मुख्य सामग्रीवर वगळा

जीवनाचा खरा आनंद महिलांकडुन शिका

नुकतेच एक संशोधन आले आहे.जे पुरूष महिलांच्या सान्निध्यात राहतात त्यांच्यामधे तणाव आणि नैराश्य कमी निर्माण होते.एवढेच नाही तर ज्या महिला महिलांच्या सान्निध्यात अधिक राहतात त्यांची सुद्धा तणाव आणि नैराश्यासंबंधीची तक्रार कमी असते.याचा अर्थ महिलांच्या सान्निध्यात राहिल्याने तुम्ही स्वत:ला अनेक आजारांपासून वाचवू शकता.असा बिलकुल विचार करू नका की हा केवळ विचार आहे.हे एक वैज्ञानिक सत्य आहे.
गोष्ट ही आहे की,पुरूषांचा मेंदु चौकोनी असतो.जो अनेक खान्यात विभागलेला असतो.एकात काम,दुस-यात आराम,तिस-यात प्रसिद्धी आणि चौथ्यात पैसा.मी इथं चार खाने लिहीली आहेत याचा अर्थ असा नाही की केवळ ही चार खानी असतात.असु शकत,शंभर खाने असतील.पुरूष वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींवर विचार करू शकतात.महिलांचा मेंदु मात्र गोलाकार असतो.थांबा,अस मी म्हणताच आपण मेंदुचा एक्स रे घेवून बसु नका की पाहु कुठे चौकोनी असतो आणि कुठे गोल?भौतीक स्वरूपात महिला आणि पुरूषांचा मेंदु एकसारखाच असतो मात्र महिलांचा मेंदु मी यासाठी गोल म्हणतोय कारण त्यांच्या मेंदुत वेगवेगळया खान्यांच्या सीमा असत नाहीत.एक महिला स्वयंपाक करता-करता मुलांचा गृहपाठ पूर्ण करून घेवु शकते.जेवण करताना घराबद्दल विचार करू शकते.ऑफीस मध्ये काम करत-करत ऑफीस सुटल्यांनर करावयाच्या वैयक्तीक कामांची तयारी करू शकते.ती एकाचवेळी अनेक प्रकारचे विचार करू शकते,काही कराव वाटल तर करू शकते.पण पुरूष नाही,ते एकावेळी एकच काम करू शकतात,जास्त कामे दिली तर वैतागुन जातील.
संशोधनानुसार पुरूष लवकर तणावात येतात,रागात येतात,नैराश्यात येतात आणि लवकर घाबरतात मात्र महिलांसोबत अस होत नाही.त्या तणावात येत नाहीत,नैराश्यात येत नाहीत आणि निसंदेह अनेक वेळा आपल्याला वाटेल की त्या लवकर घाबरून जातात,मात्र सत्य हे आहे की त्या पुरूषांच्या तुलनेत कमी घाबरतात.महिलांच्या मनात जीवनाचा आनंद घेण्याची क्षमता पुरूषांच्या तुलनेत जास्त असते.यामुळेच त्या कोण्या आनंदाच्या क्षणी सहज नृत्य करतात,गुणगुणतात.पुरूष हेच म्हणतात की ते कसे नृत्य करू शकतात?ते नाचण्यासाठी नसतात तर युद्ध करण्यासाठी असतात.
या सर्व गोष्टी मी या ठिकाणी यासाठी मांडत आहे कारण काल संध्याकाळी मी माझ्या एका परिचीताच्या घरी गेलो होतो,जे सध्या एकटे राहत आहेत.त्यांची पत्नी काही दिवसांसाठी बाहेर गेली आहे आणि त्यांनी मला सांगितल होत की ते आजकाल बॅचलर जीवन जगत आहेत.त्यांच बॅचलर जीवन बघण्यासाठीच मी तिथे गेलो होतो.पण मी तिथे गेल्यानंतर बघितल की ते त्यांच्या रूम मध्ये एकदम उदास बसले आहेत.मी विचार केला होता की,चार मित्रांना बोलावुन ते पार्टी करीत असतील,पण अस काहीच नव्हत.त्यांनी सांगितल की,पहिले दोन दिवस त्यांनी पार्टी केली नंतर मात्र लगेच याचा कंटाळा आला.कार्यालयातुन घरी आल की समजत नाही काय कराव?अगोदर जेंव्हा पत्नी काही महिन्यांसाठी चालली होती तेंव्हा मी मनातल्या मनात खूप खुश होतो मात्र आता अस वाटत की तिच्याविना घर खाली-खाली आहे.काहीच व्यवस्थित नाही.मी हा विचार करून हैराण आहे की,ती सुद्धा ऑफीसला जात होती तरी सुद्धा घरातील प्रत्येक कामे व्यवस्थित होत होती.आता सर्व काही अव्यवस्थित झाल आहे.माझा सकाळचा वेळ तर चहा करण्यातच जातो,कसबस धावपळ करित ऑफीसला पोहचतो.तिथच काहीतरी खातो आणि संध्याकाळी घरी येताच वाटत की,करायला काहीच नाही.दोन दिवस पार्टी केल्यानंतर वाटल की हे काय काम आहे?
