माध्यमिक व्होकेशनल एक्सपोजर
सहाव्या वर्गात ११ वर्षांच्या मुलास प्रवेश मिळेल. आठव्या वर्गापर्यंत मुलांना व्होकेशनल एक्सपोजर मिळेल. त्याचे मूल्यांकन होणार नाही. भाषा व विज्ञानव्यतिरिक्त मानव्यशास्त्र, विज्ञान, कला, सामाजिक शाखाचा पायाभूत अभ्यास असेल. आठव्या वर्गाच्या अखेरीस तिसरे मूल्यांकन होईल. तिसरा, पाचवा व आठव्या वर्गातील मूल्यांकन बोर्ड परीक्षेसारखी होणार नाही. नियमित समुपदेशन. व्यावसायिक शिक्षणाचे मूल्यांकन नवव्या वर्गापासून होईल.
जन्मापासून तीन वर्षांपर्यंत : आई-वडिलांसाठीदेखील पहिल्यांदाच अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन अभ्यासक्रम (पालनपोषणाबाबत ) तयार झाला आहे.
३ ते ८ वर्षे वयोगटास परीक्षा नाही : बालवाटिका / प्री-स्कूलमध्ये मुलांना जादुई पेटाऱ्यातून ( ५३ प्रकारचे खेळ खेळणी, पोस्टर, बोर्ड, बिल्डिंग ब्लॉक, प्लेइंग (कार्ड) शिकवले जाईल. स्कूल बॅग नसेल. सहा वर्षांच्या मुलास पहिल्या वर्गात प्रवेश मिळेल. त्यात केवळ दोन पुस्तके असतील. भाषा व गणित. दुसऱ्या वर्गानंतर फाउंडेशन लेव्हल पूर्ण होईल.
९ वीचा निकाल दहावीशी जोडणार : नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर सिस्टिमने शिक्षण होईल. वर्षात बोर्ड परीक्षेसारख्या दोन संधी मिळतील. नववी-दहावी आणि अकरावी-बारावीमध्ये एकूण १६-१६ पेपर द्यावे लागतील. म्हणजे एक वर्षात किमान ८ पेपर असतील. नववीचा निकाल दहावीच्या अंतिम गुणपत्रिकेत जोडलेला असेल. त्याचप्रमाणे ११ वी मध्ये मिळालेले गुण देखील १२ वी मध्ये जोडले जातील.
९ वी व १० वीत आठ स्ट्रिम : मानव्यशास्त्र-भाषा, गणित, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला, सामाजिक शाख, विज्ञान, इंटरडिसिप्लिनरी ग्रुप. या ८ समूहात प्रत्येकातून दोन म्हणजे १६ पेपर निवडावे लागतील. या आठ गटांतून किमान तीन समूहातील चार विषय निवडावे लागतील.
आता शाखांचे विभाजन नसेल : संगीत, क्रीडा, क्राफ्टला कला शिक्षण, शारीरिक शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा गणित, विज्ञान, मानव्य, भाषा व सामाजिक विज्ञानासारखाच असेल. रिपोर्ट कार्डऐवजी हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड असे म्हटले जाईल.
नववी ते बारावीची परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होणार असल्याने दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा नसेल असा गैरसमज लोकांनी करून घेतला आहे. परंतु असं नसून या धोरणामध्ये बोर्डाच्या कार्यपद्धतीबाबत उल्लेख आहे. जरी परीक्षा या सेमिस्टर पॅटर्नमध्ये झाल्या तरीही बोर्डाच्या अखत्यारितच या परीक्षा होतील.
-सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा