मुख्य सामग्रीवर वगळा

गरज मुलींची विचारधारा बदलण्याची


काही दिवसांपूर्वी माझ्या एका दूरच्या नातेवाईकांकडे गेलो होतो. तेंव्हा त्यांनी सांगितले कीते आजकाल खूप परेशान आहेत कारण त्यांच्या मुलाचे लग्नच होत नाहीयय. खरंतर त्यांच्या मुलाला चांगला जॉब आहे आणि तो दिसायलाही सुंदर आहे. मी त्यांची ही अडचण ऐकुण थोडा हैराण झालो. जेंव्हा मी लहान होतो तेंव्हा लोकांना यासाठी परेशान बघितल होत कीत्यांच्या मुलीचे लग्न होत नाहीयय. तेंव्हा मुलाचे बाप मात्र ताठ मान करून फिरायचे. मुलींच्या लग्नावर कितीतरी म्हणी बनलेल्या आहेत. एका काळात असं मानल जायच कीमुलगा म्हणजे जणू पूढील काळातील चेक आहेत जेंव्हा पाहिजे तेंव्हा वटवा. म्हणजे फायदाच फायदा. मात्र आता परिस्थिती विपरीत झाली आहे. आता मुलांचे वडिल ही असेच परेशान आहेत जसे मुलींचे बाप राहत. याला कारण ही तसेच आहे. एकीकडे मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी होत आहे तर दूसरीकडे मुलींच्या स्थितीत बराच बदल झाला आहे. आता ही गोष्ट राहिली नाही कीमुलीला विचारल्या शिवाय तिचे हात कुणासोबत ही पिवळे करावेत. आता त्या शिक्षण आणि आपल्या करिअरला अधिक प्राथमिकता देतात. लग्न ही त्यांची प्राथमिकता नाही. जर लग्नाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्या खूप विचारपूर्वक घेतात.

आता शहरी भागात जातीला एवढेसे महत्व राहिले नाही. आंतरजातीय विवाह ही आता सामान्य बाब होवून राहिली आहे. अशात पारंपारिक पध्दतीने लग्न करण्यासाठी ईच्छुक मुलांना वधु मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पूर्वी लोक आपल्या जातीतील कमावत्या मुलांची यादी बनवत आणि अशा मुलांच्या पालकांकडे आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेवून जात. अशा वेळी मुलाचा बाप खूप भाव खायचा. सर्वात अगोदर मोठ्या रक्कमेच्या हुंडयाची मागणी केली जायची त्यानंतर मुलाचा बाप म्हणेल त्या प्रमाणे थाटामाटात लग्न लावून द्यावे लागे.

     मी जेंव्हा लहान होतो तेंव्हा माझ्या समाजातील मुलाचे लग्न असले कीमला खूप आनंद व्हायचा. मग मी वरातीत जाण्यासाठी माझा नंबर लागावा यासाठी आईकडे हट्ट करायचो. याला कारण ही तसेच होते. काही वर्षांपूर्वी वर पक्षाकडून लग्नाला वरातीत जायचे म्हणजे मोठा थाट-माठ असायचा. व-हाडी उतरले नाहीत कीवधु पक्षाकडून त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले जायचे. दिवसभर चहा-पाणी किती ही मागा. व-हाडींपैकी कुणी चहा मागायचे तर कुणी कॉफी तर कुणी दुधत्यात साखरेचा आणि बिन साखरेचा वेगळा. हे पेय पुरवता-पुरवता वधु पक्षाकडील सरबराई करणा-यांची दमछाक व्हायची. प्रत्येकाला स्वतंत्ररित्या आंघोळीचा साबण आणि मेकअपचे साहित्य दिले जायचे. पुरुष व-हाडींची दाढी करण्यासाठी न्हावी हजर असायचा. कुणी अतीशहाणे व-हाडी आपले कपडे ईस्त्री करून आणण्यासाठी सेवाक-यांच्या अंगावर फेकायचे. नाश्ताजेवण या बाबतीत कटाक्षाणे खबरदारी घेतली जायची. त्यावेळी जरी मला त्यांच्या सरबराई मुळे आनंद होत असला तरी माझ्या अपरिपक्व मनात एक विचार यायचा तो म्हणजेहे सगळं करताना मुलीच्या बापाची किती वाट लागत असेल ? वधू पक्षाने वर पक्षाचे किती नखरे सहन करावेत ? अर्थात याचा परिणाम व्हायचा तोच झाला. माझ्या समाजातील सुशिक्षीत लोकांनी सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा आधार घेतला आणि मुली जन्माला यायच्या अगोदर पोटातच मारल्या जावू लागल्या. साहजिकच मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाली. फक्त माझ्याच जातीत नाही तर अनेक जातीत मुलींची संख्या कमी झाली आहे. आज आपल्या मुलाला मुलगी मिळत नाही म्हणून मुलाचे बाप परेशान आहेत.

सध्या मुलांचे वडिल तुमची मुलगी द्या म्हणून दारोदार फिरताना दिसतात. यात मुलींना शहरात राहणारासुशिक्षीतकरिअर व भरपूर संपत्ती असणारा वर हवा. त्यामुळे ज्या मुलांची घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे किंवा ते ग्रामीण भागात राहतात असे स्थळ मुली सरळ-सरळ नाकारतात. यात ही सर्व काही योग्य असेल आणि जुळण्यासारखी परिस्थिती असेल तर ब-याच वधू पक्षाकडून वर पक्षाकडे हुंड्याची मागणी केली जात आहे त्याच प्रमाणे लग्न करून घेण्याची अट टाकली जात आहे. लग्न ही साधेपणाने नाही तर धुमधडाक्यात व्हायला हवे. एकंदरीत आज अनेक ठिकाणी मुलाचे व-हाड वधू पक्षाकडे जात नाही तर वधुचे व-हाड वर पक्षाकडे जात आहे व जी सरबराई वधु पक्षाला करावी लागायची ती आता वर पक्षाला करावी लागत आहे.

एकंदरीत अनेक जातीत आज मुलींसाठी चांगले दिवस आलेत ही आनंदाची बाब आहे. मात्र सामाजिक प्रश्न जे पूर्वी होते ते आजही कायम आहेत. आजही लग्नातील तो बडेजाव आणि हुंडा पध्दत कायम आहे फरक एवढाच आहे कीपूर्वी मुलीच्या बापाची वाट लागायची आज मुलाच्या बापाची वाट लागत आहे. त्यामुळे या कुप्रथा बंद झाल्या पाहिजेत. मुलींनी हे समजून घेतले पाहिजे कीआज बदल घडवून आणण्यासाठी एक मोठे शस्त्र त्यांच्या हाती आहे. त्या आपल्या पित्यावर हुंडा न घेण्यासाठी दबाव आणून ही कुप्रथा कायमची बंद करू शकतात. जर त्या लग्नासाठी शौचालय असण्याची अट घालू शकतात तर लग्न आर्थिक उधळपट्टी न करता अगदी साधेपणाने लावून देण्यासाठी ही दबाव आणू शकतात. यासाठी आता मुलींना पूढे आले पाहिजे अन्यथा बदलत्या काळानूसार कधी मुलाचा बाप त्रस्त असेल तर कधी मुलीचा.


-सुरेश मंत्री. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...