मुख्य सामग्रीवर वगळा

सिद्धार्थ शुक्लाची अकाली एक्झिट


 अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं गुरूवारी हृदयविकाराने निधन झालं. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. यावेळी झोपेतच हार्ट अटॅकने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. सिद्धार्थच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. चाहत्यांसाठी सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. अनेकांनी सिद्धार्थला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.

सिद्धार्थचा जन्म १२ डिसेंबर १९८० रोजी झाला. टीव्ही जगतातलं एक मोठं नाव म्हणून सिद्धार्थ शुक्लाकडे पाहिलं जायचं. त्याचा मनोरंजन विश्वातील प्रवासही तसा अनपेक्षितच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. २००४  मध्ये एकदा आईच्या सांगण्यावरून सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती. त्याला  माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली होती. यानंतर सिद्धार्थला डिसेंबर २००५ मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. त्याने या शो मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर ४०  सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले होते. तिथून परत आल्यानंतरही सिद्धार्थने मॉडेलिंग सुरू ठेवले. त्याने फेअरनेस क्रीमच्या व्यावसायिक जाहिरातीतही काम केले. या जाहिरातीनंतर २००८ मध्ये 'बाबुल का आंगन छूटे ना' या मालिकेतून त्याने आपल्या छोट्या पडद्यावरील करिअरला सुरुवात केली होती. सिद्धार्थने टीव्हीवर आपलं नाणं खणखणीत वाजवलं. सिद्धार्थने अनेक मालिकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. त्याने 'जाने पहचाने से अजनबी', 'सीआईडी', 'बालिका वधू' आणि 'लव यू जिंदगी' या मालिकांमध्ये काम केले. बालिका वधू या मालिकेतून सिद्धार्थने घराघरात आपली ओळख निर्माण केली होती. अलीकडेच तो 'बिग बॉस ओटीटी' मध्ये शहनाज गिलसोबत दिसला होता. त्याने बिग बॉसचा १३ वा सीझन जिंकला होता. याशिवाय खतरों के खिलाडीचा सातवा सीझनही त्याने जिंकला होता. यानंतर या अभिनेत्याने बॉलिवूडकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं. २०१४ मध्ये हम्प्टी शर्मा की दुल्हनिया सिनेमात तो दिसला होता. याचवर्षी त्याची ब्रोकन बट ब्युटिफूल ही वेब सीरिजही प्रदर्शित झाली होती. या सीरिजची खूप चर्चाही झाली होती.

सिद्धार्थ अत्यंत साधे जीवन जगायचा. तो नेहमीच रस्त्यावर फिरताना दिसायचा. सिद्धार्थ सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेत होता आणि भरपूर दान करत होता. २०१८ मध्ये  सिद्धार्थच्या कारला मोठा अपघात झाला होता. सिद्धार्थची भरधाव कार तीन गाड्यांना धडकली होती. त्यानंतर त्याची कार दुभाजकावर चढली होती. या अपघातात सिद्धार्थसह पाच जण गंभीर जखमी होते. तर २०१४ मध्ये देखील रस्ते अपघातातून सिद्धार्थ बचावला होता. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पोहोचताच सोशल मीडियावरील जनता शोकाकुल झाली आहे. सध्या इंटरनेट जगात सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची बातमी ऐकून सोशल मीडियावरील लोक स्तब्ध झाले आहेत. बऱ्याच लोकांचा विश्वासही बसत नाहीये की ज्या कलाकाराने आपल्या अभिनयाने त्यांच्या हृदयामध्ये एक विशेष स्थान निर्माण केले आहे तो आता या जगात नाही.

सुरेश मंत्री. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...