चंद्रावरील मानवी तळ कसा असेल याची कल्पना कितीही केली असली तरी वस्तुस्थिती मात्र अगदी पायाभूत आहे. चंद्रापर्यंत प्रवास अत्यंत खार्चिक आहे. यासाठी जे यानं लागेल त्याचं वजन जितकं जास्त तितकं त्याला लागणारं इंधनही जास्त आणि खर्चही जास्त असं हे गणित आहे. त्यामुळे येथे राहता येण्यासारखं ठिकाण बनवणं जास्त योग्य ठरणार आहे. चंद्रावर कधीकाळी झालेल्या ज्वालामुखींच्या उद्रेकातील लाव्हा ट्यूब्जचा वापर राहण्यासाठी आणि चंद्राच्या भूपृष्ठाखाली दडलेल्या बर्फाच्या पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी करणं योग्य ठरणार आहे. चंद्रावरील बेसाल्टीक वाळू ही पृथ्वीवरील ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या वाळूसारखीच आहे, तिचाही उपयोग होऊ शकतो. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या राखेतून विटा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. थ्रीडी प्रिटिंगच्या मदतीनं या विटा बनवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या विटांतून इग्लूसारखा निवारा बनवता येईल. या थ्रीडी प्रिंटिंगसाठी सौर ऊर्जा लागेल, त्यासाठी सूर्य किरणं पकडता यावीत यासाठी मोठी लेन्स लागणार आहे. लेन्सची संख्या वाढवून ही गती वाढवता येईल. तसेच या विटा एकत्र करून त्यातून स्ट्रक्चर बनवण्यासाठी आंतराळवीर किंवा रोबो लागतील. पण तरीही एक स्ट्रक्चर बनवण्यासाठी लागणारा वेळ मोठा असणार आहे कारण एक वीट बनवण्यासाठीच पाच तासांचा वेळ लागणार आहे.
चंद्रावर वातावरण नाही. चंद्रावर ऑक्सिजन मिळवणं हे एक आव्हान असणार आहे. चंद्राच्या खडकावर जे थर आहेत, त्यातून ऑक्सिजन मिळवता येईल. चंद्रावर तापमान उणे १२७ ते उणे १७३ सेल्सिअस आहे. तिथं गुरुत्वाकर्षण आणि किरणोत्सर्ग अत्यंत कमी आहे. चंद्रावर उर्जा मिळवण्यात ही अडचणी आहेत. पृथ्वीवरील २९ दिवस म्हणजे चंद्रावरील एक दिवस होय. म्हणजे सौरऊर्जेचा वापर करायचा झाला तर चंद्रावर २ आठवडे रात्र आणि २ आठवडे दिवस असेल. चंद्रावर राहायचं झालं तर जे तंत्रज्ञान बनवायचं आहे, त्यात या परिस्थितीचा विचार करावा लागणार आहे. दीर्घकाळ राहण्यासाठी तर चंद्र काही स्वागतार्ह जागा नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा