मुख्य सामग्रीवर वगळा

हिंदू नवर्षाची महिमा आणि वर्तमानकालिन आव्हाने

हिंदू नवर्षाची महिमा आणि वर्तमानकालिन आव्हाने
सणांचा देश अशी ओळख असणा-या भारतात हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडव्याचे खास असे महत्व आहे.चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला हा सण येतो.याच सणाला ‘उगादी’ असेही म्हणतात.याच दिवसापासून हिंदू नविन वर्षाची सुरुवात होते.अस म्हणतात की,शालिवाहन नावाच्या एका कुंभार पुत्राने माती पासून बनविलेल्या सैनिकांच्या सेनेचा उपयोग करून शत्रुंचा पराभव केला होता.याच विजयाचे प्रतिक म्हणून शालिवाहन शकेची सुरुवात या दिवसापासून होते.आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये हा सण उगादी या नावाने साजरा केला जातो तर महाराष्ट्रात हा सण गुढी पाडवा या नावाने साजरा करतात.अस म्हणतात की, याच दिवशी ब्रम्हा ने सृष्टीची निर्मिती केली होती म्हणून याच दिवसापासून नव संवत्सर ही सुरू होतो. शुक्ल प्रतिपदेचा दिवस चंद्राच्या कलेचा प्रथम दिवस मानला जातो.
जर देशभरात प्रचलित परंपरांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर, आंध्रप्रदेश,कर्नाटक आणि महाराष्ट्रात घरांना आंब्याच्या पानांचे तोरण लावून या दिवशी सजवतात.याच दिवशी महान गणित तज्ञ भास्कराचार्य ने सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत दिवस,महिना आणि वर्ष अशी कालगणना करून पंचांगाची निर्मिती केली होती.अशी लोकमान्यता आहे की,या दिवशी भगवान रामाने बालीच्या अत्याचारी राजवटीपासून दक्षिणेतील प्रजेची मुक्तता केली होती.तेंव्हा राजा बाली पासून त्रस्त असणा-या प्रजेने घरा-घरात उत्सव साजरा करून गुढया उभा केल्या होत्या.याचीच आठवण म्हणून महाराष्ट्रात आजही आपल्या घराच्या अंगणात गुढी उभा करण्याची प्रथा प्रचलित आहे.दक्षिणेतील राज्यांच्या बाबतीत म्हटले तर या दिवशी आंध्र प्रदेश मधील घरांत ‘पच्चडी/प्रसादम’ वाटला जातो.अस म्हटल जात की याच उपाशीपोटी सेवन केल्याने मानवाचे आरोग्य निरोगी राहते.खर तर आजकाल बाजारात आंबे मोसमाच्या आधीच येत आहे परंतू आंध्र प्रदेश,कर्नाटक आणि महाराष्ट्रात या दिवसापासून आंबे खायला सुरूवात होते.पारंपारिक पद्धतीने नऊ दिवस साजरा केला जाणारा हा सण दुर्गापूजे बरोबर रामनवमीला राम आणि सिता यांच्या विवाहाबरोबर संपन्न होतो.
ऐतिहासिक रूपात याचा संदर्भ म्हणून अनेक कथा ऐकायला मिळतात परंतू ही एक विडंबना आहे की,आजच्या या आधुनिक काळात आपण आपल्या परंपरांना तिलांजली देत आहोत.आपण पाश्चात्य संस्कृतीचे प्रतिक असणा-या नविन वर्षाला हॅप्पी बनवित आहोत.हिंदू नववर्षात वैज्ञानिक रुपानेही तथ्य असताना लोक हिंदू नववर्षाला महत्वहिन करण्याचा प्रयत्न करित आहेत.३१ डिसेंबरच्या रात्री नविन वर्षाला सूरूवात झाली असे म्हणून बेधुंद नाचणा-या-गाणा-या लोकांना बघून शेवटी दूसरा काय तर्क निघू शकतो?
भारतीय संस्कृतीत विक्रम संवतशी खूप जवळचे नाते आहे.या दिवशी लोक पूजापाठ करतात आणि तिर्थ स्थानांना जातात.धार्मिक लोक पवित्र नदयांमध्ये स्नान करतात,सोबत मांस आणि दारूचे सेवन करणारे लोक ही या दिवशी या तामसी पदार्थांपासून दूर राहतात.या उलट विदेशी संस्कृतीचे प्रतिक असणा-या १ जानेवारीला साजरा केल्या जाणा-या नविन वर्षाच्या आगमनाच्या काही तासांअगोदर पासून मांस आणि दारूचा प्रयोग,अश्लील कार्यक्रम किंवा अशाच प्रकारचे बरेच काही आयोजित केले जाते ज्याचा आपल्या देशाच्या संस्कृतीशी दूर वरूनही संबंध नाही.एकीकडे विक्रम संवंतचे केवळ स्मरण करताच विक्रमादित्य आणि त्यांच्या विजयी अभियानाच्या आठवणी ताज्या झाल्या की,भारतीयांची मान गर्वाने ताठ होते.या उलट ईसवी सन च्या प्रचलित कालगणनेमुळे गुलामीने दिलेल्या जख्मा ताज्या होतात.माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना कुणीतरी १ जानेवारीला नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या तेंव्हा त्यांनी म्हटले होते की,कोणत्या गोष्टीच्या शुभेच्छा आपण देत आहात.?माझा आणि माझ्या देशाच्या सम्मानाचा या नविन वर्षाशी तर कसलाच संबंध नाही.आपण ही हे समजून घेतले असते तर.
     भारतीय सणांच्या बाबतीत जर बोलायच झाल तर प्रत्येक भारतीय सणाचा आपल्या सभ्यतेशी अतिशय घट्ट संबंध आहे आणि आपले भूत म्हणजे आपले जेष्ठ,वर्तमान म्हणजे युवक पिढी आणि भविष्य म्हणजे बालकं यांच्यात ते सामंजस्य स्थापित करतात.भारतीय सणांत एक संतुलन तर पाश्चात्य सणांत असंतुलन,एकाकीपण आणि यापूढेही जावून म्हणायचे झाले तर दारू आनि ईतर मादक पदार्थांच्या प्रयोगाने भारतीय शास्त्रात वर्णन केलेल्या राक्षसी-प्रवृतीचे दर्शन होते.याशिवाय भारतात सर्व वित्तीय संस्थांची नविन आर्थिक वर्षाची सूरूवात १ एप्रिल पासून होते,परंतू कुचक्र रचणा-यांच्या दुर्बुद्धिला बघा याच दिवसाला मुर्खांचा दिवस अस नाव दिल आहे. खर म्हटल तर या प्रकारच्या षडयंत्रांनी आणि कुचक्रांनी भारतीय सभ्यतेला बदनाम करण्याची कसलीही कसर सोडलेली नाही.
भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया असणा-या शेतीचा संबंधही चैत्र(एप्रिल) महिन्याशी आहे.चैत्र महिन्यात पिकांची कापणी झाल्यानंतर शेतक-यांजवळ पैसा येतो आणि पैसा आल्याने ते खूप आनंदी असतात.हे अतिशय दु:खाने सांगाव लागत आहे की,देश भरात शेतकरी आत्महत्या करित आहेत आणि सरकार त्यांच्यासाठी काहीच खास करत नाहीयं.अशा स्थितीत या हिंदू नववर्षात आनंदाचे दिवस त्यांच्या जीवनात कसे येतील? हा एक चिंतनाचा विषय आहे.खरं म्हटल तर सरकारने शेतक-याच्या बाबतीत विचारच करन सोडून दिल आहे.कधी-कधी त्यांचे कर्ज माफ करून दया-दृष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र त्यांच्या व्यथा दूर करण्यासाठी दिर्घकालिन उपाय कधिच केले जात नाहीत.
हिंदू नववर्षाला जर आपण निसर्गाच्या दृष्टीने बघितले तर चैत्र शुक्ल पक्षाची सूरूवात होण्याच्या पूर्वीच नवीन वर्षाची चाहूल लागायला सूरूवात होते. जर आपण निसर्गाचे दर्शन केले,त्याचा गंध समजण्याचा आणि जाणण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असे लक्षात यईल की,निसर्ग जणू ओरडून-ओरडून सांगतोय की,आता माझ्यात बदल होत आहे,नविन वर्ष येत आहे.वृक्ष आपली जिर्ण पाने सोडून देतात,पानगळतीला सूरूवात होते.जोराची वावटळ येते,जणू वा-याने स्वच्छता अभियानाला सूरूवात केली आहे.पुन्हा वृक्षांना नविन पालवी फुटायला लागते,सुंदर फुले येतात,आंब्याच्या झाडांना फळे येतात.हे सगळ मिळून हवेत एक वेगळाच सुगंध,मादकता निर्माण होते.एवढ सगळ समृद्ध नविन वर्ष सोडून जर आपण दूसरेच नविन वर्ष साजरा करण्यात जर आनंद मानणार असू तर आपल्या पेक्षा कोणी अज्ञानी नाही.आवश्यकता आहे या अज्ञानाला दूर करून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करण्याची,तेंव्हाच हिंदू नविन वर्षाची सार्थकता होईल.
                   
                     - सुरेश मंत्री,धारूर



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...