मुख्य सामग्रीवर वगळा

अर्थसंकल्पापूढील आव्हाने

अर्थमंत्री निर्मला सीतारमण  मोदी सरकारची दुस-यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतरचा दुसरा अर्थसंकल्प लोकसभेत उद्या सादर करणार आहेत.या अर्थसंकल्पाकडे अर्थातच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत मोठा विजय मिळवून परत सत्तेत आलेल्या मोदी सरकारसाठी आज पर्यंतचा सर्वात कठिण आणि आव्हानात्मक असा अर्थसंकल्प म्हणून याकडे पाहिले जात आहे.मोदी सरकार अशा वेळी अर्थसंकल्प सादर करणार आहे जेंव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदीकडे असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे.सर्व आकडेवारीही याकडेच संकेत करित आहे.अशात मोदी सरकारपूढे कोटयावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आहेच सोबत ढासळत चाललेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी सुद्धा.
सध्या उत्पादनापासून मागणीपर्यंत मागील दोन दशकातील सर्वात सुस्तीचा काळ आहे.काही जाणकार सध्याच्या अवस्थेला नव्वदच्या दशकातील मंदीशी जोडत आहेत.तसतर सरकारने या मंदीला अल्पकालीन म्हटले होते मात्र ही गोष्ट खरी ठरली नाही आणि परिस्थिती दिवसेंदिवस खराबच होत गेली.अशा कठिण परिस्थितीत विविध सर्व्हेक्षणातुन आलेल्या आकडेवारीने एनडीए सरकारची चिंता आणखीनच वाढली आहे.आजही लोक मोदी सरकारसोबत आहेत मात्र मागील दोन वर्षात देशाच्या आर्थिक विकासाच्या दरात ज्या पद्धतीने घसरण झाली आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षात जे लोक मोदी सरकार बाबत सकारात्मक होते,तेही सरकारवर नाराज आहेत.आपले उत्पन्न,वाढत चालेली महागाई आणि सरकारची धोरणं यामुळे सरकारवर नाराज लोकांची संख्या वेगाने वाढली आहे.
अर्थसंकल्पापूर्वी आलेले सर्व आर्थिक सर्व्हे जर पाहिले तर सरकारपूढे दुहेरी आव्हान असलेले दिसते.एकीकडे ग्रामिण भागात शेतक-यांची अवस्था अत्यंत वाईट आहे त्यामुळे ते मोदी सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा बाळगुन आहेत.शहरी मध्यम वर्ग मोदी सरकार सोबत आहे मात्र या साथीच्या बदल्यात त्यांना परत भेट हवी आहे. मध्यम वर्गीयांना आय करात आणखीन दिलासा हवा आहे.तिकडे उदयोगधंदे मागणी वाढण्यासाठीच्या उपायांची अपेक्षा बाळगुन आहेत तर गुंतवणुकदार मोठया घोषणांची.लोकांकडुन सरकारला ज्या सूचना मिळाल्या आहेत त्या वाचल्यानंतर सर्वात मोठी गोष्ट समोर आली ती म्हणजे विविध करात आणखीन सवलीतीची गरज आहे.
                  सरकारला दिलेल्या सुचनांमध्ये खाजगी शाळांमार्फत आकारल्या जाणा-या फीसवर नियंत्रणासाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्याची मागणी केली आहे.देशातील बेरोजगार तरूणांनी नौक-यांसाठी वेगळे धोरण आणि त्यासाठी विशेष आर्थिक तरतुद करण्याचा आग्रह केला आहे.याशिवाय आयुष्यमान योजनेपासून जीएसटी पर्यंत सवलत मिळण्याच्या मोठया अपेक्षा आहेत.अशा स्थितीत सरकारपूढे पर्याय मात्र खूप कमी शिल्लक आहेत.तिजोरी मर्यादीत आहे.अशात यावेळीच्या अर्थसंकल्पात ग्रामिण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्येला एकाचवेळी खुश करण्यासोबत दिलासाही देणे मोदी सरकारपूढे मोठे आव्हान असेल.या दुहेरी आव्हानाला सरकार कसे सामोरे जाते हे उद्या कळेलच.अर्थात पंतप्रधान मोदींनी नुकत्याच घेतलेल्या अनेक बैठकातुन लोकांना खुश करणा-या अर्थसंकल्पाऐवजी आर्थिक मजबुती देणा-या अर्थसंकल्पाच्या बाजुने ते असल्याचे संकेत दिले आहेत.
जागतीक मंदी,उत्पादनाचा मंदावत चाललेला वेग आणि घटत चाललेली मागणी यादरम्यान सरकारला रोजगार वाढवण्यासाठी मोठी पाऊले उचलावी लागतील.यासाठी नविन अर्थसंकल्पात जनतेला दिलेली आश्वासने आणि सद्य संकट यादरम्यान संतुलन राखण्याचे आव्हान सरकारपूढे आहे.यादरम्यान वित्तीय तुटही सतत वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.जागतीक स्तरावर चाललेल व्यापार युद्धही भारतासाठी संकटे निर्माण करू शकते.या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी मोदी सरकारला लगेच मैदानात उतरायला हवे.मोदी सरकारकडे यासाठी वेळ खूप कमी आहे आणि आता हा बहाणा चालणार नाही की,यासाठी यापूर्वीच्या सरकारची धोरणे कारणीभूत आहेत.
आत्तापर्यंत मोदी सरकारने पारंपारिक अर्थसंकल्पाचा मार्ग अवलंबिला होता.यापूर्वीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने ना मोठा प्रयोग करण्याची ईच्छाशक्ती दाखवली होती,ना वर्तमान व्यवस्थेला बदलण्याचा प्रयत्न दिसला होता.ज्या योजना गरिबांसाठी अपेक्षित होत्या त्यावरच जास्त तरतुद करण्याचा प्रयत्न केला होता.प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याने या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतुद होवू शकते.
विरोधी पक्षांची या अर्थसंकल्पावर करडी नजर राहणार आहे.सार्वत्रीक लोकसभा निवडणूकीत मोठा पराजय मिळाल्यानंतर मोदी-शाहचा सामना करण्यासाठी विरोधकांना देशाची अर्थव्यवस्था हा एकमात्र पर्याय आहे.हिंदुत्व किंवा राष्ट्रवादाच्या मुद्दयांवर सतत पिछेहाट झालेल्या विरोधकांनी आता सर्व लक्ष अर्थव्यवस्थेवर केंद्रीत केले आहे.विरोधकांना याचा अंदाजआहेकी,नागरिकता संशोधन कायदयाच्या विरोधात कितीही आक्रमकता दाखवली तरी यामुळे भाजपाचे राजकीय नुकसान होणार नाही.अवस्था नव्वदच्या दशकासारखी आहे,ज्यावेळी राष्ट्रवाद हा मुद्दा अमेरिकेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होता मात्र तेंव्हा क्लिंटन यांनी अर्थव्यवस्थेचे कार्ड पूढे करून बाजी मारली होती.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...