मागिल काही काळात लोकप्रिय झालेल्या चित्रपट मालिका अवेंजर्सचा खलनायक थैनोस विश्वाला वाचवण्यासाठी पृथ्वीवरिल अर्ध्या मानव जातीला नष्ट करतो.थैनोस असे मानतो की,मानवाने पर्यावरण आणि संसाधनांचा नाश करून संपुर्ण विश्वाला धोका निर्माण केला आहे त्यामुळे मानव जातीला समुळ नष्ट केले पाहिजे.या चित्रपटाचे नायक थैनोस विरुद्ध महायुद्ध लढतात आणि शेवटी यशस्वी होतात.मात्र वास्तवात जे होत आहे ते याच्या एकदम उलट आहे.कोण्या थैनोसला आपल्याला नष्ट करण्यासाठी कष्ट करण्याची गरजच नाही कारण या पृथ्वीवर राहणा-या आपण मानवांनी अगोदरच सामुहिक आत्महत्येच्या दिशेने पाऊल टाकलेले आहे.एवढच नाही तर आपण चार अरब वयस्क,तीन अरब बालक आणि युवकांना सुद्धा मृत्युच्या दाढेकडे ओढत नेत आहोत जे या पापात कधीच भागिदार नव्हते.
पर्यावरणाच्या अभ्यासातुन येणा-या जवळपास सर्व संशोधनांतुन असे दिसते की,धोक्याची घंटा सगळीकडुन वाजत आहे आणि आता सर्वांना याचा अंदाज आला आहे की,मानवाच्या स्वार्थ आणि अत्याचारामुळे पृथ्वीची सहनशक्ती आता संपली आहे.जीवनावश्यक हवा आणि पाणी विषारी होत आहे.भुगर्भातील खनिज संपत्तीचे साठे संपत चालले आहेत.जागतीक तापमानात वाढ होत आहे.पृथ्वीचे सुरक्षाकवच असणा-या ओझोनच्या थरात घट होत आहे.महाकाय हिमखंड विरघळत आहे त्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.समुद्र जमिनीला गिळंकृत करण्यासाठी पुढे सरसावत आहे.हवामानाचे चक्र बदलत आहे.कधी पूर तर कधी अवर्षण यांच्या अचानक हल्ल्याने हाहाकार उडत आहे.मानवनिर्मित कारणांमुळे जागतिक स्तरावर सजीवांचे अस्तीत्व संकटात आले आहे.विडंबना ही आहे की,आपण केरळ मधिल पूर आणि दिल्लीतील हवेच्या प्रदुषणाची चार दिवस चर्चा करतो आणि विसरूनही जातो.जगामध्ये विकासाच्या नव-नविन संकल्पना बनवताना आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना भविष्यातील परिस्थितीवर विचार मंथन केले जात आहे?असा विकास काय कामाचा जो मानव जातीला विनाशाकडे घेवून जाईल,जगाचे आयुष्य कमी करेल?जगच राहिले नाही तर साधलेला विकास आपण कुणाला अभिमानाने दाखवू?हि विडंबना आहे की,सध्या जो कथित विकास साधला जात आहे त्यामुळेच जगाचे आयुष्य कमी होत चालले आहे.मात्र महाविनाशाच्या पाऊलांची चाहुल आपण ऐकण्यास नकार देत आहोत.पृथ्वीवरिल लाखो प्राण्यांच्या प्रजातीत एकमेव आपणच आहोत जे स्वत:ला अशाप्रकारे सामुहिक आत्महत्येसाठी तयार करत आहोत.
आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडेच पहा.जलवायु आणि पर्यावरणाला घेवून अनेक चर्चा-परिसंवाद होत आहेत मात्र त्यादृष्टीने वास्तविक काम म्हणावे तसे होताना दिसत नाही. पर्यावरण संरक्षणाचे काम औपचारिक स्तरावरच होत आहे.अमेरिकेसारख्या विकसित देशांच या बाबतीतल वागण आश्चर्यचकित आणि निराश करणार आहे.तिथे आपले नेते या चर्चेत गुंतले आहेत की,पृथ्वीला धोका आहे की नाही?आहे तर काय करायला हव?याची जबाबदारी कोण उचलेल आणि या जबाबदारीपासून स्वत:ला कसे वाचवता येईल?अनेकांना अस वाटत की,हा आपला केवळ भ्रम आहे आणि काही काळ डोळे मिटुन बसल्यानंतर तो दुर होईल.मात्र आशंका अशी आहे की,अस कधीच होणार नाही.मानवाकडे स्वत:ला वाचवण्यासाठी वेळच राहणार नाही आणि महाविनाश आपल दार ठोठावेल.पर्यावरणाच बिघडत संतुलन किती मोठी आपत्ती आणेल हे कोणीच सांगु शकत नाही.होवू शकत की,साधन संपन्न आणि नशीबवान लोक या आपतीपासून स्वत:ला वाचवू शकतील आणि अर्धी मानवजात या आपत्तीने गिळंकृत केली जाईल.मात्र जे वाचतील ते काय करतील?काय विचार करतील?ते या पृथ्वीवरील ओझे कमी झाले म्हणून स्वत:ला आश्वस्त करतील की मृत्यूच्या भयाखाली जगण्यासाठी अभिशापित होतील?कारण ही धरणी कधीच त्यांची आई बनु शकणार नाही.
जर आपल्याला या सामुहिक आत्महत्येपासुन वाचवायच असेल तर झोपेतुन जागाव लागेल.या अनंत ब्रम्हांडात ही छोटीशी पृथ्वी सध्या एका कमजोर नावेसारखी टिकुन आहे.३० वर्षांपूर्वी वायजर नावाच्या यानाने सहा अरब किलोमीटर दुरून सुर्य मालेच्या शेवटच्या टोकावरून मागे वळुन पृथ्वीचा एक फोटो घेतला होता ज्यात पृथ्वी एका धुसर निळ्या बिंदुसारखी आशेच्या किरणावर टिकुन राहिल्यासारखी भासत होती.वैज्ञानिक कार्ल सैगन यांनी त्या क्षणाची आठवण करताना म्हटल होत,आपल्याला वाचवण्यासाठी ईतर कोठुन मदत मिळेल असे या अनंत ब्रम्हांडात कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.त्यांच्या या विधानाला पुन्हा आठवण्याची गरज आज आहे.आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीवरून पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे सजीवांचे अस्तीत्व आहे.असा कोणताही ग्रह नाही जिथे मानव शरण घेवु शकेल.अशात कोणत्याही प्रजातीने जीवनाला निवडल असत.परंतु मानव ?
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा