मुख्य सामग्रीवर वगळा

जगावर ओमिक्रॉनची दहशत

 वघ्या १३ दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनचा फैलाव आता जगभरात होतोय. दक्षिण आफ्रिकेच्या शेजारी देशात याच्या प्रसाराचा वेग वाढला आहे. बोत्सवाना, इस्वातिनी, झिम्बाब्वे, ब्राझिल, अमेरिका, कॅनडा, युरोपमध्ये अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन आढळल्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, साऊदी अरेबिया अशा आता जगभरातील तब्बल ४० देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाल्यानं चिंतेत आणखी भर पडलीय. ओमिक्रॉनचा सर्वात जास्त फैलाव ख्रिश्चन बहुल राष्ट्रांमध्ये होण्याची शक्यता आहे. अवघ्या दोन दिवसांत २३ देशांत संसर्ग परसरला आहे. ओमिक्रॉनमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही हे विशेष. ओमिक्रॉनमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक देशांमध्ये ख्रिसमस बाजारही बंद करण्यात आलेत. आता ओमिक्रॉनमुळे नव वर्षाच्या स्वागताच्या उत्साहावर देखील विघ्न आलंय. ब्राझीलमधील रिओ दि जेनेरियो या शहरात ३१ डिसेंबरचा उत्सव रद्द करण्यात आलाय. अमेरिकेतही ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढत आहे. न्यूयॉर्कमध्ये आणखीन तीन ओमिकॉनबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता अमेरिकेत येणाऱ्या सर्वच प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलीय. दक्षिण आफ्रिकेत या आधीच्या कोरोनालाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं. मात्र, आता ओमिक्रॉनच्या उदयानंतर आलेल्या चौथ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. हॉस्पिटलमधील कोरोनाबाधितांमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ० ते ५ वयोगटातील मुलांच्या बाधितांचं प्रमाण समान असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय. मुलांमध्ये आणि गरोदर महिलांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण का वाढत आहे ? याचा अभ्यास केलं जाणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. भारतातही ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.  

युरोपात कोरोनाचा डेल्टा व्हेरियंटनं हाहा:कार माजवला असतानाच आता ओमिक्रॉननं धास्ती वाढवलीय. बेल्जियममध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढल्यानं हॉस्पिटलमध्ये बेड मिळणंही अवघड झालंय. कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये होऊ नये यासाठी नवे निर्बंध जारी करण्यात आलेत. यापुढे सहा वर्षांवरील सर्वच मुलांना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय. २० डिसेंबरपासून बालवाडी आणि प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. माध्यमिक शाळाही एकदिवस आड सुरू राहणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युरोपमधील ऑस्ट्रिया या देशात पहिल्यांदा पूर्ण लॉकडाऊन आला. तर नेदरलँडमध्ये अशत: लॉकडाऊन लावण्यात आला. आता लॉकडाऊनच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लसीकरण बंधनकारक केल्यानं स्पेनमधील नागरिक संतप्त झालेत. इटलीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं नागरिकांना मास्क बंधनकारक करण्यात आलंय. नागरिकांनी मास्क घातलं की नाही याबाबत तपासणी करण्यात येत आहे. तर ब्रिटनमध्ये अवघ्या काही दिवसांत ओमिक्रॉनबाधितांची संख्या १६० वर पोहचलीय. परदेशातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांना कोरोना चाचणी आणि विलगीकरण बंधनकारक करण्यात आलंय. परदेशातून आलेल्या प्रवाशांना विलगीकरणासाठी हॉटेलही मिळत नसल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय. जर्मनीमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३७८ रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आलंय. लसीकरण न झालेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी आहे. या निर्बंधाचं स्वागत जर्मनमधील नागरिकांनी केलंय. जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी असं आवाहनही मावळत्या चॉन्सलर अँजिला मर्केल यांनी केलंय. जर्मनीमध्ये निर्बंधाचं स्वागत होत असताना ऑस्ट्रेलियामध्ये लससमर्थक आणि विरोधकांनी रॅली काढत आमने-सामने आलेत.

रशियामध्येही कोरोनाचा विस्फोट झालाय. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३२,९७४ रुग्ण आढळून आले आहेत. तर १,२१५ कोरोनाबळी गेले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोना चाचणी आणि १४ दिवसांचं विलगीकरण बंधनकारक करण्यात आलंय. चीनमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनची जगभरातच धास्ती आहे. अशा या भीतीच्या वातावरणात जागतिक आरोग्य संघटनेने मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा ४० देशांत प्रसार झाला असला तरीही या व्हेरिअंटमुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटंलय. 

देशात ओमिक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवार पर्यंत २१ जण ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत. आधी कर्नाटक नंतर महाराष्ट्र त्या पाठोपाठ दिल्ली आणि आता जयपूरमध्ये देखील ओमिक्रॉन पोहोचला आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्यानं  वाढत असल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारची चिंताही वाढली आहे. राज्यात बघता बघता रविवार सपर्यंत ओमिक्रॉनच्या रुग्णांची सख्या ८ वर गेली आहे. त्यामुळे प्रसासनाच्या वतीने काय खबरदारी घेता येईल? काय उपाययोजना करता येतील? यासाठी धावपळ सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनचा राज्यातला पहिला रुग्ण आढळून आला, त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ६ ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून कामाला लागले आहे. तर पुण्यात एक ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पुणे विभागाची चिंताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांनाही सौम्य लक्षणे आहेत, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्यानं थोडासा प्राथमिक दिलासा मिळाला आहे. मात्र लस घेतलेल्या रुग्णांनाही ओमिक्रॉन होत असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्रात एवढी मोठी रुग्णवाढ झाल्याने देशाची चिंताही वाढली आहे. त्यामुळे देशपातळीवरही काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातही निर्बंध आणखी कडक केले जाण्याची शक्यता आहे. संसर्गक्षमता खूप जास्त असल्याने काेराेनाचा ओमिक्राॅन व्हेरिएंट डेल्टाची जागा घेऊ शकताे. येणाऱ्या काळात ओमिक्राॅनचेच रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळतील. मात्र, वेगळ्या लसीची कदाचित गरज भासणार नाही, असे जागतिक आराेग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डाॅ. साैम्या स्वामिनाथन यांनी सांगितले.

-सुरेश मंत्री. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...