मुख्य सामग्रीवर वगळा

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची संधी

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ने १० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आधार कार्ड धारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ५ आणि १५ वर्षांनंतर सुद्धा आधार कार्डमध्ये बदल करणे गरजेचे आहे. आधार केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी ५० रुपये शुल्क द्यावे लागते. आधार कार्डमध्ये चुकीची माहिती असेल, नावात, पत्त्यात, लिंगात चूक झाली असेल तर ती आता तुम्हाला सहज दुरुस्त करता येईल. केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची मोफत संधी दिली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण नागरिकांकडून ही माहिती अद्ययावत करण्यासाठी कोणतेच शुल्क आकारणार नाही. आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. १४ जून २०२३ पर्यंत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

घरबसल्या करा बदल

UIDAI च्या डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत myAadhaar पोर्टलवर https://myaadhaar.uidai.gov.in तुम्हाला मोफत आधारकार्ड अपडेट करता येईल. कागदपत्रे अपलोड करता येईल. पोर्टलवर ओळखीचा पुरावा आणि रहिवासाचा पुरावा टाकून आधार कार्ड दुरुस्त करता येईल.

या गोष्टी आवश्यक
आधार कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने काही माहिती अपडेट करु शकता. तर काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

असे करा आधार कार्ड अपडेट

१.     UIDAI च्या सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवर जा

२.     https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा

३.     तुमचा १२ अंकांचा आधारा कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका

४.     ओटीपी पाठविण्याचा पर्याय निवडा, त्यानंतर पुढील प्रक्रिया करा

५.     आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल

६.     ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा

७.     प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा

 

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...