विकास म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे यावर फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगात चर्चा होत आहे, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अविकसित आणि विकसित देशांमध्ये राजकिय सत्ता विकासाची नव-नविन स्वप्न जनतेला दाखवत आहेत. विकसनशिल देशांमध्ये ज्या विकासाबद्दल बोलल जात आहे, तो अधिक प्रमाणात आर्थिक बाबींशी जुडलेला आहे. रस्ते, विज, पाणी, शाळा, पक्की घरे, ईस्पीतळ बनवणे, पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गती वाढवणे म्हणजेच विकास होय. समाजाच्या अगदी खालच्या स्तरातील नागरिकांचे जीवनमान उंचावून त्यांना वरच्या स्तरापर्यंत पोहचविणे हा विकासाचा मुळ उद्देश आहे. मात्र प्रश्न हा आहे की,केवळ भौतिक संसाधन मोठया प्रमाणावर उपलब्ध करून देणे हा खरा विकास आहे ? अशा प्रकारच्या भौतीक विकासाला कोणत्याही राज्य अथवा देशाची योग्य दिशेने होणारी वाटचाल म्हणता येईल ?
सगळ्या
नद्या शेवटी समुद्राला जावून मिळतात, हा निसर्गाचा नियम आहे.मानवी जीवनाला गती देण्यासाठी बनवलेला विकास
नावाचा रस्ता जर त्याला शेवटी विनाशाकडे घेवून जाणार असेल तर हे मानवाच्या जीवनाला
न्यायसंगत होईल ? महत्वाची बाब म्हणजे, ज्या देशाची संस्कृती जगात सर्वात श्रेष्ठ मानली जाते, त्या भारतात निवडणूकांवर
कोटयावधी रूपये खर्च होतात, राजकिय लाभासाठी राजकिय पक्षांमार्फत जनतेला मोठ-मोठी वचन दिली जातात
मात्र कोणताही राजकिय पक्ष पर्यावरणासारख्या संवेदनशिल मुद्दयावर गंभीर असलेला
दिसत नाही. जेंव्हाकी आत्ता सर्वात
महत्वाचा मुद्दा पर्यावरण संरक्षण हा आहे. जर
लोकच राहिली नाहीत, तर लोकशाही काय करेल ? जगामध्ये विकासाच्या नव-नविन संकल्पना बनवताना आणि त्या पूर्ण
करण्याचा प्रयत्न करताना भविष्यातील परिस्थितीवर विचार मंथन केले जात आहे ? असा विकास काय कामाचा जो मानव जातीला विनाशाकडे घेवून जाईल, जगाचे आयुष्य कमी करेल ? जगच राहिले नाही तर
साधलेला विकास आपण कुणाला अभिमानाने दाखवू ? हि विडंबना आहे की, सध्या जो कथित विकास
साधला जात आहे त्यामुळेच जगाचे आयुष्य कमी होत चालले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर जे अहवाल सतत येत आहेत, त्यात जागतिक तामपान वाढ होत आहे, ओझोनच्या थरात घट होत आहे, हिमखंड विरघळत आहेत, समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. प्रदुषणाचे प्रमाण वाढत चालले आहे, सजीवांच्या अनेक जाती लुप्त झाल्या आहेत तर काही लुप्त होण्याच्या
मार्गावर आहेत. अनेक मानवनिर्मित
कारणांमुळे जागतिक स्तरावर सजीवांचे अस्तीत्व संकटात आले आहे. जग मात्र या दृष्टीने आजही गंभीरतेने विचार करताना दिसत नाही. पर्यावरण संरक्षणाचे काम औपचारिक स्तरावरच होत आहे. जलवायु आणि पर्यावरणाला घेवून अनेक चर्चा-परिसंवाद होत आहेत मात्र
त्यादृष्टीने वास्तविक काम म्हणावे तसे होताना दिसत नाही. अमेरिकेसारख्या विकसित देशांच या बाबतीतल वागण आश्चर्यचकित आणि निराश
करणार आहे. भारत लवकरच विकसित
देशांच्या पंक्तीत जावून बसेल असा दावा केला जात आहे. जर केवळ भौतिक विकासाचा विचार केला तर अस होताना दिसूही शकत. जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या देशाचे नागरिक मात्र पर्यावरण
संवर्धनाबाबतीत खूप कमी जागरूक असलेले दिसतात.
केंद्र सरकारला नारा द्यावा लागत आहे-जलशक्तीकडून जनशक्ती. सगळ्यांना पक्की घरे,पा णी आणि विज पुरवण्याचे
लक्ष्य लवकरच पूर्ण करण्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. जर जमिनीच्या वर शुद्ध हवा आणि जमिनीखाली पाण्याचा तुटवडा झाला तर हे
लक्ष्य पूर्ण करता येईल का ? स्वतंत्र भारतात आपण वेळीच निसर्गाच्या प्रती संवेदनशिल राहिलो असतो
तर ही वेळ आली नसती. कोणतेही सरकार याप्रती
कितीही संवेदनशिल असले तरी मोठया प्रमाणावर लोकसहभागाशिवाय हा महायज्ञ पूर्ण होणार
नाही.
कुठे पूर तर कुठे दुष्काळाचा सामना करण्यासाठी आपण नदयांची काय
अवस्था केली आहे, हे आपण सर्व जाणतोच. देशभरात तलावावर भराव टाकून मोठ-मोठया ईमारती उभा केल्या जात आहेत. भारतात असंख्य सनातनी लोक अग्नी, हवा, पाणी, धान्य, सूर्य, चंद्र,वृ क्ष या नैसर्गिक संसाधनांची मोठया कृतज्ञतेने पुजा करतात. मग अस नेमक काय झाल की एका शतकात बहुसंख्य लोक आपले संस्कार, आपली संस्कृती विसरले ? आजही घरात हवन केले जाते, तेंव्हा आंब्याची लाकडं, पाने आणि अन्य वनस्पीजन्य
सामग्री शोधताना दिसतात. तांदूळ, डाळी आणि अन्य धान्याची
रांगोळी पुजेला काढली जाते. निसर्गाची
पुजा फक्त कर्मकांडापर्यंत मर्यादित राहून
आपण आपले कर्तव्य हळू-हळू विसरत चाललो आहोत का ? प्राचिन काळापासून
आर्युवेदाचे ज्ञान ठेवणारे भारतीय वृक्षांचे संरक्षण करणे विसरत चालले आहेत. वाढत्या लोकसंख्येसाठी भौतिक विकास साधायचा असेल, रस्ते, लोहमार्ग, शाळा-महाविद्यालयं, दवाखाने, मॉल बनवायचे असतील तर
मोठया प्रमाणावर झाडे तोडावी लागतील हे सत्य नाकारून चालणार नाही. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने याबाबतीत कडक धोरण अवलंबिले असले तरी
मात्र परिस्थिती जेवढी सुधरायला हवी होती तेवढी सुधरलेली नाही.
मग जग वाचवण्यासाठी, सजीवांचे
संरक्षण करण्यासाठी काय करता येईल ? यावर विचार करण्यासाठी आजही वेळ हाती आहे. केवळ प्रसिद्धीसाठी वृक्षारोपण करून चालणार नाही तर त्यांचे संगोपनही
करावे लागेल. सामाजिक जीवनाच्या विविध
स्तरावर यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शालेय, व्यवसाय आणि सेवानिवृत्ती
नंतरचा वेळ अधिकाधिक प्रमाणात पर्यावरणाशी जोडून आपण आपली पर्यावरणाची सामाजिक
परंपरा पुन्हा जीवंत करू शकु.
-सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा