मुख्य सामग्रीवर वगळा

काँग्रेसचे विधान लज्जास्पद

काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या अल्पसंख्यांक अधिवेशनात महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी म्हटले की,जर २०१९ मध्ये काँग्रेस सत्तेत आली तर तीन तलाक कायदा रद्द केला जाईल.त्यांचे हे विधान ऐकूण खूप वाईट वाटले की,त्या स्वत: एक महिला असून सुद्धा त्यांनी इस्लामच्या नावावर महिलांच्या अधिकारांच हनन करणा-या मुल्लांसारख विधान का बरं केल असेल?विशेष म्हणजे या अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी स्वत: हजर होते.राजकारण आपल्या जागी आहे मात्र केवळ मतांसाठी एका धर्माच्या महिलांच वर्षानुवर्षे होत असलेल शोषण रोखणारा कायदाच रद्द करण्याची गोष्ट करणे न्याय संगत कस होईल?निश्चितच मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या टोकावर पोहचून मुस्लिम पुरुषांना स्वत:कडे वळविण्यासाठी काँग्रेसने परत एकदा राजकारणाच्या पटावर खूप खालच्या थरातील डाव खेळला आहे.
पाकिस्तान सारख्या कट्टर मुस्लिम देशात तीन तलाकवर कित्येक वर्षांपूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.हे आपले दुर्भाग्य आहे की,भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात एक राष्ट्रीय पक्ष या गोष्टीवर मत मागत आहे की,तो मुस्लिम महिलांच्या या शोषणाच्या पद्धतीवर लागलेली कायद्याने बंदी हटवेल म्हणजेच पुरूषांना परत महिलांच शोषण करण्याची संधी उपलब्ध करून देईल.विशेष बाब ही आहे की,मंदीरात प्रवेश मिळावा म्हणून मुस्लिम महिलांना उभा करून प्रदर्शन करणारे कथित महिलावादी काँग्रेसच्या या भूमिकेबाबतीत मात्र मौन बाळगून आहेत.कोणी एक पक्ष उघडपणे महिलांच्या शोषणाचा मार्ग मोकळा करून देण्याच वचन देत आहे याचा त्यांना काहीच फरक पडत नाही.
अल्जीरिया,ईरान,मोरक्को,कतार,युएई,सायप्रस,जॉर्डन सारख्या देशातही तीन तलाकवर बंदी आहे.सीरीयामध्ये १९५३ मध्येच हा कायदा बनला होता की,केवळ न्यायाधिशांसमोरच तीन तलाकला वैध मानले जाईल.इराक मध्ये पर्सनल स्टेटस लॉ अंतर्गत तीन वेळा तलाक म्हटल्यावर फक्त एक वेळाच तलाक समजला जातो.बांग्लादेशातही तीन तलाकवर बंदी आहे.सुडान आणि श्रीलंका सारख्या देशातही मुस्लिमांसाठी तीन तलाक संबंधी आदर्श कायदे बनलेले आहेत.अफगानिस्तानमध्ये एकसोबत तीन वेळा तलाक उच्चारून तलाक घेणे बेकायदेशीर आहे.इंडोनेशियात दूस-या लग्नासाठी आणि तलाक देण्यासाठी धार्मिक न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.अल्जीरियामध्ये तलाकच्या सर्व प्रकरणांचा न्यायालयाद्वारेच निपटारा केला जातो.तुर्कीमध्ये एकापेक्षा अधिक विवाह केल्यास दोन वर्षांची शिक्षा केली जाते.भारतात मात्र तीन तलाकवर जेंव्हा शिक्षेची गोष्ट केली जाते तेंव्हा पुरूषांच्या तथाकथित अधिकारांचे पुरस्कर्ते उभा टाकतात आणि मतांसाठी राजकीय भाकरी भाजायला लागतात.
तलाक हा असा शब्द आहे जो केवळ हसत्या-खेळत्या कुटुंबाला तोडत नाही तर नात्यातील सौंदर्य सुद्धा नष्ट करतो.भारतात रुढीवादी मुसलमानांच्या एका वर्गाच्या हट्टापायी तीन तलाकचे विष पिवून गप्प बसणा-या हजारो मुस्लिम महिला आहेत.कोणी व्यक्ती मग तो कोणत्याही धर्माचा का असेना त्याचे घटनात्मक अधिकार सारखे आहेत.एका महिलेच्या सन्मान आणि गौरवासोबत कोणत्याही प्रकारची तडजोड होता कामा नये.मात्र जेंव्हा सत्तेच्या लालसेने कोणी राजकीय पक्ष एवढा आंधळा होवून जातो की,त्याचे नेते योग्य आणि अयोग्य यामधिल अंतरच विसरून जातात तेंव्हा आपण कशी अपेक्षा करू शकतो की,अशा पक्षाच्या हाती सत्ता सोपवल्यानंतर देशाच्या अंतिम व्यक्तीचे घटनात्मक अधिकार सुरक्षित राहतील.
पाकिस्तान मध्ये १९६१ पासून,बांग्लादेशमध्ये १९७१ पासून,मिस्त्रमध्ये १९२९ पासून,सुडानमध्ये १९३५ पासून आणि सीरिया मध्ये १९५३ पासून तीन तलाकवर बंदी घालण्यात आली आहे मात्र आपण २०१९ पर्यंत यावर बंदी घालण्याच्या विरोधात उभे आहोत.मी मानतो की,भारतात धार्मिक स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत.तो कुणाचे ते मौलीक अधिकार हिरावून घेवू शकत नाही जे त्याला घटनेने दिले आहेत.जर कोणी अस म्हणत असेल की,तीन तलाकचा मुद्दा सरळ इस्लामशी संबंधित आहे तर याचा सरळ अर्थ असा आहे की,तो इस्लाम आणि कुरान-ए-पाक ला समजत नाही.कुरानमध्ये तलाकच्या तीन पाय-या आहेत.तलाक-ए-रजई,तलाक-ए-बाइन आणि तलाक-ए-मुगल्लजा.कुणाच्यातरी दिशाभूल करण्यावरून वा गैरसमजावरून निर्माण झालेल्या रागात दिलेला तलाक परत घेता येवू शकतो.याचप्रमाणे दूस-या पायरीत दिलेला तलाक सुद्धा वापस घेणे शक्य आहे.
वास्तविकता ही आहे की,तलाक मुस्लिम महिलांच्या मौलिक अधिकारांना मुस्लिम पुरूषांच्या हाती गहाण ठेवून त्यांचे शारीरीक आणि मानसिक शोषणाचे हत्यार बनले आहे,ज्याचा भारतात क्रुरतेने वापर केला जात आहे.काँग्रेसने मात्र या क्रुरतेला योग्य करार देण्याचे वचन देवून हे दाखवून दिले आहे की,ती मतांसाठी कोणत्याही थराला जावू शकते.समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरांविरूद्ध लढणे हे फक्त सामाज सुधारकांचेच काम नाही तर राजकीय पक्षांचे सुद्धा आहे हे केवळ काँग्रेसच नाही तर सर्व राजकीय पक्षांनी लक्षात ठेवायला हवे.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...