मुख्य सामग्रीवर वगळा

केवळ शाळेमुळे मुलं घडतात ?

ला हे बघून आश्चर्य वाटते की, लोक कस सहजरित्या आपल्या निष्पाप मुलांचे बालपण, त्यांची संवेदनशिलता आणि जिज्ञासा हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण मुलांना मशिन बनवण्यासाठी, एका व्यवस्थेचा भाग बनवण्यासाठी किती उत्सुक आहोत. अशा व्यस्थेचा भाग तयार करून देण्यासाठी आपल्या सरकारने जागो-जागी कारखाने तर खोलून ठेवलेच आहेत, ज्यांना हुकूमशाही आणि भांडवलशाही प्रवृत्तीचे लोक मोठया तत्परतेने चालवित आहेत. अशा कारखाण्यांत व्यवस्था जशाच तशी ठेवण्यासाठी आपले डोळे बंद करून चालणारी मोठी खेप तयार केली जात आहे.

मी ठोसपणे सांगू शकतो की, सध्याची ही शिक्षण व्यवस्था कधीच असा समाज तयार करू शकत नाही ज्याच्यात मानवता, रचनात्मकता आणि प्रगतीशिलता असेल आणि मला असे वाटते की, आपण या समस्येला सध्या तोंड देत आहोत. आपण निष्पाप बालकांच्या को-या मनावर कट्टरता, अवैज्ञानिकता आणि असा अभ्यासक्रम लादत आहोत ज्याचा त्यांच्या भविष्याशी काही एक देणे-घेणे नाही. त्यांची ईच्छा आणि परवानगीशिवाय आपण असा अभ्यासक्रम छापत चाललो आहोत.

भूछत्रा सारख्या जागो-जागी उगवलेल्या या शाळांमध्ये बालकांकडून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्यानंतरही त्यांच्या सोबतचा व्यव्हार त्यांचे प्रगती-पुस्तक बघून निश्चित केला जात आहे. अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत प्रत्येक वर्षी चांगले गुण घेवून उतीर्ण होत राहणे हाच एकमेव उद्देश त्यांच्यासाठी निर्धारीत केला गेला आहे आणि हेच त्यांच्या मनावर बिंबवल जात आहे. मुलांची गोष्ट तर सोडा शिक्षकांनाही याची माहिती नाही की, त्या विशिष्ट वर्गाच्या अभ्यासक्रमाचा उद्देश शेवटी काय आहे  ? प्राथमिक शिक्षण घेणा-या मुलांना नापास करण्याचा नियम परत लागू करण्याची मागणी करणारे शिक्षक याच श्रेणीत येतात. त्यांना असे वाटते की, मुलांमध्ये नापास होण्याची भीती असेल तर ते नियमीत शाळेत येतील आणि त्यांनी पाजलेला डोस मन लावून अंगीकारून घेतील. हेच शिक्षक दबक्या आवाजात मुलांना शिक्षा करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगतात.

खंरतर शालेय शिक्षेवर कधीच पूर्णपणे बंदी लागलेली नाही. असे शिक्षक मुलांना शिकवण्याऐवजी आपल्या रचनात्मकतेचा उपयोग त्यांना वेगवेगळ्या शिक्षा देण्यासाठी करतात. आपण सर्वांना याचा अनुभव कधी-ना-कधी तरी आलेलाच आहे. असाच एक प्रकार मला नुकताच पहायला मिळाला. एक ४ वर्षाचा मुलगा सॉरी म्हणून आपल्याच गालात गोर-जोरात मारून घेत होता. त्याला विचारल्यावर माहित झाले की, शाळेत काही चूक झाल्यानंतर त्याच्या शाळीतील शिक्षिका असे करण्यासाठी सांगते. मी कोण्या एका ठराविक शाळेचे नाव घेवू ईच्छित नाही कारण त्यामुळे असा पूर्वाग्रह होईल की, असे प्रकार काही विशिष्टप्रकारच्या शाळेतच होतात.

अशा शाळांमध्ये मुलांच्या सुट्टयांना त्यांच्या सामाजिक आणि रचनात्मक विकासासाठी सोनेरी संधी नाही तर अभ्यासक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा काळ मानला जातो. म्हणूनच की काय या शाळांमधून दिपावली व उन्हाळी सूट्टीच्या काळात मुलांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त गृहपाठ करण्यासाठी दिला जातो. जो पूर्ण केला तर त्यांची सुट्टी वाया गेली म्हणूनच समजा आणि पूर्ण नाही करता आला तर मुलांच्या मनात आपल्या क्षमतेच्या बाबतीत हिनपणाची भावना आणि अभ्यासाच्याप्रती नावडीची सूरूवात झालीच म्हणून समजा. सध्याची परीक्षा पद्धत तर या कामात गृहपाठापेक्षा जास्त भूमिका निभावत आहे. संकुचित मानसिकता असलेल्या शिक्षकांनी भरलेल्या शाळांमध्ये परीक्षा हे सर्वात मोठे हत्यार आहे. मला हे बघून अत्यंत दु:ख होते जेंव्हा अगदी नर्सरीत शिकणा-या बालकावर या हत्याराचा उपयोग करताना मी बघतो. इथे मी एक गोष्ट परत स्पष्ट करू ईच्छीतो की, सरकारी शाळांची जी दूरावस्था आहे ती आहेच पण ही अवस्था खाजगी शाळा आणि महाविद्यालयांचीही आहे जिथे आपण भरमसाठ फीस भरून आपल्या मुलांचे भविष्य निश्चित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून मोकळे होत आहोत.

शिक्षक-पालक मेळावे जणू मुलांच्या तक्रारी करण्याची संधी बनून राहिले आहेत. आपण सुद्धा आपल्या मुलांच्या तक्रारी ऐकण्याची ही परंपरा मन लावून पार पाडत आहोत. आपण एकदाही शाळेला हे विचारण्याचे धाडस करत नाहीत की, माझ्या मुलाला व्यक्तीगतरित्या वेळ दिला गेला की नाही ? त्याच्या क्षमतांचा अभ्यास केल्यानंतर, त्याच्या आवडीचे विश्लेषण केल्यानंतर त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला गेला का ? वास्तविकदृष्टया शाळांमध्ये एकाचवेळी एका मोठ्या संख्येला सामुहिकरित्या शिकवल जात आणि अपेक्षा मात्र व्यक्तीगत परिणामाची केली जाते. अवघ्या ३० ते ३५ मीनीटांच्या तासात प्रत्येकाकडे शिक्षक व्यक्तीगतरित्या वेळ देवूच शकत नाहीत ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. इथे हे लक्षात घ्यायला हवे की, जेंव्हा सर्व काही बाजारीकरण झाल्यासारखे संचलित होत आहे तेंव्हा ज्या सेवेची किंमत आपण चूकवत आहोत तिची खराब गुणवत्ता आपण का स्विकार करावी  ? जर मुलं नापास होत असेल किंवा संबंधित वर्गाचा अभ्यासक्रम तो शिकू शकला नाही तर आपण आपली फिस वापस का घेवू नये किंवा त्यात कपात का करू नये ?

माझ स्वत:च अस वैयक्तीक मत आहे की, चांगला विद्यार्थी’ सारखी गोष्ट असतच नाही  वा या गोष्टीला फार महत्व देण्याची गरज नाही. या ऐवजी ‘चांगला शिक्षक’ ही संकल्पना महत्वाची आहे.मुलांना शिकवणे नाही तर त्यांच्यासोबत शिकावे लागते. मानसशास्त्र असे सांगते की, एक सारखी बुद्धीमत्ता असणारे लोक समान मेंदू क्षमतेचा वापर करतात मात्र त्यांच्या कौशल्याची क्षेत्रे वेगवेगळी असू शकतात. मुलांच्या कौशल्याचे क्षेत्र आपण सर्वस्वी शाळेवर निर्धारित करतो. हे काहीस अशा प्रकारे आहे जस चूकीच्या ट्रॅक वर इंजीन जावू देवून सारा दोष इंजीनला द्यावा.

मुलांना शाळेत अस वातावरण उपलब्ध करून दिल गेल पाहिजे ज्यामुळे त्यांना शिकताना आनंद वाटेल.शाळामहत्वाची नाही, त्याचा अभ्यासक्रम महत्वाचा नाही, मुलाचे पास-नापास होणे महत्वाचे नाही तर महत्वाच आहे त्याचे शिकणे आणि त्याचा सर्वांगिण विकास. आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात किंवा दुकानावर काम करणारी अशी कितीतरी मुले आहेत जी पैशांची देवाण-घेवाण आणि सामान्य व्यव्हाराचे खूप ज्ञान ठेवतात. केवळ अक्षर ज्ञान नाही म्हणून त्यांचा बौद्धीक स्तर कमी आहे असे मानने योग्य आहे का ?

मी हे मान्य करतो की, एका सुट-बुटात असणा-या व्यक्तीच्या तुलनेत एका सामान्य रिक्शाचालकाला किंवा कामगाराला समाज सन्मान आणि आदराचा हक्कदार समजत नाही. ही एक गंभीर समस्या आहे मात्र अशा मुलांच्या क्षमतेचे आकलन या शाळा आणि त्यांचे प्रगती-पुस्तक करूच शकत नाहीत. मानसशास्राने हे सिद्ध करून दाखवले आहे की, मुलांची शिकण्याची क्षमता त्या काळात कित्येक पटीने वाढते जेंव्हा ती निश्चित होते. मुल आनंदी असतात तेंव्हा प्रयत्न आणि चूका करून शिकत असतात मात्र आपलेहे दुर्भाग्य आहे की, आपण त्यांच्याकडून चूकांची अपेक्षाच ठेवू ईच्छीत नाहीत.

-सुरेश मंत्री.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...