कोरोना महामारीने अर्थव्यवस्था तर चौपट केली आहेच सोबत मानवी जीवनावर याचा वाईट प्रभाव पडला आहे. मानवी मुल्यं संकटात आहेत. या क्रूर विषाणूमुळे जगातील शिक्षण व्यवस्थाही जणू कोलमडून गेली आहे. अध्ययन-अध्यापनाच कार्य ठप्प झाल आहे. महाराष्ट्रात जून मध्ये नविन शैक्षणिक सत्राला सूरूवात तर झाली आहे मात्र शिक्षणाची मंदिरे बंदच आहेत. मग यावर पर्याय शोधण्यासाठी शिक्षण तज्ञांमध्ये विचारमंथन सुरू आहे. यावर एकच पर्याय सूचविला जात आहे तो म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचा. आज विदयापिठ,शाळा,महाविदयालयांमार्फत झूम,गूगल मीट,वेबऐक्स,माईक्रोसॉफ्ट टीम सारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग विदयार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी केला जात आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, हा उपाय खरंच सर्वसमावेशक आहे का? यावर विचार मंथन करणारा हा लेख.
एका अनुमानानुसार भारतात जवळपास २५ कोटी शालेय विदयार्थी आहेत.तर महाविदयालयात आणि उच्च शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांची संख्या जवळपास ७ ते ८ कोटी आहे. एकूण मिळुन ३२ ते ३३ कोटी विदयार्थी आहेत. ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या बरोबर आहे. कोरोनाने या ३३ कोटी विदयार्थ्यांच्या भविष्यावर खूप वाईट प्रभाव टाकला आहे. एकूण शिक्षण व्यवस्थाच कोलमडली आहे.जवळपास अडीच महिन्यांपासून हे विदयार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत. ते आपआपल्या घरात कैद आहेत. यावर पर्याय शोधण्यासाठी चर्चासत्रे सूरू आहेत.सदयस्थितीत एकच पर्याय सुचविला जात आहे तो ऑनलाईन अथवा ऑफलाईन शिक्षणाचा. वर उल्लेख केलेले कॉन्फ्रेंसिंग प्लॅटफॉर्म आणि व्हॉटस अॅप सारख्या माध्यमांचा उपयोग करून या विदयार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ऑनलाईन शिक्षण वर्गातील शिक्षणाची बरोबरी करू शकते? हा पर्याय भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीला अनुकुल आहे? निश्चितच याच उत्तर शोधल असता ते सकारात्मक मिळत नाही.
भारतीय परंपरेच्या नुसार समानता,बंधुता, स्वतंत्रता यासारखी मूल्ये विदयार्थ्यात रूजवुन त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास करणे,त्यांना भविष्यातील जबाबदार नागरिक बनवणे,चारित्र्यसंपन्न बनवणे सोबत त्यांच्या ज्ञानाचा उत्तरोत्तर विकास करणे हा शिक्षणाचा मूळ उद्देश असला पाहिजे. हा उद्देश शिक्षक आणि विदयार्थ्यांच्या संबंधातून साध्य होतो. हजारो वर्षांपासून वर्गात चालणा-या अध्ययन-अध्यापनाचा उद्देश विदयार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानाचे डोस पाजणे हा राहिलेला नाही. वर्गातील शिक्षणात एकमेकांसोबत जगण्याची कला,एकमेकांची मदत करण्याची प्रवृत्ती हळू-हळू विकसित होत असते. सामुहिकतेचा भाव सुद्धा हळू-हळू येथूनच विकसित होत असतो. एक-दूस-यांच्या विचारांचा सन्मान करणेही आपण येथूनच शिकतो. वर्गातील शिक्षणात असणारी गुरू-शिष्य परंपरेत एक वेगळाच आनंद असतो. ऑनलाईन शिक्षण पद्धत मात्र हे उद्देश पूर्ण करण्यात अयशस्वी आहे. ही व्यवस्था आपल्या मूळ उद्देशांपासून खूप दूर घेवून जाणारी आहे. ही अशी व्यवस्था आहे ज्यात केवळ आपल्याला काही प्रमाणात पुस्तकी अथवा तांत्रिकी ज्ञान तर मिळेलच मात्र हे ज्ञान आत्मसात करून त्याचे नेमके करायचे काय? हे विदयार्थ्याला समजणार नाही.
