मुख्य सामग्रीवर वगळा

इंटरनेटच्या बाहेर सुद्धा जीवन आहे !

 ता वयस्क काय आणि लहान मुले काय सगळ्यांच्या जीवनातील मोठा वेळ आता इंटरनेटवर जात आहे. आपण सोशल मीडियावर केलेल्या एखाद्या पोस्टला मिळालेल्या भरपूर लाईक्स बघून एवढे खुश होतो की जणू आपल्याएवढा जगात कोणी आनंदी नाही याविपरीत जर कमी लाईक्स मिळाल्या तर आपण एवढे नाराज होतो की जणू आपल्यावर प्रेम करणारा या जगात कोणीच नाही. हे इंटरनेटचे अती प्रेम आता एका मानसिक आजारामध्ये रूपांतरीत होत आहे. आपण आपल्या वास्तविक जीवनात आनंदी राहण्याऐवजी इंटरनेटच्या आभासी जगात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.

आपल्या आसपास लाखो गेगा बाइट्स माहिती सतत येत आहे. व्हाट्सअ‍ॅपवर तर दिवसाला हजारो मेसेज येवून धडकतात. यापैकी कोणती माहिती खरच माझ्यासाठी आहे आणि कोणती नाही आपण हे निश्चितच करू शकत नाहीत. आपण हेही निश्चित करू शकत नाहीत की, यासूचनांपैकी किती सूचनांना आपल्या जीवनात महत्व द्यायचे आहे. लहान-सहान कामासाठी आपण ते अधिकच सोपे जावे म्हणून जसे अवजारं काढायचो तस आज छोट्या-छोट्या गोष्टीसाठी इंटरनेटवर जातो यातून जीही माहिती मिळते त्या माहितीला आपण ब्रम्हवाक्य मानायला लागतो.
आपल्या पोटात सतत वेदना होत आहेत किंवा डोकेदुखी होत आहे तर इंटरनेटवरिल हजारो आजारांची लक्षणे याच्याशी जुळतात म्हणून आपण अधिकच चिंतीत होतो. आपल्यावरिल तणाव अधिकच वाढतो. मला खरंच हा आजार झाला तर नाही ना ? माझे जीवन संकटात तर नाही ना ? आपण योग्य तो उपचार करून घेण्यापूर्वीच आपली रात्रीची झोप उडून जाते. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, इंटरनेट कोणत्याही वैयक्तीक गरजेला लक्षात घेवून माहिती संग्रहीत करत नाही तर जागतिक स्तरावरिल ज्ञान आणि माहिती सोपी करतो. यावरिल माहिती वैयक्तीक आणि सामूहिक दोन्ही स्तरावर उपयोगी असू शकते.
आपल्याला ही छोटी गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, इंटरनेटवरिल माहिती प्राप्त करताना कोणती माहिती मला उपयोगी आहे आणि कोणती मी त्याज्य करायला हवी.
इंटरनेटवर माहिती विकणारी बरीच संकेतस्थळे आहेत.
यावर प्रत्येक माहिती ग्राहकाच्या मागणीनूसार तयार केलेली आणि विकावू असते. जी माहिती बाजारानूसार नाही त्या माहितीला बाजाराच्या मागणीनूसार तोडमोड करून तयार केल जात. इंटरनेटमुळ जग आपल्या मुठ्ठीत आल आहे. जगाच्या कोणत्याही कोप-यातून आपण आता माहिती प्राप्त करू शकतो किंवा देवू शकतो. हा तर याचा एक उपयोग झाला. आपल्याला इंटरनेटचा वापर व्यापक स्तरावर करणे शिकले पाहिजे. जस सोशल मीडियाचा वापर करताना आपण फक्त फोटो आणि जीपीएस लोकेशन शेअर करू की याचा वापर आणखीन काही सकारात्मक कारणांसाठी होवू शकतो याकडे आपण लक्ष द्यायला हवे. आपली मुल आणि वयस्क सुद्धा माहिती आणि डेटाचा वापर आपली जीवनशैली अधिक चांगली बनविण्यासाठी करत आहेत. मात्र आपण हे विसरून चाललो आहोत की, आपण जी माहिती सोशल मीडियावर फेकत आहोत ती माहिती नंतर खाजगी राहत नाही. ती माहिती सर्वांची होवून जाते. नुकतीच एक सोशल साईट वादामध्ये अडकली होती. यातून खाजगीपणाचा प्रश्न समोर आला. आपली प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक श्वास आपण सोशल मीडियावर पोस्ट करत आनंदी होत चाललो आहोत. बघा आज मी इथे आहे, मी हे करत आहे, मी असा आहे इत्यादी-इत्यादी. मी माझे खाजगी क्षण सार्वत्रीक का करित आहे याचा आपण कधी विचार केला आहे का ? दूस-याला आपले खाजगी क्षण दाखवण्यात आपल्याला काय आनंद मिळतो ?
माहिती आणि डेटा यांनी आपल्या जीवनाला अशा प्रकारे प्रभावित केले आहे की, याचा अंदाज आपण आत्ताच बांधू शकत नाही. माझे एका व्यक्तीकडे अत्यंत महत्वाचे काम असल्याने मी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेट घेण्याची किंवा तात्काळ फोनवर संपर्क करण्याची विनंती अनेकदा करूनही ती व्यक्ती व्हाट्सअ‍ॅप चॅटमधून बाहेर पडायला तयार झालीच नाही. सर्वच गोष्टी अशा सोशल मीडियावर शेअर करता येतात किंवा त्यावर चर्चा करता येते असे नाही. आपली भेट भविष्यात फक्त सोशल मीडियावरच होईल आता तो दिवस दूर राहिलेला नाही. या माध्यमांनाही काही मर्यादा आहे हे लक्षात घेवून वेळीच इतर संवाद माध्यमांचा वापर केला तर कुसंवाद होण्याऐवजी सुसंवाद होवू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.
आता तर शासकिय कर्मचा-यांना इंटरनेट आणि व्हाट्सअ‍ॅपचा वापर केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सर्व आदेश व्हाट्सअ‍ॅपद्वारेच दिले जातात त्यामुळे दिवसातून कित्येकदा मोबाईल चाळत बसावे लागते. न जानो महत्वाचा आदेश किवा माहिती कधी येवून धडकेल.
मात्र होतय काय की, ९० टक्के माहिती ही त्या कर्मचा-याशी संबंधीत नसते मात्र तरीही आलेल्या प्रत्येक माहिती किंवा आदेशाला वाचल्याशिवाय पर्यायच राहत नाही. माहिती आणि डेटाला गरजेनूसार दिले आणि गेले पाहिजेत. ज्याला जेवढी गरच आहे तेवढीच माहिती दिली पाहिजे. ही माहिती आपल्यावरच वर्चस्व गाजवणार नाही याची आपण काळजी घेतली तरच आपण जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो. जीवनाचे काही क्षण आणि काही अंग उलगडायचे नसतात. काही कोपरे तर असे असतात की जे आपण एखाद्या खास व्यक्तीसोबतच उलगडू शकतो. अशा बाबींना सोशल मीडियावर सार्वत्रीक करणे हे शहाणपणाचे लक्षण निश्चितच नाही.

-सुरेश मंत्री.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...