एप्रिल महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून नवीन महिन्याची सुरुवात होत आहे. १ मे पासून अनेक क्षेत्रात बदल दिसून येतील. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर पडेल. गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. वस्तू आणि सेवा करांपासून ते म्युच्युअल फंडासंबंधीच्या नियमात बदलाचे वारे आहे. १ मे रोजी तुमच्या मोबाईलवरील कॉल आणि एसएमएस संबंधी सर्वात फायदेशीर बदल होत आहे. त्यामुळे तुमची नकोशा कॉल्सपासून सूटका होणार आहे. आता कॉल आणि फसवणुकीच्या एसएमएसच्या जाळ्यात कोणी अडकणार नाही.
जीएसटी नियमांत बदल
१ मे पासून
व्यापारांना, व्यावसायिकांना जीएसटीमध्ये मोठा बदलाची
पूर्तता करावी लागणार आहे. आता १०० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांसाठी हा नियम आहे.
त्यानुसार, या कंपन्यांनी व्यवहाराची पावती सात
दिवसांत इनवॉयस रजिस्ट्रेशन पोर्टलवर अपलोड करणे
आवश्यक आहे. हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. अजून यासाठी कालावधी निश्चित
करण्यात आला नाही.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या
किंमती निश्चित करतात. १ एप्रिल रोजी
सरकारने १९ किलो
व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत ९१.५० रुपयांची कपात केली होती. एका वर्षात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत २२५ रुपयांची कपात झाली आहे. १ मे रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत मोठा बदल
दिसून आला.
ग्राहक घेतील मोकळा श्वास
ट्राय, ग्राहकांना या नकोशा कॉल्सपासून वाचविणार आहे. तसेच खोट्या एसएमएसपासून मुक्ती देणार आहे. त्यासाठी आभासी तंत्रज्ञानाचा, म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात येईल. या यंत्रणेमुळे नेहमी सतावणाऱ्या कॉल्सची, एसएमएसची ओळख पटेल आणि तुमच्या फोनपर्यंत हे कॉल्स येणारच नाहीत. नेटवर्कवरच हे कॉल्स फिल्टर होतील. त्यासाठी १ मेपासून मोठे बदल करण्यात येत आहे.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा