मुख्य सामग्रीवर वगळा

अंगावर शहारे आणणारा चित्रपट 'द केरळा स्टोरी'


क चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. 'द केरळा स्टोरी' असं या चित्रपटाचं नावं आहे. 'द केरळा स्टोरी’ या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 'द केरळा स्टोरी' हा चित्रपट केरळ राज्यातील अतिशय गंभीर विषयावर बेतला आहे. केरळ राज्यातून तरुण मुली, महिला बेपत्ता होण्याच्या घटना आजही घडतच आहेत. केरळ राज्यातून बेपत्ता झालेल्या ३२,००० मुली आणि महिलांचं नेमकं काय झालं, त्या कुठं गेल्या यामागचं सत्य या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. ५ मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, २००९ मध्ये केरळ आणि मँगलोरमधून सुमारे ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं. या मुली लव्ह जिहाद’ला बळी पडल्या. त्यांना बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावलं होतं. त्यांच्यापैकी बहुतांश मुलींना नंतर सीरिया, अफगाणिस्तान आणि इतर भागात पाठवलं गेलंय. या मुली पुन्हा घरी परतल्याच नाहीत, असं सांगण्यात येतं. केरळमध्ये मुलींची कशी फसवणूक केली जाते, कसं त्यांचं ब्रेनवॉश केलं जातं. हिजाब घालणाऱ्या महिलांवर बलात्कार होत नाही, हे त्यांना दाखवलं जातं. त्यामुळं या महिला, मुली इस्लाम धर्म स्वीकारतात. यानंतर त्यांना ISIS च्या आतंकवाद्यांसमोर उभं केलं जातं. त्यानंतर सुरू होतो, अंगावर काटा आणणारा खेळ. आतंकवाद्यांचा क्रुर चेहरा दिसतो. असं काहीसं या चित्रपटाच कथानक आहे.

या चित्रपटात एक काल्पनिक कथानक मांडण्यात आलं असलं तरी केरळमधील एका दुर्दैवी घटनेचं दाहक वास्तव आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. केरळ, आंध्रप्रदेश मधील चंदन तस्करी बद्दल आपण ऐकून आहोत मात्र याच केरळ मधून होणा-या मानवी तस्करी बद्दल अद्याप लोकांना फारसं काही माहीत नव्हत आणि यावर कोणत्याही चित्रपट निर्मात्याने चित्रपट बनवलेलाही नव्हता. द केरळा स्टोरी या चित्रपटाची निर्मिती विपुल शाह यांनी केली असून सुदिप्तो सेन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. विपुल शाह यांनी याअगोदर ‘ह्युमन’ नावाच्या एका संवेदनशिल वेबसिरीजची निर्मिती केली होती. या चित्रपटासाठी त्यांनी चार वर्षे संशोधन आणि अभ्यास केला आहे. केरळ मधील मुलींच्या संघर्षाची ही गाथा बघून नक्कीच सर्वांचे डोळे पाणावतील. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भारतात घडलेल्या अजून एका अन्यायाबद्दल माहिती मिळेल. या चित्रपटात अत्यंत हिंसक आणि हृदयद्रावक दृश्य तसेच काही बोल्ड संवादही ऐकायला मिळत आहेत. “अल्लाह हा या सृष्टीचा एकमेव कर्ता धर्ता आहे.” किंवा “हिजाब परिधान केलेल्या एकाही मुलीचा बलात्कार झालेला नाही.” असे संवादही आहेत असे या चित्रपटाच्या ट्रेलर वरून लक्षात येते. अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी या अभिनेत्री चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
                                
 चित्रपटावर बंदीची मागणी

या चित्रपटामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता पाहता या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. तमिळनाडूतील एका पत्रकाराने चित्रपटावर बंदी घालण्यासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ, केरळचे मुख्यमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे याचिका केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून केरळची प्रतिमा मलीन करून तेथे धार्मिक भेदभाव पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. द केरळा स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही ? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...