मुलं अगोदरच शिक्षणासाठी बाहेर आहेत आता पत्नी गेली आहे.ती परतेल दोन महिन्यांनंतरच.पूर्वी महिला महिनोन महिने माहेरी राहत तेंव्हा पुरूष कसे राहत असतील?हा विचार माझ्या मनात आला.मग लक्षात आल की,पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती.पत्नी जरी माहेरी गेली तरी घरात आई,काकु असत,बहिणी येत-जात असत.आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एकतर पत्नी माहेरी जातच नाही आणि ट्रेनिंगसाठी गेली तर घर अगदी खायला उठत.ते सांगत होते,‘मी सुद्धा कित्येक वेळा बाहेर जातो.माझी पत्नी त्यावेळी एकटीच राहते.मात्र तिने कधीच याची तक्रार केली नाही की ती एकटी आहे.तिला घर खायला उठलय.असं का आणि कसे?’
गोष्ट माझ्याही लक्षात आली नाही.माझ्यासोबतही असच होत.मी माझ्या पत्नीला फोन करून विचारल की,अस का होत तर ती हसु लागली.तिने सांगितल की,महिलेच्या सोबत नेहमी तिचा संसार असतो.ती एकटी असली तरी कधीच एकटी असत नाही.ती स्वयंपाक बनवेल,घर व्यवस्थित करेल आणि नौकरीला जात असेल तर विचारूच नका.महिला कधीच एकटया असत नाहीत,एकटेपणा हा पुरूषांचा आजार आहे.त्यांना काही करायच नसेल,तेंव्हा सुद्धा त्या बरच काही करतात.
मी तिला म्हटल की,माझे परिचित खूप उदास आहेत.तणावात आहेत.यावर पत्नीने सांगितल त्यांना सांगा की,घरातील कुंडीत पाणी टाका.कुणी नसेल तर रोपांशी गप्पा मारा.एखादी नविन रेसेपी वाचा.त्याप्रमाणे बनवुन स्वत: खा आणि मित्रांनाही खावु घाला.ही काही पार्टी नाही की,पिज्जा ऑडर केला आणि खावुन टाकला.काहीतरी नवनिर्मिती करा,पण करणार नाहीत.करूच शकत नाहीत.कारण मेंदु एकाच दिशेत चलतो.ऑफिस आणि बस ऑफिस.अशात घरात एकटेपणा जाणवणारच.त्यांना सांगा की,जीवनाचा आनंद घेणे महिलांपासुन शिका.
मी मात्र त्या परिचितांना काही म्हटल नाही.गुपचुप परत आलो.मात्र मनातल्या मनत विचार आला की,गोष्ट तर खरी आहे.मी दर आठवडयाला सुट्टीच्या दिवशी बाहेर निघुन जातो,पत्नी मात्र आरामात घरात एकटी राहते.मला मात्र कुणी एक दिवस घरात एकट रहायला सांगितल तर मी सर्व कामे उलटी-पुलटी करेन.दूध उकळताना उतु जाईल,सर्व खोल्यांमधिल दिवे सुरूच राहतील.कुंडीतील रोपांना पाणी घालायच राहुन जाईल.घराचा एका दिवसात उकीरडा होईल.माझी पत्नी मात्र नौकरी करण्यासोबत आपल्या गोल मेंदुने ईतर सर्व कामे अगदी व्यवस्थित करत आली आहे.मी विचार केला आहे,की जगण्याचा आनंद कसा घ्यायचा हे महिलांकडुन शिकायला हव.जीवनाचा खरा आनंद महिलाच घेतात,पुरूष नाही.
-सुरेश मंत्री. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...