भारतीय
विशिष्ट ओळख प्राधिकरण ने १० वर्षांपेक्षा अधिक
जुन्या आधार कार्ड धारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ५
आणि १५ वर्षांनंतर सुद्धा आधार कार्डमध्ये बदल करणे गरजेचे आहे. आधार
केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी ५० रुपये शुल्क
द्यावे लागते. आधार कार्डमध्ये चुकीची माहिती असेल, नावात, पत्त्यात, लिंगात चूक
झाली असेल तर ती आता तुम्हाला सहज दुरुस्त करता येईल. केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची मोफत संधी दिली
आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण नागरिकांकडून ही माहिती अद्ययावत करण्यासाठी कोणतेच शुल्क आकारणार नाही.
आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. १४ जून २०२३ पर्यंत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली
आहे.
घरबसल्या करा बदल
UIDAI च्या डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत myAadhaar पोर्टलवर
https://myaadhaar.uidai.gov.in तुम्हाला मोफत आधारकार्ड
अपडेट करता येईल. कागदपत्रे अपलोड करता येईल. पोर्टलवर ओळखीचा पुरावा आणि रहिवासाचा पुरावा टाकून आधार कार्ड दुरुस्त करता येईल.
या
गोष्टी आवश्यक
आधार कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने काही माहिती अपडेट करु
शकता. तर काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी
लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मतारीख,
पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु
शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी
मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
असे करा आधार कार्ड अपडेट
१.
UIDAI च्या सेल्फ सर्विस
अपडेट पोर्टलवर जा
२.
https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा
३.
तुमचा १२ अंकांचा आधारा कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका
४.
ओटीपी पाठविण्याचा पर्याय
निवडा, त्यानंतर पुढील
प्रक्रिया करा
५.
आधार संबंधीत मोबाईल
क्रमांकावर हा ओटीपी येईल
६.
ओटीपी टाकून ‘अपडेट आधार
ऑनलाइन’ हा पर्याय निवडा
७.
‘प्रोसीड टू अपडेट आधार’
हा पर्याय निवडा, माहिती भरा

छान माहिती
उत्तर द्याहटवा