एकीकडे आपले नेते पर्यावरणावर आधारित खूप छान भाषण
देतात.वृक्षारोपण कार्यक्रमाला हजर राहतात.दूसरीकडे जंगलाचे प्रमाण कमी होत चालले आहे.पर्यावरणाच्या
बाबतीत आपल्यात एवढी जागरूकता आली आहे की,आपण पर्यावरण रक्षण म्हणून कोरफडीचे झाड लावत आहोत.शाळांमध्ये पर्यावरणावर
आधारित अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.यामुळे चित्रकलेमधील स्पर्धा वाढली
आहे.पर्यावरणावरिल आधारित संकटाने आपली सांस्कृतीक वाढ निश्चितच झाली आहे मात्र
पर्यावरणावरिल संकट निश्चितच दूर झालेले नाही.
काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी
ऐकली किंवा वाचली असेल.अंटार्क्टिका मधील लार्सन सी आईस शेल्फ हा प्रचंड हिमखंड मुख्यभूमी
पासून वेगळा झाला आहे.शेल्फ हिमखंडाच्या त्या भागाला म्हणतात जो पाण्यावर
तरंगतो.या घटनेमुळे जगभरातील शास्त्रज्ञ चिंतीत झाले आहेत.या हिमखंडाची लांबी ५८००
वर्ग किलोमीटर आहे.यात दोन दिल्ली शहर सामावू शकतात.जो हिमखंड वेगळा झाला आहे तो
किना-यापेक्षा ११०० फुट मोठा आहे.हे आईस शेल्फ हजारो वर्ष जूने आहेत.हा हिमखंड का
वेगळा झाला हे निश्चित सांगता येत नाही.मात्र या मागे जागतिक तापमानात होत चाललेली
वाढ हे कारण असू शकते.जगाच्या इतिहासातील हिमखंड वेगळा होण्याची ही तीसरी मोठी
घटना आहे.अशा घटनांमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होते. अंटार्कटिकावरिल बर्फ
या कारणाने आत्तापर्यंत बराच वितळला आहे.जगातील सर्व बर्फ वितळण्यास पाच हजार
वर्षे लागतील.यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत २१६ फुटांनी वाढ होईल.सर्वात लक्षात
घेण्याजोगी गोष्ट म्हणजे जगातील ४० टक्के लोकसंख्या समुद्रकिनारी राहते.
प्रचंड हिमखंड मुख्य
भागापासून वेगळा होण्याच्या या घटनेचे पर्यावरणावर दूष्परिणाम होणार आहेत.लार्सन ए
आणि लार्सन बी हे असे या हिमपर्वताचे दोन भाग यापूर्वीच स्खलित झाले
आहेत.हिमस्खलानाच्या या घटना अनुक्रमे १९९५,२००२ मध्ये झाल्या होत्या.हे हिमखंड आता पूर्ण नष्ट झाले आहेत.या तिन्ही घटना
केवळ २२ वर्षात झाल्या आहेत याची आपण गांभिर्याने दखल घेतली पाहिजे.
हिमालयातील ग्लेशियर वितळत
आहेत. ग्लेशियरच्या बर्फाचा ९६ टक्के हिस्सा अंटार्कटिका मध्ये आहे.त्यानंतर १२
टक्के भाग आर्किटिक मधिल ग्रीनलँडवर आहे.या नंतर सर्वात जास्त ग्लेशियर हिमालयात
आहे म्हणूनच याला पृथ्वीचा तीसरा ध्रुव म्हणतात.गंगोत्री सर्वात मोठया ग्लेशियरांपैकी
एक आहे.ज्यातून निघणा-या पाण्यामुळे उत्तर भारतातील ५० कोटी लोकांची तहान
भागते.२००८ पासून २०१६ पर्यंत झालेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे की,हे ग्लेशियर ११ मीटर मागे हटले आहेत.एका
अभ्यासातून असे दिसून आले आहे की,१८१७ पासून आजपर्यंत हा
ग्लेशियर ३ किमी ने मागे हटला आहे.सर्वात जास्त चिंतेची बाब ही आहे की,तीस किमी लांबी असलेल्या या ग्लेशियरवरिल बर्फाची जाडी कमी होत आहे.ध्रुवीय
प्रदेशातील बर्फ वितळून समुद्र पातळीत अशाच प्रकारे वाढ होत राहिली तर भारतावर
याचा निश्चित परिणाम होणार आहे.अंदमान निकोबार आणि सुंदरबनचा मोठा हिस्सा बंगालच्या
उपसागरात बुडून जाण्याची भिती आहे.तसेच भारताला लाभलेल्या ४,५००
किलो मीटरच्या समुद्रकिना-यालाही धोका होवू शकतो.
ही परिस्थिती केवळ इथेच
नाही.लद्दाख भागातील मानवी हालचालींचा परिणाम ग्लेशियरांवर दिसत आहे.खास करून
लेहला पाणी पूरवठा करणारा फूचे ग्लेशियर आखडत चालला आहे.या ग्लेशियरच्या पाण्यामुळे लेहच्या आसपासच्या
भागातील जमीनीतून पाण्याचे कित्येक स्त्रोत निघत असत आता मात्र हे स्त्रोत फार कमी
झाले आहेत.याच कारणामुळे लेह भागाला आता पाणी संकटाला तोंड दयावे लागत आहे.
राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्यूरोच्या
अनूसार २०१४ मध्ये भारतात २०,२०१
भारतीय लोकांचा विविध नैसर्गिक आपत्ती मध्ये मृत्यू झाला.मुंबईसारख्या महानगरात
पावसाळ्यात पाणी तुंबते आता याला पूराचे रूप येत आहे.जणू आता पूर येण्यासाठी नदीची
काहीच गरज नाही.पाऊस आला की शहरातील रस्त्यांवर पाणी तुंबायला
सूरूवात होते आणि पूर येतो.हा पूर निश्चितच नैसर्गिक नाही.हे सर्व होत ते सिमेंट
आणि काँक्रीटच्या मानवनिर्मित जंगलांमुळे.शहर उभा करण्यासाठी आपण नदीच्या नैसर्गिक
मार्गात ढवळाढवळ केल्याचा हा परिणाम आहे.पूर,अर्वषण,वनवा हे शब्द आता जूने झाले आहेत.नैसर्गिक संकट ही परिभाषा जावून आता
आपत्ती नावाची नवीन परिभाषा उदयाला आली आहे.जंगले राहो न राहो,नदया न राहो,तलाव न राहो,पर्यावरण न राहो मात्र आपत्ती
व्यवस्थापन जो पर्यंत आहे चिंतेचे कारण नाही.ही चांगली बाब आहे की, आपत्ती व्यवस्थापन पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत नाही.वन विभाग अशा
जागी आहेत जिथे आता जंगलच नाही.वनांच्या नावावर वन विभागाकडून आता उदयाने उभारली
जात आहेत.उदयाने उभारण्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र उदयान विभाग आहे.वन विभागाला वन
क्षेत्रात वाढ करण्याऐवजी हा उपदव्याप सूचतो आहे.
पर्यावरण संकटाचे एक विशेष आहे की,यासाठी कोणी नैतीक रुपाने जबाबदार राहत नाही
त्यामुळे पर्यावरणाच्या प्रश्नावरून आपण कुणाचा राजीनामा मागू शकत नाहीत.पर्यावरण
संकटामुळे अनेक जीव या पृथ्वीतलावरून नष्ट झाले आहेत.आपली पृथ्वी सहाव्या मास
एक्सटिंगशनकडे वाटचाल करत आहे. मास एक्सटिंगशन म्हणजे अशा परिस्थितीचे बनने ज्यात
मोठया संख्येत जीव-जंतूंच्या प्रजाती कायमच्या नष्ट होतात.एका संशोधनानूसार असंख्य
अशे जीव-जंतू जे आपल्या सहज दृष्टीस पडतात तेही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.ही
बाब निश्चितच चिंताजनक आहे.पूर्वी जीव-जंतू लुप्त होण्यासाठी लाखो वर्षे लागत असत
आता काही वर्षातच जीव-जंतू लुप्त होवू लागले आहेत.पृथ्वीवर जितकेही जीव-जंतू होते
त्याचा अर्धा भाग पृथ्वीवरून लुप्त झाला आहे.
आपल्याला डायनोसॉर बद्दल
माहित आहेच.लाखो वर्षापूर्वी याच्या अनेक प्रजाती पृथ्वीतलावर होत्या.साढे सहा अरब
वर्षांपूर्वी जेंव्हा एक ऐस्टेरॉइड पृथ्वीला धडकला तेंव्हा अर्धे सजीव नष्ट झाले
होते.यात डायनोसॉरही कायमचे नष्ट झाले.आता आपली मुले प्लॅस्टीकच्या डायनोसॉर सोबत
खेळतात.नैसर्गिकरित्या सजीव लुप्त होत असतात मात्र याचा वेग खूप कमी असतो.प्रत्येक
वर्षी एक ते पाच सजीव लुप्त होत राहिले मात्र नजिकच्या काही वर्षात प्रतीवर्ष एक
हजारापासून दहा हजारांपर्यंत जीव-जंतू कायमचा निरोप घेत आहेत.
भारतातून आशियाई चित्ता कायमचा नष्ट झाला आहे.जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा फक्त तीन नर चित्ता छत्तीसगढ मध्ये होते.या चित्त्यांची तेथील राजा रामानुज प्रताप सिंग यांनी हत्या केली.या राजेसाहेबांना ११०० वाघांची शिकार करण्याचा गौरव प्राप्त आहे.मागील सरकारने नामीबियाहून चित्ता आयात करण्याचा प्रयत्न केला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली.
मॉरिशियस बेटांवर आढळणारा डोडो नावाचा पक्षी आता आपण केवळ
चित्रातच पाहू शकतो.रूचकर मांस आणि सुंदर पिसांमुळे पर्यटकांची मागणी पूर्ण
करण्यासाठी डोडो पक्षांची शिकार होत राहिली.परिणाम आपल्या समोर आहे.१८७५ ते १९१५
च्या दरम्यान जवळपास दोन लाख लांडगे,दिढ लाख बिबटयांची शिकार करण्यात आली.१९३५ पर्यंत बिहारच्या दरभंगामध्ये
गुलाबी डोक्यांची बदके होती मात्र यानंतर ती कधीच दिसली नाहीत.वाघ ही कदाचित नष्ट
झाले असते मात्र त्यांना वाचवण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न झाले त्याचे सकारात्मक
परिणाम दिसून येत आहेत.वाघांची संख्या वाढत आहे.
भारतात विविध प्रकारचे
राष्ट्रीय उदयान आणि अभयारण्य आहेत.यांच्यात आता काय बदल होत आहे हे आपल्याला
माहित नाही.काही अभयारण्यांना मिळणारा निधीही वेळेवर मिळत नाही आणि जो मिळतो आहे
तो खूप कमी आहे.
१९६९ मध्ये माळढोक पक्षांची प्रथम गणती करण्यात आली.तेंव्हा यांची संख्या १२६० होती.आता हा पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.जवळपास १०० च्या आसपास माळढोक आता शिल्लक राहिले आहेत.१९९० नंतर आत्तापर्यंत विकासाच्या नावावर २५० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचे जंगल नष्ट करण्यात आले आहे.हे उघड आहे की,यातील जीव-जंतूंचे घर उजाडले असेल.अनेक वनस्पती सुद्धा नष्ट झाल्या असतील.
चंबळ
मध्ये मगरी आढळतात.या मगरी २२ फुट लांबीच्या असूनही लाजाळू असतात.तस्करांनी यांची
शिकार करून पर्स आणि बुट बनवून दिले मात्र जेंव्हा या नष्ट होवू लागल्या तेंव्हा
यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला.मात्र या मगरींचा जो नैसर्गिक अधिवास आहे त्याचा ९०
टक्के भाग आता नष्ट झाला आहे.
आपण ज्या जीव-जंतूंना
देवी-देवतांचा सोबती म्हणून पूजतो त्यांनाही आपण वाचवू शकत नाहीत.हत्ती सुद्धा
समाप्त होतील का?ओरीसा मधील ही
घटना आहे.लहान हत्तींची आई लक्ष्मी जेवढी आपल्या पिल्लांची काळजी घेते तेवढीच मानवी
मुलांची.जंगले नष्ट झाल्याने जंगली पशू मानवी वस्त्यांकडे येत आहेत.माणुस आहे की,त्याला घेरून मारून टाकतो.सगळे गावकरी लाठया-काठया घेवून त्याच्या मागे
लागतात.या लक्ष्मीला लोक त्रास देतात आणि जंगलाकडे पिटाळतात.या हत्तीनीच घर हिरावल
गेल आहे याच कुणाला काहीच देणं-घेणं नाही.विकासाच्या नावावर जंगल नष्ट करण्यात आली
तरिही देशातील २४ टक्के शेतकरी दारिद्रय रेषेखाली आहेत.काय रेषेखाली आणि रेषेच्या
वर.
आपण रस्ते अपघातात होणा-या
मृत्यूंची चिंता करतो.दर वर्षी जवळपास सव्वा लाख लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात
होतो याची आपल्याला चिंता आहे.मात्र दरवर्षी राष्ट्रीय अभयारण्यातून किंवा त्यालगत
जाणा-या रस्त्यांमुळे हजारो प्राण्यांचा मृत्यू होतो याची चिंता कोण करणार?माणसासारखा दूसरा हावरट प्राणी या
पृथ्वीतलावर नाही.निसर्ग मानवाच्या गरजा पूर्ण करू शकतो मात्र हाव नाही.हे
जीव-जंतू आहेत म्हणून पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे हे माणसाने लक्षात ठेवायला
हवं.
-सुरेश मंत्री




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा