण
होताच कधी जगाच्या जिवघेण्या स्पर्धेत आपल मुल टिकल पाहिजे म्हणून तर कधी दूस-यांच
अनुकरण करून आपण त्याला शाळेत पाठवू लागलो आहोत. खरंच त्याच बालपण हिरावून
घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का ?
लहान-लहान निष्पाप मुलांनी खचाखच भरलेली स्कुल बस
मी रोज सकाळी बघतो,
अगदी जशी काय बकरी कोंबलीत. स्कुल बसच्या त्या जाळीतून जेंव्हा ते बाहेर बघतात
तेंव्हा असं वाटत की जणू त्यांना कैद केल गेल आहे आणि हे कैदी या तुरुंगातून बाहेर
बघतायत. ते रस्त्यावर असणा-या एखादया पिल्लासोबत खेळत असतात मात्र त्यांना समोरून
येणारी स्कुल बस खुणावत असते. दूसरीकडे बालकांवर आता त्याच्या पालकांच्या
अपेक्षांचे ओझे आहे. वर्गात त्याने सर्वात जास्त गुण मिळवले पाहिजेत म्हणून बरेचशे
पालक त्यांना दम देत असतात. त्यामुळे त्यांना ते सतत अभ्यासात व्यस्त असावेत असे
वाटते. जर त्याने मैदानावर जावून खेळण्याचा हट्ट केला तर त्याला जावू दिलं जात
नाही. एक तर त्यांच मातीत अंग भरलेलं आपल्याला आवडत नाही किंवा तो ज्यांच्या सोबत
खेळत असतो त्यापैकी कुणाच्यातरी पालकासोबत यांच जमत नसतं. मुलांसोबत मैदानावर
खेळल्याने मुलांत सामाजिकतेची भावना निर्माण होते. मिळून मिसळून राहणे, शिस्त, बंधुता व समाजात कसे रहायचे या गोष्टी
खेळामुळे निर्माण होतात. सोबत शारीरिक विकास ही होतो. आज जो सामाजिक स्तर ढासळत चालला आहे, नैतीक मुल्यांचा
जो –हास होत चालला आहे, व्यक्तीगत स्वार्थाची भावना वाढिस
होवू लागली आहे याचे हे ही एक कारण आहे की आपण मुलांना त्यांच्या स्वाभाविक
खेळांपासून दूर करत चाललो आहोत.
मग या मुलांनी खेळ कुठे व कोणते खेळायचे ? तर कॉम्प्युटर वर
व्हिडिओ गेम्स किंवा मोबाईलवर. इंटरनेट, टि.व्ही, मोबाईल, मुळे मूलं निसर्गाचा आनंद घेवू शकत नाहीत.
ती निसर्गापासून दूर जावून आभासी मनोरंजनाच्या जगात जगतात. कार्टून सिरियल्स आणि
हिंसक व्हिडिओ गेम्स मुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, तणाव, एकटेपणा आणि हिंसक प्रवृती निर्माण होते. एकत-हेने मुलांच्या मानसिक व
शारीरिक विकासात अडथळा निर्माण होतो. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आता आजी-आजोबांच्या
गोष्टी त्यांना ऐकायला मिळत नाहीत. त्या त्यांना चारित्र्य संपन्न बनवत असत, ही मुलं देशाच भवितव्य बनत. आता आई-वडिल दोन्ही कामावर जातात त्यामुळे
त्यांना आपल्या मुलांकडे बघायला वेळ नसतो. त्यामुळे मोबाईल व त्यावरिल इंटरनेटचा
वापर करित-करित ही मुलं अॅक्शन चित्रपट, अश्लिल गाणे ते
पॉर्न व्हिडिओज पर्यंत पोहचतात.
मुलांपासून प्रेम आणि मैत्रीची भावना आपण हिरावून घेतली आहे त्या
ऐवजी आपण त्यांना देत आहोत दूस-यांशी स्पर्धा करणारे, तणाव आणि काहीही करायची भावना निर्माण करणारे
टि.व्ही.शोज आणि स्पर्धा. मग या स्पर्धांसाठी दिवस-रात्र एक केली जाते.
प्रत्येकाला वाटते की, आपले मूल हे जिंकायला हवं परंतू कोणीतरी एकच
जिंकणार असतं. अशात जी मुलं हारतात त्यांना वाटते की, आपले संपूर्ण विश्वच संपले आहे.
एवढ्याशा वयात अशा प्रकारची निराशा धोकादायक ठरू शकते. या उलट जे मुल जिंकत
त्याच्यावर त्याच्या पालकांचे अभिमानाचे आणि अपेक्षांचे ओझे असतेच. याची परिणिती पूढे संघर्ष आणि शोषणात होते. खरंच
लहान मुलात स्पर्धा असावी का ? एवढ्याशा वयात जिंकणे आणि हारणे यात भेदभाव का ? पालकांचा वैयक्तीक स्वार्थ, प्रतिस्पर्धा आणि
तणावाच्या या खेळात मुलांचा आत्मविश्वास तुटतो आणि हारणा-या मुलात न्युनगंडाची
भावना निर्माण होते. पालकांनी जर अशा स्पर्धेत भाग घेवू दिलाच तर त्यांचे यात भाग
घेणे हेच महत्वाचे आहे. जिंकणे किंवा हारणे या पेक्षा जास्त महत्वपूर्ण आहे की, काही तरी वेगळे करणे, महत्वाचे शिकणे, नविन लोकांना भेटणे व भिती दूर करणे कारण स्पर्धा या साठीच असतात. हे जर
सर्व घडल तर ते हारूनही जिंकतात. मुलांचा पराजय ही स्विकारायला हवा. बालकांवर
मेडल्स, ट्रॉफी आणि प्रमाणपत्राचा ताण कशासाठी ?
मुलं ही फुलं आहेत त्यांना प्रसन्न ठेवलं पाहिजे, या फुलांना जपणं महत्वाच आहे. आपण प्रामाणिकपणे आपल्या आसपासच्या
कुटुंबातील वातावरणावर नजर टाकून आपल बालपण आणि आजच्या बालकांचे बालपण याची तुलना
केली तर माझे म्हणने तुमच्या सहज लक्षात येईल. किती विरोधा भास आहे की, बालमजूरी करणारी किंवा कच-यातून प्लास्टिकच्या वस्तू गोळा करणारी बालके
आजच्या भाकरीची सोय करण्यात गुंतली आहेत तर दूसरीकडे शाळेत जाणारी बालके
भविष्याच्या भाकरीची सोय करण्यात. ज्या देशात बालपणीच एवढ झगडाव लागत असेल त्या
देशाच भवितव्य काय असेल ? गरज आहे ती मुलांना
‘स्व’ च्या भावनेतून काढून ती समाजाला आपले कुटुंब समजेल आणि ‘वसुधैव कुटुम्बकम’
ची भावना वाढीस लागेल आणि ती या देशाचा जवाबदार नागरिक बनतील. एका कविने म्हटले
आहे,
कागदाची ‘नाव’ होती.....
पाण्याचा ‘किनारा’ होता...
मित्रांचा ‘सहारा’ होता.....
खेळण्याची ‘मस्ती’ होती...
मन हे ‘वेडे’ होते....
‘कल्पनेच्या’ दूनियेत जगत होतो...
कुठे आलो या ‘समजुतदारीच्या’ जगात....
या पेक्षा ते भोळे ‘बालपणचं’ सुंदर होते...
-सुरेश मंत्री.

सर, तुमचेच बालपण खूप चांगले होते असे मला वाटते. तुमच्या बालपणीचे खेळ खूप चांगले होते.आपण या लेखातून प्रत्येकाला त्याच्या बालपणात घेऊन जातात. धन्यवाद !
उत्तर द्याहटवा