मुख्य सामग्रीवर वगळा

चंद्र आहे साक्षीला


सुमारे ५० वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते.तो दिवस होता २१ जुलै १९६९.नील आर्मस्ट्रांग याने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर म्हटले होते ‘एका मानवाचे हे छोटेसे पाऊल मानतेसाठीची एक उंच उडी आहे.’अपोलोमिशन अंतर्गत १९६९ ते ११९७२ एकूण नऊ यान चंद्राकडे पाठविले गेले आणि सहा वेळा मानवाला चंद्रावर उतरविले गेले.अपोलो मिशन संपल्यानंतर तीन दशकांपर्यंत चंद्र मोहिमेबाबतीत एक प्रकारचा निरूत्साह जगात दिसून आला.मात्र आता चंद्राचे आकर्षण परत वाढत आहे.मागिल वर्ष चंद्र मोहिमांबाबतीत खूप विशेष राहिले.जानेवारी २०१९ मध्ये चीनी अंतराळयान चांग ई-४ ने एका छोटया स्वयंचलित रोवर सोबत चंद्रावर उतरून इतिहास रचला.दूसरीकडे मागिल वर्षातच भारताने आपल्या महत्वाकांक्षी चंद्र मोहिमेअंतर्गत चंद्रयान-२ ला चंद्राकडे पाठविले मात्र यात अपेक्षित यश मिळाले नाही.मागिल वर्षात ईस्त्राईलने सुद्धा एक छोटा लैंडर त्याच्याकडे पाठवला होता मात्र तोही दुर्घटनाग्रस्त झाला होता.
आता परत अमेरिकेने आपले लक्ष चंद्राकडे केंद्रीत केले आहे.२०२३-२४ पर्यंत चंद्रावर मानवाला पाठवण्याच्या मिशनला घेवून अमेरिकेने कामाला वेग दिला आहे.अंतराळात आपल्या सर्वात जवळचा शेजारी असलेल्या चंद्राच्या बाबतीत प्राचिन काळापासून मानवात जिज्ञासा राहिली आहे.२० व्या शतकाच्या पूर्वाधापर्यंत तो केवळ दुर्बीणीद्वारे त्याचे चित्र घेवून आपली जिज्ञासा शांत करायचा.इ.स.१९५९ मध्ये प्रथमच रशियाचे (तत्कालिन सोव्हियत संघ) अंतराळ यान ‘लूना-१’चंद्राच्या जवळ पोहचण्यात यशस्वी झाले.यानंतर रशियाचेच ‘लूना-२’ यान चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले.सोव्हियत संघाने १९५९ ते १९६६ पर्यंत एकामागुन एक कित्येक मानवविरहित यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविले.
दुस-या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हियत संघादरम्यान शितयुद्ध शिगेला पोहचले होते त्यावेळी १२ एप्रिल १९६१ ला सोव्हियत संघाने युरी गागारिनला अंतराळात पाठवून अमेरिकेच्या पूढे बाजी मारली.साहजिकच यामुळे अमेरीकेच्या अहंकार आणि गौरवाला कुठे ना कुठेतरी ठेस पहुचली होती.अमेरीकेनेही यानंतर अंतराळाच्या क्षेत्रात आपली श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी आपला प्रचंड पैसा आणि वैज्ञानिक संसाधनं पणाला लावली.शेवटी नील आर्मस्ट्रांगने चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून मान मिळवला.अमेरिकेच्या अपोलो मिशन अंतर्गत १२ लोकांनी चंद्रावर पाऊल ठेवण्याचा सन्मान मिळवला तर १० लोकांनी चंद्राला फेरी मारण्याचा.हे मिशन खूप खर्चिक असल्याने अपोलो-१७ नंतर थांबण्यात आले.तेंव्हापासून जवळपास पन्नास वर्षे अंतराळ कार्यक्रमांना मंजुरी देणा-यांनी चंद्राकडे दुर्लक्ष केले.मात्र आता ज्या प्रकारे चंद्रावर पहुचण्यासाठी जगातील विविध देशात स्पर्धा लागली आहे त्यावरून म्हणता येईल ‘चंद्र पुन्हा निघाला आहे.’
भारताच्या इस्त्रोला चंद्रयान-२ मध्ये अगदी शेवटच्या क्षणी अपयश मिळाल्यानंतर चंद्रयान-३ साठी अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.चीन २०२४ पर्यंत आपले अंतराळ यात्री चंद्रावर उतरविण्याच्या कामाला लागला आहे.रशिया २०३० पर्यंत चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे.एवढच नाही तर कित्येक खाजगी कंपन्या आपले उपकरण पहुचवण्यासाठी आणि प्रयोगांना गती देण्याच्या उद्देशाने नासाचे टेंडर मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत.याचे मुख्य कारण आहे चंद्राचे पृथ्वीच्या जवळ असणे.तिथपर्यंत पहुचण्यासाठी तीन लाख चौ-याऐंशी किलोमीटरचे अंतर केवळ तीन दिवसात पूर्ण करता येवू शकते.चंद्रावरून पृथ्वीवर रेडिओ संपर्क स्थापित करण्यासाठी केवळ एक ते दोन सेकंदचा वेळ लागतो.प्रश्न हा आहे की,मागिल ५० वर्षात कोणत्याही देशाने चंद्रावर उतरण्यासाठी कोणताही मोठा प्रयत्न केला नाही,मग अचानक असे काय झाले ज्यामुळे त्यांना पुन्हा तिथे जाण्याची गरज भासु लागली?
यासाठी वेगवेगळ्या देशांकडे आपापली कारणे आहेत.भारताच्या बाबतीत म्हटल तर चंद्रमोहिमेच्या स्वरूपात स्वत:ची तंत्रज्ञानातील उत्कृष्टता दाखवण्याची सुवर्णसंधी असेल.चीन तंत्रज्ञानाच्या स्तरावर स्वत:ला ताकतवर दाखवुन महाशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करू पाहत आहे.अमेरीकेसाठी चंद्रावर परत एकदा पोहचणे हा केवळ मंगळावर पोहचण्याचा पहिला टप्पा आहे.चंद्रावर उतरण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेचे प्रमुख कारण आहे तिथे पाणी असण्याची  शक्यता.अलीकडच्या काही संशोधनातुन चंद्रावरील ध्रुवीय प्रदेशात बर्फ असण्याची शंक्यता व्यक्त करण्यात आली आहे.हा बर्फ अंतराळ यात्रींसाठी पाण्याचा दुर्मिळ स्त्रोत तर असेलच सोबत सौर उर्जेच्या साहयाने पाण्याचे विघटन करून हायड्रोजन आणि ऑक्सीजन वेगळा करता येईल. ऑक्सीजनचा उपयोग श्वसनासाठी तर हायड्रोजनचा उपयोग अग्नीबाणाचे इंधन म्हणून करता येईल.चंद्रावर भविष्यात एक इंधन स्थानक उभारले जावू शकते जेणेकरून तिथे थांबून अंतराळ यानात इंधन भरून सौर मंडळातील दूरवरच्या यात्रा करण्यासाठी पूढे जाता येईल.
विविध देशांच्या सरकारांची नजर चंद्रावरिल सोने,चांदी,टाइटेनियम सारख्या खजिन्यावर आहे मात्र शास्त्रज्ञांची नजर तेथिल हेलियम-३ च्या साठयावर आहे. हेलियम-३ मुळे पृथ्वीवरिल उर्जेची गरज पुर्ण तर होईलच सोबत याच्या व्यापारातून अमाप संपत्ती सुद्धा मिळेल.भविष्यात अणूच्या केंद्रकिय विखंडनात एक स्वच्छ इंधन म्हणून याचा वापर करता येईल.हे स्पष्ट आहे की,या दशकात चंद्र मानवी गतीविधींचे केंद्र बनेल कारण तिथे उत्खननापासून मानवी वस्ती आणि हॉटेल बनवण्याच्या योजनांवर काम सुरू आहे.बघू या चंद्राबाबतीतच्या या स्पर्धेतून काय निष्पन्न होते,चंद्र आहेच साक्षीला.
-सुरेश मंत्री 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...