मुख्य सामग्रीवर वगळा

सरकारचा नवा कायदा अन् 'ऑनलाइन गेम्स' चा खेळ खल्लास


बुधवारी लोकसभेत माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी  ऑनलाईन बेटिंग गेमिंग अॅप्सवर बंदीचे विधेयक मांडले होते ते सरकारने मंजूर केले होते त्यानंतर ते राज्यसभेतही पारित झाले होते. शुक्रवारी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या विधेयकाचे नाव ऑनलाईन गेम प्रचार आणि नियमन विधेयक २०२५ असे आहे. या विधेयकानुसार, ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सना प्रोत्साहन दिलं जाईल, तर ऑनलाइन मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

या विधेयकाच्या कलम २ (जी) नुसार, ज्या खेळांमध्ये खेळाडूला पैसे किंवा काही आर्थिक लाभाच्या बदल्यात जिंकण्यासाठी शुल्क, पैसे किंवा स्टेक्स गुंतवावे लागतात, अशा सर्व खेळांवर बंदी घातली जाईल. लोक फॅन्टसी स्पोर्ट्स गेम्स, ऑनलाइन रमी, कार्ड गेम्स, पोकर प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन टीम तयार करून थेट पैशांची गुंतवणूक असणारे गेम्स खेळू शकणार नाहीत. आता या कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती ऑनलाइन मनी गेम्सशी संबंधित जाहिराती तयार करू शकत नाही किंवा त्यामध्ये मदतही करू शकत नाही. जर कुणी अशा प्रकारचे गेम्स खेळण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करेल तर त्याला या कायद्यानुसार, दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ५० लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. हा कायदा केवळ भारतात चालणाऱ्या गेम्सनाच लागू होणार नाहीये, तर परदेशातून चालवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म्सनाही लागू होईल. अनेक फॅन्टसी स्पोर्ट्स, सट्टेबाजी, कसिनो प्लॅटफॉर्म परदेशातून चालवले जात आहेत. भारतात बसलेले लोक अॅप्स किंवा वेबसाइटद्वारे त्यांचा वापर करतात. हे विधेयक लागू झाल्याने, सरकार अशा प्लॅटफॉर्म्सना भारतात ब्लॉक करू शकते.

आजकाल अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि फिल्मी स्टार्स ऑनलाइन मनी गेम्सची जाहिरातबाजी करत आहेत. इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघांच्या जर्सीच्या माध्यमातूनही याचा प्रचार केला गेला. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जाहिरातबाजीमुळेच ऑनलाइन गेमिंग अधिक लोकप्रिय झालं. अंदाजे ४५ कोटी लोक दरवर्षी ऑनलाइन गेम खेळून सुमारे २०,००० कोटी रुपये गमावतात, ज्यामध्ये जुगार आणि सट्टेबाजीचा समावेश आहे. नवीन कायदा पास केल्यामुळे ड्रीम११, गेम्सक्राफ्ट, एमपीएल, झुपी आणि प्रोबो यांसारख्या मोठ्या गेमिंग कंपन्यांना त्यांचे 'रिअल मनी गेम्स' बंद करण्यास सुरू केले आहे. या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्याचे गेमिंग संघटनानी ठरविले आहे. उद्योग संघटनांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे सुमारे २०,०००० नोकऱ्या निर्माण करणाऱ्या ३.८ अब्ज डॉलर्सच्या क्षेत्राला धोका निर्माण झाला आहे. ओनलाईन गेमिंग कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बंदीमुळे बेकायदेशीर ऑफशोअर जुगार चालकांना फायदा होईल तसेच बेरोजगारीत वाढ पडू शकते असे म्हटले आहे. त्यामुळे हा नैतिकतेचा मुद्दा असताना दुसरीकडे रोजगाराच्या संधीही अडचणीत आल्याने हा प्रश्न आणखी जटील होण्याची शक्यता यामुळे वर्तवली जात आहे.  

देशभरात ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील तरुण पिढी या गेमिंगच्या आहारी आपलं आयुष्य उद्धवस्त करत आहेत. ऑनलाइन मनी गेमिंगमुळे कुटुंबे आर्थिक संकटात तर येतातच, शिवाय मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. अनेक प्रकरणांमध्ये कर्ज, गुन्हेगारी आणि आत्महत्याही होते. या ऑनलाईन गेमिंगमुळे एकट्या कर्नाटक राज्यात मागील अडीच वर्षात ३२ आत्महत्या झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे ऑनलाइन गेमला आळा बसवण्यासाठी आता सरकाराने ठोस पाउल उचलले आहे. सरकारने विचार विनिमय करून हा लोकहितासाठी कायदा केला आहे. ऑनलाइन गेमिंग वेबसाइट्समधून मिळणारे कर उत्पन्न लाथाडून लोकांचे आर्थिक आणि मानसिक कल्याण हा पर्याय सरकारने निवडल्याचे दिसून येते. 

 -सुरेश मंत्री. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...