फक्त शिक्षणच नाही तर विदयार्थी जीवनात केलेल्या अनेक कृती आपल्या भावी जीवनावर प्रभाव टाकत असतात.विदयार्थी जीवनातील या कृतींमुळेच आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास होत असतो. वर्ग आणि वर्गाबाहेरील गट चर्चा,वाद-विवाद आपल्या व्यक्तीमत्व निर्मीतीत महत्वाची भूमीका निभावतात. ऑनलाईन शिक्षण आपल्याला या सा-यांपासून वंचित ठेवते. व्यक्तीमत्व विकासातील ही कमी आपल्याला कोठे नेवून सोडील हे सांगता येत नाही. विद्येने विनय,विनयाने योग्यता,योग्यतेने धन,धनाने धर्म आणि धर्माचे पालन केल्याने सुखाची प्राप्ती होते असा आपला विद्येच्या बाबतीत विचार आहे. ईथे धर्माचा संबंध पुजा-पाठाशी कदापी नाही. धर्माचा अर्थ समाज कल्याण आहे. याचाच अर्थ आपल्या शिक्षणाचा अंतीम उद्देश हा समाजाचे कल्याण असला पाहिजे. या उद्देश पूर्तीत अगोदरच कमतरता आहे,ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे तर या उद्देशाची पाळेमुळेच नष्ट होतील. जर व्यक्तीत सहअस्तीत्व,सामूहिकता आणि सहिष्णुता ईत्यादी योग्य प्रकारे विकसित झाली नाही तर समाज भलेही भौतीक स्तरावर संपन्न होईल मात्र त्यात अनेक विसंगती राहतील ज्या सामाजिक समस्यांना जन्म देतील. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत या सर्व सामाजिक गुणांना विकसित करण्याची क्षमता नच्या बरोबर आहे.
वरिल सर्व तर वैचारिक गोष्टी झाल्या आता आपण ऑनलाईन शिक्षणाची व्याव्हारिकता तपासून पाहू या. भारतात मोठया प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे. असे किती विदयार्थी आहेत ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी तांत्रिक साधने आहेत? यात अशे मोठया संख्येने आहेत ज्यांच्याकडे ही साधने असुनसुद्धा घरात एकांताचा अभाव आहे. टिव्हीचा गोंगाट,स्वयंपाक घरातील आवाज सर्वांचा त्यांना सामना करावा लागतो. अशी खूप कमी घरे आहेत ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी साधनेही आहेत आणि वातावरणही. हे ज्ञानाच्या मार्गात मोठा भेदभाव निर्माण करणार आहे. खरंतर अशाप्रकारचा भेदभाव अगोदरच उपलब्ध आहे मात्र याची व्याप्ती ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे आणखीनच वाढेल जो सामाजिक संतुलनासाठी खूप घातक आहे.
अगदी छोटयाश्या कालखंडात ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणामही समोर येत आहेत.मुलांचे ऑनलाईन वर्ग ४ते ५ तास चालवण्यात येत आहेत. याशिवाय मुलांना गृहपाठही दिला जात आहे. एकूण विदयार्थी आणि शिक्षक दोघे मिळून ८ तास ऑनलाईन राहत आहेत. हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्थितींसाठी घातक आहे. लहान मुलांसाठी तर खूपच घातक. मुलांमध्ये यामुळे डोळ्यावर परिणाम आणि चिडचिडेपणा निर्माण होत आहे. काही मुलात मानसिक आजार निर्माण होत आहेत. या ऑनलाईन व्यवस्थेमुळे मुलात एकलकोंडेपणा निर्माण होत आहे.एकूण पाहिल तर ऑनलाईन शिक्षण हा शालेय शिक्षणाला पर्याय बनताना दिसत नाही.यावर नव्याने विचार करण्याची गरज आहे.
-सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा