पावसामुळे
अनेक क्रिकेट सामन्यांमधील षटकं कमी केली
जातात. तर काही वेळा अनेक क्रिकेट सामने रद्द होतात. अशावेळी दोन्ही संघांना प्रत्येकी १ पॉइंट वाटून
दिल्याने पॉइंट्सटेबलचं गणितही बिघडतं. पावसामुळे सर्व समीकरणं बदलतात.
यामुळे उत्साहाने स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड सुद्धा होतो. मात्र आता असं काहीच होणार नाहीये. यासाठी एक तंत्रज्ञान विकसित झालयं. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास
आता सामना रद्द होणार नाही. यामुळे कितीही पाऊस पडला तरी नो टेन्शन. ही पद्धत नक्की काय आहे, आणि पावसानंतरही सामना कसा
खेळवण्यात येणार, हे आपण जाणून घेऊयात.
पाऊस
पडल्याने आऊटफिल्डवर परिणाम होतो. याआधी स्टेडियमच्या एका भागात पाणी काढण्यासाठी
ड्रेनेज सिस्टमचा वापर करण्यात आला होता. आता मैदान अवघ्या
काही मिनिटात सुकवण्यासाठी एडवान्स सब
एअर सिस्टमचा वापर केला जाणार आहे. सब एअर सिस्टमच्या मदतीने मैदान लवकरात लवकर
सुकवलं जातं. या सिस्टमच्या मदतीने संपूर्ण मैदानात आऊट फिल्डमध्ये परफारेटड पाईप
टाकले जातात. यामध्ये बारीक बारीक छिद्र असतात. या छिद्रांच्या मदतीने पाणी या
पाईपच्या माध्यमातून बाहेर पडतं. तसेच प्रेशरमुळे पाणी शोषून बाहेर काढलं जातं.
इतकंच नाही, तर या सिस्टमच्या मदतीने मैदानातील गवताच्या मुळात जाऊन पाणी एअर
प्रेशरच्या मदतीने शोषून काढलं जाऊ शकतं. कितीही मुसळधार किंवा बदाबदा,
पाऊस कसाही पडो, अवघ्या २० मिनिटात या आधुनिक
तंत्रज्ञानाच्या मदतीने पावसाच्या पाण्यावर पाणी फेरलं जाणार आहे, म्हणजेच खेळपट्टीवरील जमलेलं पाणी नाहीसं होणार. यामुळे मैदान आधीसारखं
खेळण्याच्या लाईकीच होईल. या सिस्टिममुळे पावसानंतर मैदान लवकरात लवकर
सुकवण्यात मदत होईल, ज्यामुळे खेळावर परिणाम होणार नाही. सामने रद्द झाल्याने भविष्यात पुन्हा
तसं होऊ नये, यासाठी एडवान्स सब एअर सिस्टमचा वापर करण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा